दिल्लीमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिल्लीचे जिल्हे या पानावरून पुनर्निर्देशित)

दिल्ली हा भारत देशाचा केंद्रशासित प्रदेश ११ प्रशासकीय जिल्यांमध्ये व ३३ उपविभागंमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक जिल्ह्यच्या प्रमुखपदी एक जिल्हाधिकारी असून दिल्ली सरकारची धोरणे व कायदे राबवणे हे ह्या जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. ह्याचबरोबर दिल्लीमध्ये ४ वेगवेगळ्या महानगरपालिकांचा समावेश होतो.

दिल्लीमधील जिल्ह्यांची यादी[संपादन]

क्र. जिल्हा मुख्यालय उप-विभाग (तालुके)
नवी दिल्ली जामनगर हाऊस चाणक्यपुरी दिल्ली छावणी वसंत विहार
मध्य दिल्ली जिल्हा दर्यागंज सिव्हिल लाईन्स करोलबाग दर्यागंज
पूर्व दिल्ली जिल्हा शास्त्री नगर गांधी नगर मयूर विहार प्रीत विहार
उत्तर दिल्ली जिल्हा अलिपूर अलिपूर मॉडेल टाउन नरेला
ईशान्य दिल्ली जिल्हा नंद नगरी करावल नगर सीलामपूर यमुना विहार
वायव्य दिल्ली जिल्हा कंझावाला कंझावाला रोहिणी सरस्वती विहार
शाहदरा जिल्हा नंद नगरी सीमापुरी शाहदरा विवेक विहार
दक्षिण दिल्ली जिल्हा साकेत हौज खास महरौली साकेत
आग्नेय दिल्ली जिल्हा लाजपत नगर[१] डिफेन्स कॉलनी कालकाजी सरिता विहार
१० नैऋत्य दिल्ली जिल्हा कपास हेरा द्वारका कपास हेरा नजफगढ
11 पश्चिम दिल्ली जिल्हा शिवाजी प्लेस पटेल नगर पंजाबी बाग राजौरी गार्डन

दिल्लीतील महानगरपालिका[संपादन]

दिल्लीत तीन महानगरपालिका व एक नगर परिषद आहे.

१. उत्तर दिल्ली महानगरपालिका

२. पूर्व दिल्ली महानगरपालिका

३. दक्षिण दिल्ली महानगरपालिका

४. नवी दिल्ली नगरपरिषद

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Office of DM, South-East Delhi". Govenment of Delhi.