भंडारी
भंडारी ही हिंदू धर्मातील एक जात आहे. भंडारी समाजाचे लोक मुख्यतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे वसलेले आहेत. महाराष्ट्रात भंडारी समाजाचे लोक मुख्यतः कोकण किनारपट्टी - मुंबई,पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटकात कारवार येथे मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत. भंडारी समाज हा हिंदू धर्माच्या क्षत्रिय वर्णामध्ये येतो. महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गोव्यात कोकणी ही त्यांची बोलीभाषा आहे. भंडारी समाजात मोरे, कित्ते, हेटकरी, चौधरी, शेषवंशी, इत्यादी पोटजाती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी हे भंडारी समाजाचे एक सुभेदार होते. महाराष्ट्र शासनाने भंडारी जातीचा समावेश इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात केला आहे.[१]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
प्रतिष्ठितांची मांदियाळी
[संपादन]दानशूर भागोजी कीर याच समाजातले. भंडारी समाजात कलांचा वारसा आहे. मूर्तीकार बाबुराव सारंग यांनी घडवलेली तुकारामांचं वैकुंठगमन ही मूर्ती एकेकाळी खूप गाजली होती. त्यांचा मुलगा श्याम सारंग, राम सारंग हा वारसा पुढे चालवत आहेत. मूर्तीकार व्यंकटेश कांबळी यांचे वडील एम. डी. कांबळी यांनी लालबागला तांडवनृत्य चलतचित्र प्रदर्शन भरवलं. त्यावेळी लोकांनी पैसे देऊन हे प्रदर्शन पाहिलं. मच्छिंद्र कांबळी, अजय फणसेकर, पद्माकर शिवलकर, एस. के. बोले, प्र. ल. मयेकर, नाना पाटेकर, महेश मांजरेकर, विजय मांजरेकर, संजय मांजरेकर, प्रवीण आमरे, रमाकांत आचरेकर, डॉ. केरकर, अण्णा वैद्य, रामनाथ पारकर, पहिला भंडारी कसोटीपटू दत्तू हिंदळेकर, संगीतकार स्नेहल भाटकर, डॉ. वि. एच. साळसकर, एम. आर. आचरेकर, रमेश भाटकर, न्यायमूर्ती एम. डी. कांबळी, प्रवीण अमरे, डॉ. संदेश मयेकर, सीए उपेंद्र चमनकर, डॉ. शुभांगी पारकर, चरित्रकार धनंजय कीर, गिरीजा कीर, अर्जुनपुरस्कार विजेता भारताचा पहिला जलतरणपटू अविनाश सारंग अशी विविध क्षेत्रांत या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मांदियाळी पाहायला मिळते. मुंबईच्या विकासात, कलेपासून समाज घडवण्यापर्यंत सर्वच स्तरांत भंडारी समाज आपलं योगदान देत आहे.
या समाजात सध्या गाव, तालुका, जिल्हा पातळीवर अनेक भंडारी समाज मंडळे कार्यरत आहेत. त्या मंडळांच्या माध्यमातून समाजिक बांधिलकी आणि विवाह जमावणे असे कार्य चालू असते. यात जवळपासची भंडारी कुटुंबे आपले सभासदत्व नोंदवत असतात. [२]
अश्या मंडळाच्या वर एक महासंघ आहे, असे जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर व देश पातळीवर काही महासंघ कार्यरत आहेत. 25 वर्षांपूर्वी अविनाश चमणकर, नाना उर्फ शंकर हळदणकर, आशिष पेडणेकर, पुष्कराज कोले, नवीन बंदिवडेकर यांज सारखी काही युवा भंडारी समाजात सक्रिय झाली. आता ते वयोवृद्ध झाल्यामुळे कमी सक्रिय झाले आहेत. आज पर्यंत विविध संघटनाच्या माध्यमातून ही मंडळी कार्यरत आहेत. परंतु गेल्या 25 वर्षात हा समाज सक्षम नेतृत्वा अभावी मागे पडलेला दिसत आहे. 2007 साली दादार शिवाजी पार्क मैदांवर झालेल्या भव्य भंडारी मेळाव्यानंतर 2017 साली भंडारी जोडो अभियान श्री. जयंतराव पाटकर यांच्या नियोजनाखाली श्री. नवीन बंदिवडेकर याच्या नेतृत्वात पालघर ते सिंधुदुर्ग असे राबवण्यात आले होते. सध्या भंडारी समाजात, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, भंडारी समाज महासंघ, विश्वभंडारी प्रतिष्ठान सारख्या संस्था समाजाला दिशादर्शक कार्य करत आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "LIST OF CASTES IN OTHER BACKWARD CLASS OF MAHARASHTRA" (इंग्रजी भाषेत). 2014-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-07-01 रोजी पाहिले.
- ^ पाटकर, जयंतराव (2018 ते 2024). "हेतकरी मासिक अंक". दादर: भंडारी मंडळ, दादर.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)