१९७५ क्रिकेट विश्वचषक सामना अधिकारी
Appearance
पहिला क्रिकेट विश्वचषक १९७५मध्ये इंग्लंडमध्ये सहा वेगवेगळ्या ठिकाणी खेळला गेला. या स्पर्धेत ८ पंच होते आणि त्यांच्याकडेच सामन्यांची सर्व सू्त्रे होती. या स्पर्धेसाठी विशेष सामनाधिकारी नव्हते.
स्पर्धेत दोन उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासह एकूण १५ सामने खेळले गेले.[१]
पंच
[संपादन]या स्पर्धेतील ८ पैकी ७ पंच इंग्लंडचे तर एक (बिल अॅली) हे ऑस्ट्रेलियाचे होते..[२] उपांत्य सामन्यांमध्ये अॅली व डेव्हिड कॉन्स्टन्ट आणि लॉइड बड व आर्थर फॅग या जोड्या होत्या[३][४] तर अंतिम सामन्यांमध्ये डिकी बर्ड आणि टॉम स्पेन्सर यांनी पंचगिरी केली..[५]
नाव | देश | सामने |
---|---|---|
बिल अॅली | ऑस्ट्रेलिया | ४ |
डिकी बर्ड | इंग्लंड | ४ |
लॉइड बड | इंग्लंड | ४ |
डेव्हिड कॉन्स्टंट | इंग्लंड | ४ |
आर्थर फॅग | इंग्लंड | ४ |
आर्थर जेप्सन | इंग्लंड | ४ |
जॉन लँग्रिज | इंग्लंड | ४ |
टॉम स्पेन्सर | इंग्लंड | ४ |
संदर्भ
[संपादन]- ^ 15 matches were played in 1975 Cricket World Cup ESPN cricinfo
- ^ Bill Alley supervised 1975 Cricket World Cup matches Cricketarchive
- ^ Bill Alley and DJ Constant in the 1st semifinal of 1975 Cricket World Cup ESPN cricinfo
- ^ Lloyd Budd and Arthur Fagg in the 2nd semifinal of 1975 Cricket World Cup ESPN cricinfo
- ^ Dickie Bird and Tom Spencer in the final of 1975 Cricket World Cup ESPN cricinfo