बाल्कन युद्धे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बाल्कन युद्धे युरोपाच्या बाल्कन द्वीपकल्पावर ऑक्टोबर १९१२ ते जुलै १९१३ दरम्यान लढली गेली. पहिल्या बाल्कन युद्धात मॉंटेनिग्रो, सर्बिया, ग्रीसबल्गेरिया ह्या राष्ट्रांनी एकत्र येऊन ओस्मानी साम्राज्याचा पराभव केला तर दुसऱ्या बाल्कन युद्धात मॉंटेनिग्रो, सर्बिया, ग्रीसरोमेनिया देशांनी बल्गेरियाचा पराभव केला. ओस्मानी साम्राज्याने बाल्कन युद्धांमध्ये आपला युरोपामधील सर्व भूभाग गमावला. ऑस्ट्रिया-हंगेरी ह्या युद्धांमध्ये थेट समाविष्ट झाले नसले तरी सर्बियाच्या वाढत्या सामर्थ्यापुढे त्याची ताकद कमी झाली. बाल्कन युद्धांमुळे ऑस्ट्रिया-हंगेरी व बाल्कन राष्ट्रांदरम्यानच्या वाढलेल्या तणावाची परिणती १९१४ सालच्या सारायेव्हो येथील ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडच्या हत्येत झाली व पहिल्या महायुद्धास सुरूवात झाली.

बाह्य दुवे[संपादन]