तिवसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?तिवसा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

२१° ०५′ २४″ N, ७८° ०३′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अमरावती
भाषा मराठी
तहसील तिवसा
पंचायत समिती तिवसा
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +त्रुटि: "+०७२‌‌२५" अयोग्य अंक आहे
• MH27

गुणक: 21°31′N 78°21′E / 21.51°N 78.35°E / 21.51; 78.35{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

तिवसा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी - गुरुकुंज आश्रम याच तालुक्यात आहे. तिवसा हे गाव अमरावती-नागपूर महामार्गावर अमरावती पासून ४५ कि.मी. अंतरावर आहे.

तिवसा येथून ३ कि.मी. अंतरावर शेंदूरजना बाजार हे गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध गाव आहे. हे गाव सूर्यगंगा नदीच्या तीरावर वसले असून तेथे श्री संत अच्युत महाराज यांचा आश्रम आहे.

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने, हरण करताना, अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात. ते कौंडिण्यपूर हे गाव याच तालुक्यात आहे.

अमरावती जिल्ह्यातील तालुके
चांदुर बाजार | चांदुर रेल्वे | चिखलदरा | अचलपूर | अंजनगाव सुर्जी | अमरावती तालुका | तिवसा | धामणगांव रेल्वे | धारणी | दर्यापूर | नांदगाव खंडेश्वर | भातकुली | मोर्शी | वरुड