Jump to content

सुहासिनी मुळगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सुहासिनी मुळगावकर
जन्म सुहासिनी मुळगावकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

सुहासिनी मुळगावकर (२७ जून, १९३५ - जून १४, १९८९) या मराठी अभिनेत्री, गायिका, लेखिका, व संस्कृत पंडिता होत्या. मुंबई दूरदर्शनवर होणाऱ्या संगीतविषयक कार्यक्रमांच्या त्या निर्मात्या असत.[ संदर्भ हवा ]

दाजी भाटवडेकरांच्या संस्कृत नाटकांमधून त्यांनी कामे केली तसेच त्यांनी स्वतः केलेली एकपात्री 'सौभद्र' आणि एकपात्री 'मानापमान' ही खूप गाजली होती. 'दूरदर्शन' वरील 'प्रतिभा आणि प्रतिमा' या मराठी कार्यक्रमाच्या त्या निर्मात्या होत्या. साहित्य-संगीत-नाटय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या एक तासाच्या मुलाखती असा हा कार्यक्रम होता.[ संदर्भ हवा ]

‘रत्नपारखी योजना’ नावाचा उपक्रम सुहासिनी मुळगावकर तेव्हा चालवत असत ,या मध्ये सध्याच्या ‘सारेगमा’ स्पर्धा आहे, तसा कार्यक्रम त्या सादर करत होत्या. सुहासिनी मुळगावकर यांनी शतरंगी संगीत किंवा गोविंदराव टेंबेंवरील कार्यक्रम सादर केले.[ संदर्भ हवा ]

मुळगावकर यांनी शतरंग,सदाफुली,सफारी, मनमोकळं ही पुस्तके लिहिली आहेत.[ संदर्भ हवा ]

दाजी भाटवडेकरांच्या संस्कृत नाटकांमधून त्यांनी कामे केली तसेच त्यांनी स्वतः केलेली एकपात्री 'सौभद्र' आणि एकपात्री 'मानापमान' ही खूप गाजली होती.[ संदर्भ हवा ] सुहासिनी मुळगावकर यांनी सौभद्र व मानापमान या जुन्या लोकप्रिय संगीत नाटकांतील भिन्न पात्रांचे संवाद एकटीनेच म्हणून दाखविण्याची नवीनच प्रथा सुरू केली. या नाट्यप्रयोगात त्यांचा सर्व भर संवाद आणि अभिनय यांवरच असायचा.[ संदर्भ हवा ]