स्टँडर्ड चार्टर्ड बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक आहे. ही भारतातील सर्वात जुनी व मोठी परकीय बँक आहे. एप्रिल १८५८ मध्ये 'स्टॅन्चार्ट'ने कोलकात्यात आपली पहिली शाखा उघडली. सन २००९ मध्ये बँकेच्या जागतिक पातळीवरील एकूण नफ्यात भारतातील व्यवसायातून नफ्याचा हिस्सा २० टक्क्यांहून अधिक होता. २०१० साली या बँकेने भारतात २,७६० कोटी रुपयाची भांडवलविक्री केली. एखाद्या परकीय बँकेने भारतीय चलनात (रुपयात) केलेली ही देशातील पहिलीच भांडवलविक्री होती.