सदस्य चर्चा:Pakshya
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )
[संपादन]
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )
[संपादन]
|
|
|
स्वागत | Pakshya, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Pakshya, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९९९ लेख आहे व १५५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
हार्दिक अभिनंदन!!
[संपादन]- नमस्कार,
सर्व प्रथम मराठी विलीपिडीयावर आपले ५० संपादने पूर्ण झाल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन!! पक्षी विषयात आपण देत असलेले योगदान मोलाचे आहे. आपणास ह्या विषयात रुची असल्याचे आपल्या सदस्य पानावरून कळते.
ह्या कमी आपणास अधिक उत्तम काम करता यावे म्हणून काही आधारभूत सुविधा उपलब्ध करून देता येईल; जसे काही साचे, वर्ग, प्रकल्प, दालन आदी. कामात मदतीसाठी इतरांना सदस्यांना निमंत्रणे देणे त्याच्या आव्हानासाठी ब्यानर लावणे, कामात लेबर कामा करण्यासाठी सांगकाम्या (रोबोट) वापरणे वैगरे. आपण आपल्या योजना सांगितल्या तर हे पर्याय टप्प्या, टप्प्या ने आपल्या गर्जे प्रमाणे अमलात आणता येतील. मदतीसाठी अथवा शंकांसाठी मला निरोप द्यावा.
आपल्या पुढील कामासाठी शुभेच्छा.
कळावे
राहुल देशमुख १४:५४, १० डिसेंबर २०११ (UTC)
राहुल तुमच्या पाठीम्ब्यासाठी धन्यवाद. बर्याच गोष्टी आहेत ज्या मला अजून माहित नाहीएत
- आपणास सुरुवातीस २-३ गोष्टींची किमान काळजी द्यावयास हवी.
- प्रत्येक लेखात किमान १-२ वाक्ये टाकावे. त्यात ज्या पक्षा बाबत आपण लिहिता आहात त्या नावास बोल्ड करावे
- प्रत्येक लेखात शेवटी वर्ग टाकावा पक्षाच्या लेखा साठी [[वर्ग:पक्षी ]] असे लिहावे ज्यामुळे सगळे पक्ष्यान वरील लेख एकाच ठिकाणी सापडण्यास मदत होते.
- आपण लेखाचे शेवटी विस्तार विनंती साचा लावावा ( {{विस्तार}} ) जेणे करून इतर सदस्य त्यात भर घालुशाक्तील हा साचा संपादन खिडकीच्या खाली उपलब्ध आहे फक्त त्यास टिचकवा.
- वेगळे साचे वापरण्या पेक्षा साचा:जीवचौकट ने सुरुवात करा आणि वाटल्यास अधिक अद्यावत साचा बनवून देता येईल.
- शेवटी संदर्भ द्यावेत
- लेख मोर पाहावा आणि तेथील ढाचा वापरावा
काही अडचण आल्यास अथवा मदतीसाठी माझ्या सदस्य पानावर संदेश द्यावा.
धन्यवाद, राहुल देशमुख ०८:४६, ११ डिसेंबर २०११ (UTC)
साहाय्य
[संपादन]नमस्कार पक्ष्या ! अपल्याला काही मदत लागल्यास राहुल म्हणतात, तसे निस्संकोचपणे कळवा. तसेच विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ येथे काही मदतपाने आहेत. ती थोडी चाळून बघा, काही गोष्टी अधिक स्पष्ट होतील.
बाकी, तुमचे पक्षीविषयक लेखांमधील योगदान चांगले वाटले. अजून येऊ द्यात. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:०३, ११ डिसेंबर २०११ (UTC)
- भारतीय पक्ष्यांची यादी या पानावर पक्ष्यांच्या वर्गांची आणि कुळांची इंग्लिश व मराठी नावे लिहिली आहेत. ती माहिती भरताना तुम्हांला वापरता येतील. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:३३, ११ डिसेंबर २०११ (UTC)
तुमच्या पाठीम्ब्याबद्दल धन्यवाद,
पुस्तकाचा संदर्भ द्यायचा असेल तर काय करायचे? संदर्भ म्हणून द्यायचे कि इतर काही म्हणून.
- पुस्तकाचा संदर्भ द्यायचा असेल तर त्यास संदर्भ म्हणूनच द्यावे. त्यासाठी साचा:स्रोत पुस्तक वापरावा. उदा.: नारायण श्रीपाद राजहंस - प्रबोध (चर्चा) ०६:२४, १२ डिसेंबर २०११ (UTC)
बदल
[संपादन]हा बदल आपला आहे का? नसल्यास कृपया तपासावा. धन्यवाद - प्रबोध (चर्चा) ०६:११, १२ डिसेंबर २०११ (UTC)
प्राण्यांच्या वर्गांची आणि कुळांची मराठी नावे
[संपादन]नमस्कार ! सस्तन प्राणी येथे प्राण्यांचे वर्ग/श्रेणी (ऑर्डर) आणि कुळ (फॅमिली) यांची मराठी नावे लिहिली आहेत. सदस्य:Gypsypkd यांनी काही वर्षांपूर्वी पक्षिविषयक आणि प्राणिविषयक मराठीतील शास्त्रीय परिभाषा काही पानांवर लिहून ठेवली होती. काल पक्ष्यांविषयीचे संदर्भ ज्या पानावर लिहिले होते, तेही त्यांनीच (कुठकुठल्या संदर्भग्रंथांवरून) गोळा करून आणले होते. पक्षी आणि प्राणी यांच्याविषयीचे लेख लिहिताना या उपलब्ध माहितीचा शक्य तितका वापर करावा, अशी आपल्याला विनंती आहे.
बाकी, अजून काही मदत लागल्यास जरूर कळवा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४४, १२ डिसेंबर २०११ (UTC)
प्रताधिकार आणि त्याविषयीचे संकेत
[संपादन]नमस्कार !
विकिपीडिया:पाच आधारस्तंभ येथील तिसर्या आधारस्तंभानुसार असे मार्गदर्शक तत्त्व आहे, की:
“ | प्रताधिकार कायदे पाळा व अन्य स्रोतांवरून उचलेगिरी करू नका. उचित वापर तत्त्वांतर्गत अ-मुक्त आशय वापरणे चालू शकत असले, तरीही विकिपीडियावर तुम्ही लिहू/चढवू इच्छित असलेल्या आशयास, चित्रांना किंवा अन्य माध्यमी संचिकांना मुक्त पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. | ” |
याचा अर्थ काही अपवादात्मक प्रसंगी उचित वापर तत्त्वांतर्गत अ-मुक्त आशय वापरणे चालू शकते - मात्र तसे करताना तुम्ही/चित्र चढवणार्या व्यक्तीने देशोदेशींच्या प्रताधिकारविषयक कायदेशीर तरतुदी व प्रताधिकारित वस्तू वापरल्यामुळे कायदेशीर कारवाई होण्याच्या संभाव्यता लक्षात घेऊन आपल्या जबाबदारीवर निर्णय घ्यावा. कारण पुढेमागे संबंधित व्यक्तींकडून/संस्थांकडून/कंपन्यांकडून या संदर्भात कायदेशीर आक्षेप घेतले गेले, तर विकिमीडिया प्रतिष्ठान विकिपीडियावरील लेखांतून चित्र वगळून मोकळी होऊ शकते... मात्र चित्र चढवणार्या व्यक्तीस अधिक गुंतागुंतीच्या वैधानिक प्रक्रियेस तोंड द्यावे लागायची शक्यता नाकारता येत नाही.
या बाबी लक्षात घेता, त्या चित्राऐवजी अन्य काही प्रताधिकारमुक्त पर्याय शोधावेत असेच मी आपल्याला सुचवेन. उदा., चित्त्यांच्या शिकारीविषयी लिहायचे असल्यास विकिमीडिया कॉमन्स येथे असलेली #१, #२, #३ ही चित्रे वापरता येतील.
अजून काही शंका असल्यास जरूर कळवा. बाकी, तुम्ही अन्य सदस्यांची संपादने बघून बर्याच गोष्टी तुम्ही स्वतःहून शिकत आहात, असे दिसते. त्याबद्द्ल तुमचे कौतुक वाटते. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५७, १४ डिसेंबर २०११ (UTC)
१०० संपादन पूर्ती बद्दल अभिनंदन
[संपादन]नमस्कार,
आपल्या मराठी विकिपीडियावरील १०० संपादन पूर्ती बद्दल अभिनंदन. आपण देत असलेले पक्षी विषयातील योगदान उत्तम आहे. आपण आजवर केलेल्या संपादनान मुळे आता आपल्याला विकिपीडिया आणि येथील काम करण्याच्या शैलीचा अंदाज आलेला आहे. तेव्हा आपणास हरकत नसेल तर पुढील कामाची व्यवस्थित आखणी जर केली तर त्यासाठी लागणाऱ्या काही पूरक गोष्टी आपणास उपलब्ध करून देता येतील. काय आपल्याला अधिक नियोजित आणि आखणी करून काम करण्यास आवडेल ? मझ्या चर्चा पानावर जर संदेश दिलात तर तसे करता येईल.
धन्यवाद
राहुल देशमुख ०५:४३, १८ डिसेंबर २०११ (UTC)
- चौकटी एकत्र करता येत नाहीत पण आपण हवे असलेले प्यारामीटरस म्हणजे पक्षी चौकट आणि जीव चौकट आणि ह्या व्यतिरिक्तही काही आवशक बाबी ज्या आपणास जरुरी वाटतात त्याची यादी करून दिलीत तर मी एक नवीन साचा (चौकट ) आपल्या गरजेनुसार बनवून देईन. ज्यामुळे आपणास हवे असलेले काम करणे शक्य होईल.
- आपणास नोयोजित पद्धतीने काम करणे पसंत आहे हे उत्तम झाले. आता आपणच सांगा कि आपल्या पक्षान बाबत काम करण्याच्या काय योजना आहेत. म्हणजे असलेले लेख वाढवावेत कि नवीन लेख लिहावे वर्गावरून थोडी आकडेवारी काढावी आज आपल्या कडे किती लेख आहेत. छोटे लेख किती, मोठे किती, पुढची पावले काय असावे वैगरे. मग मी आणि आपण हे ठरवू कि नेमके काय करायचे. आणि त्यासाठी काय पूरक गोष्टी त्वरित उपलब्ध करून देता येतील. मग मी काही सदस्यांना हि आपल्याला मदतीसाठी विनंती करू शकेल. जेणे करून पक्षान बाबत मराठी विकिपिडीयावरील एक रोड म्याप तयार करावा काही व्हिजन बनवावे असे थोडे मला अपेक्षित आहे. आपण ह्या कामी लीड घ्यावा आणि मी आपणास हवे असलेल्या इतर बाबींसाठी मदत करीन.
कळवावे राहुल देशमुख १०:२१, १८ डिसेंबर २०११ (UTC)
विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! | ||
नमस्कार, Pakshya
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |
लेखाचे नाव कसे बदलायचे
[संपादन]लेखनाव बदलविण्याचे अधिकार सदस्यास नाहीत ते प्रचालकास आहेत. तरी आपण काय करू शकता
- जर लेख नाव चुकले तर योग्य नावाने नवीन लेख लिहावा आणि सर्व माहिती स्थानांतरीत करावी आणि रिकाम्या लेखात पान काढा साचा (संपादन खिडकीच्या खाली उपलब्ध आहे) लावावा. हा लेख (चुकीचे शीर्षक वगळले जाईल)
- अधिक सटीक शीर्षक - कधी कधी एकाच लेखास अनेक नावाने संबोधता येते अशा वेळेस इतर नावाचे लेख बनवून त्यास मूळ लेख कडे पुनरनिर्देशित करावे. अंतराळवीर → अंतराळयात्री पहावे
- निःसंदिग्धीकरण - कधी कधी एकाच नावाचे अनेक लेख पण असण्याची शक्यता निर्माण होते. त्यासाठी निःसंदिग्धीकरण करावे. औदुंबर (कविता) पाहावे
काही माहिती येथे पण आहे.
धन्यवाद
राहुल देशमुख ०५:०६, २१ डिसेंबर २०११ (UTC)
नमस्कार !
[संपादन]नमस्कार ! पक्षीविषयक लेखांमध्ये आपल्याकडून खूप चांगले काम चालू आहे, हे पाहून आनंद होतो. :) तुमच्याकडून असेच घसघशीत आणि दर्जेदार काम होत राहाव यासाठी माझ्या शुभेच्छा !
बाकी, तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतात राहता काय ? विचारण्याचे कारण असे, की येत्या एखाद-दोन महिन्यांत मराठी विकिपीडियाचे महाराष्ट्रातील काही सक्रिय सदस्य लोकांपर्यंत मराठी विकिपीडिया व अन्य बंधुप्रकल्प पोहोचावेत व लोकांमध्ये यासंबंधी जागृती वाढावी, यासाठी काही उपक्रम/कार्यक्रम आखू पाहत आहेत. त्यासाठी इथल्या सदस्यांचे नेटवर्किंग करण्याच्या उद्देशापोटी तुमचे संपर्काचे तपशील जाणून घेऊ इच्छितो. माझा ई-मेल आयडी मी माझ्या सहीनंतर कमेंटेड स्वरूपात (जो तुम्हांला हे चर्चा पान संपादन करताना दिसेल, अन्यथा दिसणार नाही) कळवला आहे. धन्यवाद !
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०७, २६ डिसेंबर २०११ (UTC)
- एखाद्या दूरचित्रवाहिनीच्या संकेतस्थळावरील दुवा देऊन संदर्भ दिला तरीही चालेल. साचा:वाईल्ड लाईफ नावाचा साचा संतोष दहिवळांनी "नॅट जिओ वाइल्डलाइफ" वाहिनीवरील दुवे नोंदण्यासाठी बनवला आहे, त्याच धर्तीवर तुम्हांला हवा असलेला साचा बनवता येईल.
- खेरीज नुसते संदर्भीकरणासाठी दुवे द्यायचे असल्यास विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण हे पान चाळून बघा; उपयुक्त माहिती आढळेल.
- --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:१९, १७ जानेवारी २०१२ (UTC)
येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी
[संपादन]नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५८, १ जानेवारी २०१२ (UTC)
उल्लेखनीयता
[संपादन]या लेखाची उल्लेखनीयता काय आहे, हे मला नेमके समजले नाही. जर पुणे परिसरातील पक्षी असा लेख विकिपीडियावर ठेवायला मुभा असेल, तर सिंगापूर परिसरातील मासे, लोणी काळभोर परिसरातील पक्षी, सदाशिव पेठ, पुणे या परिसरातील फुलपाखरे वगैरे धाटणीचे लेख उभे राहायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा लेख खरोखरच विकिपीडियावर ठेवावा काय ?
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:१४, ९ जानेवारी २०१२ (UTC)
- बरोबर. शहरांनुसार याद्या करणे फारच ओढूनताणून वाटते. त्यापेक्षा देशानुसार ... किंवहुना देशापेक्षादेखील "भौगोलिक प्रदेशानुसार" यादी असणे अधिक बरवे. कारण पक्ष्यांचा आढळ देशांच्या राजकीय सीमांनुसार नसून विशिष्ट पारिस्थितिकीत - म्हणजेच हवामान/वानिकीय दृष्ट्या सलगता असलेल्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशानुसार बदलतो. म्हणून भारतातील पक्षी/पाकिस्तानातील पक्षी अश्या याद्यांपेक्षाही "भारतीय उपखंडातील पक्षी" किंवा "दक्षिण आशियातील पक्षी" असे शीर्षक असणे अधिक तार्किक ठरते.
- --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:०५, २६ जानेवारी २०१२ (UTC)
प्राणी
[संपादन]सरीस्रुप वर्ग तयार करुन त्यात कासव आणी सुसर यांना त्यात जमा केले. राहुल देशमुख ०६:२०, २८ जानेवारी २०१२ (UTC)
Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)
[संपादन]Keyboard input | Converted to |
---|---|
rya | र्य |
rrya | ऱ्य |
rha | र्ह |
rrha | ऱ्ह |
nja | ञ |
nga | ङ |
a^ | ॲ |
shU/// | शूऽऽ |
Ll | ऌ |
Lll | ॡ |
hra | ह्र |
hR | हृ |
R | ऋ |
RR | ॠ |
ka` | क़ |
k`a | क़ |
\. | । |
\.\ | ॥ |
विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा
[संपादन]आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०७, ११ जून २०१२ (IST)
संचिका
[संपादन]नमस्कार Pakshya,
मी क्षितिज. आपली संपादने मी बघितली. प्राणी व पक्ष्यांबद्दलचे आपले योगदान भारी आहे. :) मराठी विकिवर त्या विषयांवर खूप कमी लेख आहेत.
आपण नुकतीच चढवलेली छायाचित्रे तुम्ही कॉमन्सवर का नाही टाकलीत? तुम्ही तिथे इतर अनेक चित्रे टाकली आहेत.
क्षितिज पाडळकर (चर्चा) १०:५०, २० जून २०१२ (IST)
विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण
[संपादन]लांडगा
[संपादन]मराठी विकिवर लांडगा हे पान नाही पाहून आश्चर्य वाटले. माझ्याकडे या बाबतीत विस्तृत माहिती नसल्यामुळे ते पान निर्माण करण्यासाठी मी आपल्याला विनंती करीत आहे.
पुष्कर पांडे (चर्चा) १५:०८, २० डिसेंबर २०१४ (IST)
संचिका परवाने अद्ययावत करा
[संपादन]नमस्कार Pakshya,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
[संपादन]मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
[संपादन]नमस्कार Pakshya,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
[संपादन]कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.