महागाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?महागाव
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 19°41′59″N 72°46′18″E / 19.699699°N 72.771599°E / 19.699699; 72.771599
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .६६३१५ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,०९१ (२०११)
• १,६४५/किमी
भाषा मराठी
सरपंच -
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०१
• +०२५२५
• एमएच४८

गुणक: 19°41′59″N 72°46′18″E / 19.699699°N 72.771599°E / 19.699699; 72.771599


महागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ७.३ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २३७ कुटुंबे राहतात. एकूण १०९१ लोकसंख्येपैकी ५५२ पुरुष तर ५३९ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.४४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७५.४२ आहे तर स्त्री साक्षरता ५३.४९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १४६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.३८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुध्दा ते करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्शासुद्धा बोईसर रेल्वे स्थानकावरून दिवसभर ये-जा करतात..

जवळपासची गावे[संपादन]

कुकडे, बोरशेती, लालोंडे, किराट, गुंदाळे, कांबळगाव, बेटेगाव, माण, वारांगडे, नागझरी, निहे ही जवळपासची गावे आहेत.महागाव ग्रामपंचायतीमध्ये महागाव, कुकडे, आणि वाळवे गावे समाविष्ट आहेत.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/