उटी (महागांव)
?उटी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | महागांव |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
भाषा | मराठी |
उपसरपंच | पंजाबराव काशिनाथ गावंडे पाटील |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/२९ |
उटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. उटी या गावातील संपूर्ण लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. उटी हे गाव अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांचे जन्मस्थान राहिले आहे. अमेरिकेला स्थायिक झालेले शल्यचिकित्सक डॉक्टर आत्माराम सिताराम गावंडे यांचे मुळगाव हेच आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]उटी हे गाव महागाव म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणापासून चार ते पाच किलोमीटर पर्यंत आहे .
हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
येथे प्रामुख्याने मराठा लोकसंख्या अधिक प्रमाणात आढळुन येते ज्यांच्याकडे शेतीच्या मोठ्या भागाची मालकी असुन गावंडे पाटील व वानखेडे पाटील हे प्रमुख आहेत . वरुणा तोड़ा येथे बंजारा समाजाची वस्ती प्रामुख्याने बघायला मिळते . त्याचबरोबर इतर समाजही गुण्यागोविंदाने नांदत आहेत . .
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]उटी या गावात अनेक अत्यंत प्रेक्षणीय स्थळे आहेत . उटी या गावात महत्त्वाची मंदिरे आहेत .गजानन मंदिर हे आजूबाजूच्या परिसरातील एक महत्त्वाचे मंदिर आहे याच बरोबर या गावात भगवान शंकराचे मंदिर कुंडेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे
नागरी सुविधा गावात दिवाबत्तीची सोय आहे. गावात zp शाळा तसेच,प्रायव्हेट शाळा पण आहे.शिस्त बद्ध गाव रचना आणि संपूर्ण गावात दारूबंदी आहे. उटी या गावात अनेक समाजाचे लोक असली तरी गावात एकीची भावना आहे,गावात सार्वजनिक सन समारंभ तसेच प्रत्येक समाजाचे सन अत्यंत आनंदाने साजरे केले जातात. गावात शैक्षणिक प्रगती भरपूर प्रमाणात झाली आहे. डॉक्टरांचे गाव म्हणून उटी या गावाची नवीन ओळख निर्माण झाली आहे.डॉक्टरच नव्हे तर आयआयटी,आर्मी,पोलीस या क्षेत्रात पण गावच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]@ महागाव,धरमोहा,हिंगणी, मोरथ