इरफान खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इरफान खान
एनडीटीव्ही लुमियरच्या दी ऑर्फनेज चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी इरफान खान
जन्म साहबजादे इरफान अली खान
७ जानेवारी, १९६७
जयपूर, राजस्थान, भारत
मृत्यू २९ एप्रिल २०२० (वय: ५३)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८८ - २०२०
भाषा हिंदी, इंग्रजी
प्रमुख चित्रपट नेमसेक, पान सिंग तोमर, मकबूल, सलाम बॉंबे
प्रमुख टीव्ही कार्यक्रम डर (स्टारप्लस), चाणक्य, चंद्रकांता, भारत एक खोज
पुरस्कार पद्मश्री
पत्नी सुतपा सिकदर
अधिकृत संकेतस्थळ http://www.irrfan.com

इरफान खान उर्फ साहबजादे इरफान खान (७ जानेवारी, १९६७:जयपूर, राजस्थान, भारत - २९ एप्रिल, २०२०:मुंबई, महाराष्ट्र) हे एक भारतीय अभिनेते होते ज्यांनी हिंदी चित्रपट, तसेच ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून मीडियामध्ये म्हटले जाते.[१][२] त्यांना फक्त इरफान म्हणूनही ओळखले जाते.

खान यांची कारकीर्द ३० वर्षांपेक्षा जास्त काळ चालली आणि त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक आशियाई चित्रपट पुरस्कार आणि सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. २०११ मध्ये, त्यांना पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.[३] 2021 मध्ये, त्यांना मरणोत्तर फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नेमसेक, स्लमडॉग मिलियोनेर या इंग्रजी व पानसिंग तोमर, मकबूल या चित्रपटांतील कामामुळे ते प्रकाशझोतात आले.

२०१७ पर्यंत, त्यांच्या चित्रपटांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर $3.643 अब्ज (₹२३७ अब्ज) कमाई केली होती.[४] 2018 मध्ये, खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचे निदान झाले. 29 एप्रिल 2020 रोजी कोलन संसर्गामुळे वयाच्या 53 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[५] द गार्डियन या प्रतिष्ठित दैनिकाच्या पीटर ब्रॅडशॉ यांनी इरफान खानचे वर्णन करताना लिहिले, "ते हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमधील एक प्रतिष्ठित आणि करिश्माई स्टार होते, ज्यांची मेहनती कारकीर्द दक्षिण आशियाई आणि हॉलीवूड चित्रपटांमधील एक अत्यंत मौल्यवान पूल होती".[६]

इरफान खानचे प्रमुख हिंदी/इंग्रजी चित्रपट[संपादन]

 • ॲसिड फॅक्टरी (इंग्रजी)
 • एक डॉक्टर की मौत
 • ज्युरासिक वर्ल्ड (इंग्रजी)
 • द अमेझिंग स्पायडरमॅन (इंग्रजी)
 • द वॉंरियर (इंग्रजी)
 • नेमसेक (इंग्रजी)
 • पानसिंग तोमर
 • मकबूल
 • रोग
 • रोड टु लडाख (लघुपट)
 • लाईफ ऑफ पाय (इंग्रजी)
 • लाईफ इन मेट्रो (इंग्रजी)
 • सच अ लॉंग जर्नी (इंग्रजी)
 • सलाम बॉंबे
 • स्लमडॉग मिलेनियर (इंग्रजी)
 • हासिल

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

 • चंद्रकांता
 • चाणक्य
 • डर
 • भारत एक खोज
 • द ग्रेट मराठा (रोहिला सरदार नजीब-उद-दौलाच्या भूमिकेत)

निधन[संपादन]

इरफानला २८ एप्रिल २०२०ला संध्याकाळी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. २९ एप्रिलला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारतीय सिनेमासृष्टीने एक मोलाचा हिरा गमावला अशी हळहळ बॉलीवूड मधल्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी व्यक्त केली. भारत सरकार आणि राजकीय नेते यांनी इरफानच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

पुरस्कार[संपादन]


संदर्भ[संपादन]

 1. ^ Anderson, Ariston; Anderson, Ariston (2014-12-10). "'Jurassic World' Actor Irrfan Khan on Upcoming Film: "It Will Be Like a Scary Adventure"". The Hollywood Reporter (इंग्रजी भाषेत). 2022-01-08 रोजी पाहिले.
 2. ^ "Irrfan Khan: 'I object to the term Bollywood'". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2013-07-25. 2022-01-08 रोजी पाहिले.
 3. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. Archived from the original (PDF) on 2015-10-15. 2022-01-08 रोजी पाहिले.
 4. ^ "Irrfan Khan". Box Office Mojo. 2022-01-08 रोजी पाहिले.
 5. ^ "Irrfan Khan, actor extraordinaire and India's face in the West, dies at 53". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-04-29. 2022-01-08 रोजी पाहिले.
 6. ^ "Irrfan Khan: a seductive actor capable of exquisite gentleness | Peter Bradshaw". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2020-04-29. 2022-01-08 रोजी पाहिले.