उपजिल्हाधिकारी
Appearance
महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील उपजिल्हाधिकारी हे राजपत्रित दर्जाचे वर्ग (१) म्हणजे गट "अ" मधील सर्वोच्च पद आहे. उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) यांना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी मदत करतात.
निवड
[संपादन]उपजिल्हाधिकारी यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) या संवैधानिक आयोगामार्फत करण्यात येते.
नेमणूक
[संपादन]उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.
- च्या दर्जाचे राज्य नागरी सेवा अधिकारी डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
- भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांना त्यांच्या परिवीक्षा कालावधीत उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाते.
उपजिल्हाधिकारी यांचे कार्य व जबाबदारी
[संपादन]- राज्य महसूल विभागाच्या उपजिल्हा स्तरावर अधिकारी म्हणून काम करणे.
- उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
- उपविभागीय निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूकीचे कामकाज पाहणे.
- उपविभागातील एखाद्या प्रशासकीय धार्मिक ट्रस्टचे (सचिव) म्हणून कामकाज पाहणे.