प्रवीण बांदेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रविण बांदेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

प्रवीण दशरथ बांदेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. ’नवाक्षर दर्शन’ या वाङ्मयीन ‍‍मराठी नियतकालिकाचे ते संंस्थापक असून त्याचे ते अनेक वर्षे संपादक आहेत. अनेक वाङ्मयविषयक चर्चासत्रांंमधून ते अभ्यासपूर्ण शाेधनिबंधांचे वाचन करीत असतात.

प्रवीण बांदेकर यांचे मूळ गाव बांदा असले तरी त्यांचा जन्म आजोळी वेंगुर्ल्याला झाला होता. (20 मार्च, 1966). वडील कृषिखात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या बदलीनिमित्त दर दोन-चार वर्षांनी प्रवीण बांदेकर यांना कोकणातील गावोगाव फिरता आले. तरीसुद्धा वेंगुर्ल्याशी त्यांची अतूट नाळ जुळली. प्रवीण बांदेकर यांचे महाविद्यालयीन शिक्षणही वेंगुर्ल्यातल्या बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयात झाले. तिथेच त्यांना कवी गुरुनाथ धुरी भेटले त्यांनी त्यांची साहित्याची आवड जोपासली.

नंतर इंग्रजीत एम.ए. करायला बांदेकर गोवा विद्यापीठात गेले आणि तिथे त्यांना साहित्यिक भालचंद नेमाडे भेटले. नेमाडेंमुळे बांदेकरांचे साहित्याचे-विचारांचे क्षितिज व कक्षा आणखीनच रुंदावल्या. शिक्षण पूर्ण होताच बांदेकर सावंतवाडीच्या आर.पी.डी. काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि सावंतवाडीतील सर्जनशीलतेला खतपाणी घालणाऱ्या वातावणामुळे प्रवीण बांदेकर यांच्यातल्या कवी-लेखकाचा तेथे खरा विकास झाला.

कवी वसंत सावंत, संवादी कविमित्र वीरधवल परब, अजय कांडर, शरयू आसोलकर, गोविंद काजरेकर आणि अनिल धाकू कांबळी ही मंडळी बांदेकरांना सावंतवाडीतच भेटली. वसंत सावंत यांनी स्थापन केलेला ‘सिंधुदुर्ग साहित्य संघ’ हेच या बहुतेकांचे पहिले साहित्यिक व्यासपीठ होते. बांदेकरांनी पहिली कविता या साहित्य संघाच्या मंचावरच वाचली होती.

प्रकाशित पुस्तके - 1. येरू म्हणे (कविता संग्रह), 2000 2. खेळखंडोबाच्या नावानं... (दीर्घ कविता), 2005 3. घुंगूरकाठी (ललित लेख), 2009 4. चाळेगत (कादंबरी), 2009 5. उजव्या सोंडेच्या बाहुल्या (कादंबरी), 2016 6. इंडियन ॲनिमल फार्म (कादंबरी), 2019 7. चिंटू चुळबुळे (बालसाहित्य), 1993

काही महत्त्वाचे पुरस्कार 1. संजीवनी खोजे पुरस्कार (येरू म्हणे,), 2001 2. महाराष्ट्र शासनाचा इंदिरा संत पुरस्कार (येरू म्हणे), 2001 3. को.म.सा.प.चा आरती प्रभू पुरस्कार (येरू म्हणे ), 2001 4. अनुष्टुभ प्रतिष्ठान, मुंबईचा विभावरी पाटील पुरस्कार, (चाळेगत), 2010 5. भैरू रतन दमाणी पुरस्कार, सोलापूर (चाळेगत), 2010 6. विखे पाटील पुरस्कार, प्रवरानगर,(उजव्या सोंडेच्या बाहुल्या) 2017 7. मराठवाडा साहित्य परिषदेचा बी. रघुनाथ कादंबरी पुरस्कार, 2017 8. महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार, अमेरिका, 2018 9. आचार्य अत्रे पुरस्कार, बेळगाव, 2019 10. पाॅप्युलर प्रकाशनचा गंगाधर गाडगीळ पुरस्कार, 2019

संस्थात्मक कार्य अध्यक्ष- अनुष्टुभ प्रतिष्ठान, मुंबई अध्यक्ष - सिंधुदुर्ग साहित्य संघ, सावंतवाडी कार्याध्यक्ष - श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी संपादक - साप्ताहिक वैनतेय

प्रवीण बांदेकर यांचे साहित्य[संपादन]

  • इंडियन ॲनिमल फार्म (कादंबरी, २०१९)
  • उजव्या साेंडेच्या बाहुल्या (कादंबरी, २०१७)
  • खेळखंडाेबाच्या नावानं (दीर्घ कविता, २००५)
  • घुंगुरकाठी (ललितलेख संग्रह, २००९)
  • हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध (ललित लेख संग्रह, २०२०)
  • चाळेगत (कादंबरी, २००९)
  • येरू म्हणे (कवितासंग्रह, २०००)

प्रवीण बांदेकर यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • आचार्य अत्रे पुरस्कार, बेळगाव, २०१९
  • इचलकरंजी वाचनालयाचा इंदिरा संत पुरस्कार, २००१
  • पाॅप्युलर प्रकाशन, मुंबईचा गंगाधर गाडगीळ पुरस्कार, २०१९
  • शब्द पब्लिकेशन, मुंबईचा बाबूराव बागूल पुरस्कार, २०१०
  • सोलापूरचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार, २०१०
  • महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, २०१८
  • पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील (प्रवरानगर) पुरस्कार, २०१७
  • अनुष्टुभ प्रतिष्ठान, मुंबईचा ‘विभावरी पाटील’ पुरस्कार, २०१०
  • संजीवनी खाेजे प्रतिष्ठानचा कवयित्री संजीवनी खाेजे पुरस्कार, २००१