रियो डी जानीरो
रिओ डी जानेरो | |||
---|---|---|---|
महानगर | |||
Município do Rio de Janeiro | |||
| |||
| |||
गुणक: 22°54′40″S 43°12′20″W / 22.91111°S 43.20556°Wगुणक: 22°54′40″S 43°12′20″W / 22.91111°S 43.20556°W | |||
देश | ब्राझील | ||
क्षेत्र | दक्षिणपूर्व | ||
राज्य | रिओ डी जानेरो (राज्य) | ||
ऐतिहासिक देश |
पोर्तुगालचे राज्य युनायटेड किंगडम ऑफ पोर्तुगाल, ब्राझील आणि अल्गार्व्स ब्राझीलचे साम्राज्य | ||
स्थापित | १५५५ | ||
स्थापित | 1 मार्च 1565[१] | ||
Named for | सेंट सेबास्टियन | ||
सरकार | |||
• प्रकार | मेयर काउन्सिल | ||
• Body | मुन्सिपल चेम्बर ऑफ रिओ डी जानेरो | ||
• मेयर | Eduardo Paes (सोशल डेमोक्रॅटिक पक्ष) | ||
• व्हाइस मेयर | Nilton Caldeira (Liberal Party (Brazil, 2006)|PL) | ||
क्षेत्रफळ | |||
• महानगर | १२२१ km२ (४८६.५ sq mi) | ||
• Metro | ४,५३९.८ km२ (१७५९.६ sq mi) | ||
Elevation | २ m (७ ft) | ||
Lowest elevation | ० m (० ft) | ||
लोकसंख्या (२०२०)[२] | |||
• महानगर | ६७,४७,८१५ | ||
• Rank | दुसरा | ||
• लोकसंख्येची घनता | एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै) | ||
Demonym(s) | Carioca | ||
पोस्टल कोड |
20000-001 ते 23799-999 | ||
Area code(s) | २१ | ||
Nominal 2018 | US$ 93.9 billion (2nd)[३] | ||
संकेतस्थळ |
prefeitura | ||
साचा:Designation list |
रियो डी जानेरो ([४] शब्दशः अर्थ, जानेवारी महिन्याची नदी), किंवा फक्त रिओ,[५] हे ब्राझील देशातील एक शहर आणि रिओ डी जानेरो राज्याची राजधानी आहे. ब्राझीलमधील दुसरे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे शहर आहे (साओ पाउलो नंतर) आणि अमेरिका खंडातील सहावे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. हे शहर बीटा जागतिक शहर म्हणून GaWC द्वारे सूचीबद्ध केले आहे आणि रिओ डी जनेरियोचा भाग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला गेला आहे. [६]
१५६५ मध्ये पोर्तुगीजांनी स्थापन केलेले हे शहर सुरुवातीला पोर्तुगीज साम्राज्याच्या कॅप्टनसीचे आसन होते. १७६३ मध्ये, ते पोर्तुगीज साम्राज्याच्या ब्राझील राज्याची राजधानी बनले. १८०८ मध्ये पोर्तुगीज रॉयल कोर्ट ब्राझीलला गेले तेव्हा रिओ दि जानेरो हे पोर्तुगालच्या राणी मारिया प्रथमच्या दरबाराचे स्थान बनले. १८२२ पर्यंत ब्राझीलचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत रिओ हे प्लुरीकॉन्टिनेंटल राजेशाहीची राजधानी म्हणून राहिले. हे इतिहासातील मोजक्याच उदाहरणांपैकी एक आहे की वसाहत करणाऱ्या देशाची राजधानी अधिकृतपणे त्याच्या वसाहतींपैकी एका शहरात स्थलांतरित झाली. नंतर १८८९ पर्यंत हे शहर स्वतंत्र राजेशाही असलेल्या ब्राझीलच्या साम्राज्याची राजधानी होते. पुढे १९६० मध्ये ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाला हस्तांतरित करण्यात आली.
R$ ३४३ अब्ज एवढा आकार असलेली रिओ शहराची जीडीटी या देशातील दुसऱ्या क्रमांकाची जीडीपी आहे, [७] आणि २००८ मध्ये ते जगातील ३०व्या क्रमांकाची होती. [८] या शहरात ब्राझिलियन तेल, खाणकाम आणि दूरसंचार कंपन्यांचे मुख्यालय आहे. अनेक विद्यापीठे आणि संस्थांचे घर असलेले रिओ हे ब्राझीलमधील संशोधन आणि विकासाचे दुसरे सर्वात मोठे केंद्र आहे. २००५ च्या माहितीनुसार राष्ट्रीय वैज्ञानिक उत्पादनाच्या १७ टक्के वाटा रिओचा आहे. [९] ब्राझीलमधील बहुतेक राज्यांच्या राजधानींपेक्षा या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. [१०]
रिओ दी जानेरो हे दक्षिण गोलार्धातील सर्वात जास्त भेट दिलेल्या शहरांपैकी एक आहे. त्याची नैसर्गिक ठिकाणे, कार्निव्हल, सांबा, बोसा नोव्हा, आणि बॅल्नेरियो समुद्रकिनारे [११] यांसाठी हे ओळखले जाते. समुद्रकिना-यांव्यतिरिक्त, काही प्रसिद्ध खुणांमध्ये कोर्कोवाडो पर्वतावरील क्राइस्ट द रिडीमरचा महाकाय पुतळा आहे, ज्याला जगातील नवीन सात आश्चर्यांपैकी एक असे नाव दिले आहे. इतर प्रसिद्ध ठिकाणांमध्ये त्याच्या केबल कारसह शुगरलोफ माउंटन ; सांबोड्रोमो, एक कायमस्वरूपी भव्य-रेखा असलेला परेड मार्ग जो कार्निव्हल दरम्यान वापरला जातो; आणि जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमपैकी एक असलेले माराकाना स्टेडियम प्रसिद्ध आहेत. २०१६ उन्हाळी ऑलिम्पिक आणि २०१६ उन्हाळी पॅरालिम्पिकचे यजमानपद रिओ दी जानेरो हे होते, त्यामुळे या स्पर्धांचे यजमानपद मिळवणारे हे पहिले दक्षिण अमेरिकन शहर आणि पोर्तुगीज भाषिक शहर बनले आणि तिसऱ्यांदा ऑलिम्पिक दक्षिण गोलार्धातील शहरात आयोजित करण्यात आले. [१२] माराकाना स्टेडियममध्ये १९५० आणि २०१४ फिफा विश्वचषक, २०१३ फिफा कॉन्फेडरेशन कप आणि XV पॅन अमेरिकन गेम्सची फायनल झाली. २०२४ मध्ये, शहर G20 शिखर परिषद आयोजित करेल. [१३] [१४]
नाव
[संपादन]या शहराचे नाव रिओ डी जनेरिओ असे आहे.या नावाचा पोर्तुगीज भाषेत अर्थ जानेरीओची नदी असा होतो.या शहराचे दुसरे उपनाव अ सिदादे मार्विलोह्सा अर्थात अद्भुत शहर असे सुद्धा प्रचलित आहे.
इतिहास
[संपादन]हे शहर पोर्तुगीज सत्तेच्या अधिपत्याखाली दोन शतक ब्राझील देशाची राजधानी होते.
भूगोल
[संपादन]हे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे शहर आहे.या किनारपट्टीला दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारा आहे.हे शहर ब्राझीलच्या आग्नेय दिशेस आहे.या शहराची समुद्र्सापाटीपासूनची उंची सर्वसाधारणपणे २०० मी एवढी आहे.या शहराच्या किनाऱ्यावर पुळण व तटीय वालुकागिरी दिसतात.या प्रदेशातील नद्या मुख्यतः कमी लांबीच्या आहेत.जसे रिओ डी जनेरिओ हे शहर आहे तसेच ते राज्य सुद्धा आहे.
हवामान
[संपादन]रिओ डी जनेरिओ हे शहर किनारी भागात असल्याने या भगातून आग्नेय वारे ब्राझील देशात प्रवेशतात.तसच जवळील प्राकृतिक विभाग असलेल्या अजस्त्र कडयामुळे या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.या शहराच्या भौगोलिक स्तिथीमुळे या शहरातील हवामान सौम्य व आर्द्र प्रकारचे आहे.तसेच या शहरात फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमान असते. आणि डिसेंबर ते मार्च या काळात जास्त पाऊस पडतो.
संदर्भ
[संपादन]- ^ "Rio de Janeiro Info". paralumun.com. 27 December 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2016 रोजी पाहिले.
- ^ "2019 population estimates. Brazilian Institute of Geography and Statistics (IBGE)". Ibge.gov.br. 18 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Gross Domestic Product of Municipalities". ibge.gov.br. Brazilian Institute of Geography and Statistics. 5 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 November 2021 रोजी पाहिले.
- ^ Larousse Concise Dictionary: Portuguese-English, 2008, p. 339.
- ^ "Rio de Janeiro: travel guide". 13 June 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 May 2015 रोजी पाहिले.
- ^ "Rio de Janeiro: Carioca Landscapes between the Mountain and the Sea". UNESCO. 1 July 2012. 7 July 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 July 2012 रोजी पाहिले.
- ^ "Posição ocupada pelos 100 maiores municípios em relação ao Produto Interno Bruto" (PDF). Instituto Brasileiro de Geografia e Estatística (IBGE). 16 December 2008. 19 April 2009 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 December 2008 रोजी पाहिले.
- ^ "The 150 richest cities in the world by GDP in 2005". City Mayors Statistics. 11 March 2007. 18 September 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 September 2008 रोजी पाहिले.
- ^ "Assessoria de Comunicação e Imprensa". Universidade Estadual de Campinas (Unicamp). 17 June 2005. 17 June 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 September 2008 रोजी पाहिले.
- ^ "Veja o ranking das capitais mais violentas do Brasil". www.estadao.com.br. O Estado de Sao Paulo. 21 June 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "Rio de Janeiro's Beach Culture" Archived 2018-07-05 at the Wayback Machine. Tayfun King, Fast Track, BBC World News (11 September 2009)
- ^ "BBC Sport, Rio to stage 2016 Olympic Games". BBC News. 2 October 2009. 13 February 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 October 2009 रोजी पाहिले.
- ^ "Rio de Janeiro sediará cúpula do G20 em 2024". CNN Brazil (पोर्तुगीज भाषेत). 9 May 2023. 19 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "Rio de Janeiro sediará cúpula dos chefes de Estado do G20 em 2024". G1 (पोर्तुगीज भाषेत). 9 May 2023. 19 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 May 2023 रोजी पाहिले.