अल्लू अर्जुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्लू अर्जुन
जन्म ८ एप्रिल, १९८३ (1983-04-08) (वय: ४०)
चेन्नई, तमिळनाडू ,भारत.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ सन २००१ पासून-आजतागायत
भाषा तेलुगु
प्रमुख चित्रपट आर्या
वडील अल्लू अरविंद
आई अल्लू निर्मला
पत्नी
स्नेहा रेड्डी (ल. २०११)
अपत्ये

अल्लू अर्जुन (तेलुगू: అల్లు అర్జున్; ८ एप्रिल १९८२) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे जो प्रामुख्याने तेलगू चित्रपटांत काम करतो. विजेता चित्रपटात बाल कलाकार म्हणून आणि डॅडीत नर्तक म्हणून काम केल्यावर अर्जुनने गंगोत्री चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

त्यानंतर अर्जुन सुकुमारच्या आर्या चित्रपटात दिसला.आर्या मधील त्याची भूमिका ही त्याच्या यशाची पायरी होती, त्याने त्याला फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट तेलगू अभिनेता पुरस्काराने नामांकन मिळवून दिला आणि नंदी पुरस्कार सोहळ्यात त्याला विशेष ज्युरी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेता जूरीसाठी दोन सिनेमा (CineMAA) पुरस्कार मिळाले आणि ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले.

त्यानंतर त्याने व्ही. व्ही. विनायकच्या बनीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी बन्नीची भूमिका साकारली. समीक्षकांनी त्याच्या पद्धती आणि नृत्याचे कौतुक केले. त्याचा पुढचा चित्रपट ए. करुणाकरनची संगीतमय प्रेमकथा हॅपी होता. त्यानंतर त्यांनी पुरी जगन्नाथच्या देसमदुरु' या ऍक्शन फिल्ममध्ये काम केले, ज्यात त्यांनी बाला गोविंदम या निर्भय पत्रकाराची भूमिका केली होती.

अर्जुनने पाच दाक्षिणात्य फिल्मफेर अवॉर्ड्स व दोन नंदी पुरस्कार जिंकले आहेत.

वैयक्तिक जीवन[संपादन]

अल्लू अर्जुनचा जन्म चेन्नई, तमिळनाडु येथे चित्रपट निर्माता अल्लू अरविंद व निर्मला ह्यांच्या घरी झाला. अल्लू रामलिंगय्या हे प्रसिद्ध चित्रपट विनोदवीर त्याचे आजोबा लागतात. त्याच्या आत्याचे लग्न चिरंजीवीसोबत झाले आहे.

दि. ६ मार्च २०११ रोजी हैदराबाद येथे अल्लू अर्जुनचे लग्न स्नेहा रेड्डीसोबत झाले. त्यांना अयान नावाचा मुलगा व अर्हा नावाची मुलगी आहे. सन २०१६ मध्ये अल्लू अर्जुनने एम किचन आणि बफॅलो वाईल्ड विंग्स सोबत ८०० ज्युबली नावाचे नाईटक्लब चालू केले.

कारकीर्द[संपादन]

सुरुवात (२००१-२००८)[संपादन]

विजेतामध्ये बालकलाकाराची व डॅडीमध्ये नर्तकाची भुमिका केल्यावर गंगोत्री चित्रपटातून अर्जुनने प्रौढपणे चित्रपटांत पदार्पण केले.

त्यानंतर अर्जुन सुकुमारच्या कॉमेडी चित्रपट आर्यात दिसला. आर्या मधील भुमिकेमुळे त्यांना पहिल्यांदा फिल्मफेर सर्वोत्कृष्ट तेलुगु अभिनेतासाठी नामांकन आणि नंदी पुरस्कार सोहळ्यात त्याला विशेष ज्युरी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेता जूरीसाठी दोन सिनेमा (CineMAA) पुरस्कार मिळाले आणि ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले.

त्यानंतर त्याने व्ही. व्ही. विनायकच्या बनीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी बन्नीची भूमिका साकारली. समीक्षकांनी त्याच्या पद्धती आणि नृत्याचे कौतुक केले. त्याचा पुढचा चित्रपट ए. करुणाकरनची संगीतमय प्रेमकथा हॅपी होता. त्यानंतर त्यांनी पुरी जगन्नाथच्या देसमदुरु या ऍक्शन फिल्ममध्ये काम केले, ज्यात त्यांनी बाला गोविंदम या निर्भय पत्रकाराची भूमिका केली होती.

चित्रपट यादी[संपादन]

Key
Films that have not yet been released

| Denotes films that have not yet been released

वर्ष शीर्षक भुमिका टिप
१९८५ विजेता लहान नायक बालकलाकार
१९८६ स्वातीमुत्यम सिवय्याचा नातू बालकलाकार
२००१ डॅडी गोपी विशेष दर्शन
२००३ गंगोत्री सिम्हाद्री पदार्पण चित्रपट
२००४ आर्या आर्या
२००५ बन्नी बन्नी/राजा
२००६ हैप्पी बन्नी
२००७ देशमुदुरू बाला गोविंद
२००७ शंकर दादा जिंदाबाद स्वतः विशेष दर्शन
२००८ परुगु कृष्णा
२००९ आर्या २ आर्या
२०१० वरुडू संदीप/रिशी
२०१० वेदम आनंद राजू /केबल राजू
२०११ बद्रीनाथ बद्री
२०१२ जुलाई रवींद्र (रवी) नारायण
२०१३ इद्दरम्मायिलतो संजय (संजू) रेड्डी
२०१४ येवडू सत्या विशेष दर्शन
२०१४ रेस गुर्रम लक्ष्मण/लकी
२०१४ I Am That Change स्वतः शोर्ट फिल्म, निर्माता देखील
२०१५ सन ऑफ सत्यमुर्ती विराज आनंद
२०१५ रुद्रमादेवी गोना गन्ना रेड्डी
२०१६ सरैनोडू गणा
२०१७ दुव्वडा जगन्नाथम् दुव्वडा जगन्नाथम् (डीजे)
२०१८ ना पेरु सुर्या सुर्या
२०२० आल वैकुंठपुरमुलो 2015 देवराज चित्रीकरण चालू आहे.