ठाणे जनता सहकारी बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ठाणे जनता सहकारी बँक ( टीजेएसबी )
प्रकार बँकींग
स्थापना इ.स. १९७२
मुख्यालय ठाणे, भारत
उत्पादने कर्जे, क्रेडिट कार्ड्रे
सेवा रियल टाइम ग्रॉस सेटल्मेन्ट
संकेतस्थळ http://www.thanejanata.co.in/

ठाणे जनता सहकारी बँक ( टीजेएसबी ) ही एक भारतीय मल्टिस्टेट सहकारी बँक आहे. या बँकेची स्थापना १९७२ रोजी झाली. इंडियन बँक्स असोसिएशनच्या वतीने २००९ वर्षांसाठीचा टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर या पुरस्कारासाठी या बँकेची देशभरातील सर्व सहकारी बँकातून निवड करण्यात आली.[१]

देशातील पहिल्या पाच सहकारी बँकांत गणना होणार्‍या टीजेएसबीने गुजरातमध्ये २०१२ साली प्रवेश केला असून बँकेच्या सूरत, बडोदाअहमदाबाद येथे शाखा आहेत. २०१३ मे पर्यत बँकेच्या एकूण शाखांची संख्या ८१ आहे. गोवा येथे ३, बेळगाव येथे १, बंगलोर येथे १, व गुजरातेत ३ या द्वारे बँकेचे राज्याबाहेरील अस्तित्वही आहे.

१ एप्रिल २0१२ ते ३१ मार्च २0१३ या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेने एकूण ८,७0९ कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. एकूण ठेवी ५,३0९ कोटींच्या असून कर्ज व्यवहार ३४00 कोटी रुपयांचा आहे.[२]

संदर्भ[संपादन]