अंतराळयात्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अवकाशात भ्रमण करणारा एक अंतराळवीर

अंतराळवीर हा अंतराळयान चालवणारा किंवा त्यामधून अवकाशप्रवास करणारा मनुष्य आहे.

राकेश शर्मा हे भारतातले पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली. जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान रशियाकडे जातो. रशियाने सर्वप्रथम 'स्पुटनिक १' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली. त्यानंतर 'लायका' ही कुत्री अंतरिक्षात धाडून मानवाच्या अंतराळप्रवासाची खात्री करून घेतली. मग युरी गागारिन यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणले.

हे सुद्धा पहा[संपादन]