Jump to content

शशी कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शशीकपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
शशी कपूर
शशी कपूर
जन्म शशी कपूर
१८ मार्च १९३८
कलकत्ता, पश्चिम बंगाल
मृत्यू ४ डिसेंबर २०१७ (वय वर्षे -७९)
मुंबई
इतर नावे बलबीर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९४२ - १९९९
भाषा हिंदी भाषा
प्रमुख चित्रपट जब जब फूल खिले, प्यार का मौसम
पुरस्कार

पद्मभूषण (२०११)

दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१५)
वडील पृथ्वीराज कपूर
पत्नी जेनिफर
अपत्ये कुणाल, करण, संजना (कन्या)

शशी कपूर (जन्म : कलकत्ता, १८ मार्च १९३८; - मुंबई, ४ डिसेंबर २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे त्यांच्या घरात पहिल्यापासून सिनेमा होताच.

शशी कपूर यांचे शशी कपूर यांचे खरे नाव बलबीरराज कपूर होते. त्यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. १९४०मध्ये शशीराज, १९४१मध्ये मीना आणि १९४५मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांतील महत्त्वाचे चित्रपट म्हणजे १९४८मध्ये आलेला आग आणि १९५१मध्ये आलेला आवारा. १९४० ते १९५४ या काळात त्यांनी १९ चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

२०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.

पत्नी जेनिफर केंडल

[संपादन]

जेनिफर केंडल (जन्म : २८ फेब्रुवारी १९३३; - ७ डिसेंबर १९८४) या शशी कपूर यांच्या पत्नी. या विदेशी होत्या. जेव्हा शशी कपूरचे आपले वडील पृ्थ्वीराज कपूर यांच्या नाटकांत कलकत्त्याच्या नाट्यगृहात रंगमंचावर अभिनय करीत असत, त्यावेळी जेनिफर पहिल्या ओळीत बसून रोज त्यांचे नाटक पहात असे. शशी कपूरला ही मुलगी आवडली आणि त्याने आपला चुलत भाऊ सुभिराज याच्याकरवी तिला मागणी घातली. त्यानंतर त्या दोघाची थिएटरबाहेर भेट झाली. या पहिल्या भेटीत शशी कपूर खूप घाबरलेले होते, पण जेनिफर नाॅर्मल होती. त्यानंतर जेनिफर आपल्या मित्रमंडळीसह शशी कपूरची नाटके पाहाण्यास येऊ लागली. आणि अशा प्रकारे तिची आणि शशी कपूरची मैत्री वाढली.

मोठ्या हाॅटेलमध्ये जाऊन खाणे शशीच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते, म्हणून त्याने जेनिफरला आपला भाऊ शम्मी कपूरच्या घरी बोलावले. शम्मी कपूरच्या पत्नी गीता बालीने जेनिफरला पहिल्या भेटीत पसंत केले. शम्मीने वडील पृथ्वीराज कपूर यांची शशी कपूरचे विदेशी मुलीशी लग्न करण्यासाठी मोठ्या मिनतवारीने परवानगी मिळवली. १९५८ साली मुंबईत दोघांचे लग्न झाले. त्यानंतर त्या दोघांनी २६ वर्षे प्रेमभरा संसार केला. शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले. त्या दोघांना कुणाल, करण हे मुलगे आणि संजना कपूर ही मुलगी आहे.

पृुथ्वी थिएटर्सचे पुनरुज्जीवन

[संपादन]

बंद पडत चाललेल्या पृथ्वी थिएटर्सचे पुनरुज्जीवन ही शशी कपूर यांची अभिनयक्षेत्राला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.

शशी कपूर यांचे हिंदी चित्रपट

[संपादन]
  • आग (बालकलाकार)
  • आ गले लग जा
  • आमने सामने (नायिका शर्मिला टागोर)
  • आवारा (बालकलाकार)
  • कन्यादान (नायिका आशा पारेख)
  • कभी कभी (नायिका राखी)
  • काला पत्थर
  • चार दीवारें
  • चोर मचाये शोर
  • चोर सिपाही
  • जब जब फूल खिले (नायिका नंदा)
  • जिन्ना
  • त्रिशूल
  • दानापानी (बालकलाकार)
  • दीवार
  • दो और दो पाँच
  • धर्मपुत्र
  • नींद हमारी ख्वाब तुम्हारे (नायिका नंदा)
  • न्यू दिल्ली टाईम्स
  • प्यार का मौसम (नायिका आशा पारेख)
  • फकीरा
  • बचपन (बालकलाकार)
  • मीना (बालकलाकार)
  • मोहब्बत इसको कहते है (नायिका नंदा)
  • राजा साब (नायिका नंदा)
  • रूठाना करो (नायिका नंदा)
  • रोटी कपडा और मकान
  • वक्त (नायिका शर्मिला टागोर)
  • शर्मीली (नायिका राखी)
  • शशीराज (बालकलाकार)
  • शान
  • संग्राम (बालकलाकार)
  • सत्यम् शिवम् सुंदरम्
  • सुहाग
  • हम तो चले परदेस
  • हसीना मान जायेगी (नायिका बबीता)

यांशिवाय, शशी कपूर यांनी झीनत अमान, मुमताज, मौसमी चॅटर्जी, परवीन बाबी, रेखा, हेमा मालिनी यांच्यासोबतही काम केले आहे.

ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपट

[संपादन]
  • द डिसीव्हर्स
  • प्रिटी पॉली
  • बॉम्बे टॉकी
  • शेक्सपिअर वल्लाह
  • साईड स्ट्रीट
  • सिद्धार्थ
  • द हाऊसहोल्डर
  • हीट अँड डस्ट

भारतीय पण इंग्रजी चित्रपट

[संपादन]
  • इन कस्टडी
  • मुहाफीज
  • सॅमी अँड रोझी गेट लेड


दिग्दर्शित केलेले चित्रपट

[संपादन]
  • अजूबा
  • गेस्ट हाऊस
  • पोस्ट बॉक्स ९९९ (साहाय्यक दिग्दर्शक)


शशी कपूर निर्माते असलेले चित्रपट

[संपादन]
  • उत्सव
  • कलयुग
  • ३६ चौरंगी लेन
  • न्यू दिल्ली टाईम्स
  • विजेता
  • जुनून (सहनिर्माते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर)

पुरस्कार

[संपादन]