राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाबार्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

१२ जुलै १९८२ मध्ये भारतात नाबार्ड (इंग्लिश NABARD National Bank for Agriculture and Rural Development) या शिखर बँकेची स्थापना करण्यात आली. पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे भारतीय रिझर्व बँक करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे.

कामे[संपादन]

 • शेतीक्षेत्र, लघुउद्योग, ग्रामीण व कुटीरोद्योग, हस्तोद्योग या क्षेत्रांना गुंतवणूक व उत्पादनकार्यासाठी वित्तपुरवठा करणे.
 • राज्य सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँका, भूविकास बँका इत्यादींना अल्प मुदत, मध्यम व दीर्घमुदतीची कर्जे देणे.
 • सहकारी सोसायट्यांचे भागभांडवल पुरविण्यासाठी नाबार्ड घटक राज्यसरकारांना वीस वर्षे मुदतीपर्यंतची दीर्घ मुदतीची कर्जे देऊ शकते.
 • सहकारी बँका, राज्य सहकारी बँका व क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या कार्याची तपासणी करण्याचे अधिकार नाबार्डला देण्यात आलेले आहेत.
 • शेतीक्षेत्राशी व ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित व मध्यवर्ती सरकारची मान्यता असलेल्या कोणत्याही संस्थेला दीर्घ मुदतीची कर्जे नाबार्ड देऊ शकते. किंवा अशा संस्थांचे भागभांडवल विकत घेऊन अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करु शकते.

व्यवस्थापन[संपादन]

नाबार्डचा कारभार संचालकांच्या मंडळाकडून पाहिला जातो.

 1. रिझर्व्ह बँकेचा डेपोटी गव्हर्नर हा नाबार्डचा चेरमन [अध्यक्ष] असतो.
 2. या शिवाय रिझर्व्ह बँक तीन संचालक नेमते.
 3. केंद्रसरकार तीन संचालक नितुक्त करते.
 4. सहकारी बँकामधील दोन आणि व्यापारी बँकामधील एक तज्ञ संचालक नेमले जातात.
 5. ग्रामीण अर्थव्यवस्था व ग्रामीण विकास यांच्याशी संमधीत दोन संचालक नितुक्त केल जातात.

राज्य सरकार दोन संचालक नियुक्त करतात.

 1. याशिवाय एक व्यवस्था संचालक असतो.
 2. आणि एक पूर्ण वेळ संचालक असतो.