सुनील गावसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुनिल गावस्कर या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:माहितीचौकट क्रिकेट खेळाडू संपूर्ण माहिती

सुनील मनोहर गावसकर यांचा जन्म (जुलै १०, १९४९ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या. गावस्कर हे दोन दशकांदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ५० पेक्षा जास्त फलंदाजी सरासरी असलेल्या कसोटी क्रिकेटमधील फक्त सहा फलंदाजांपैकी एक होते,[१] आणि कसोटी पदार्पणापासून त्यांची फलंदाजीची सरासरी कधीही ५० च्या खाली गेली नाही.[२][३] इंग्लंड च्या 'लिस्टेल क्रिकेट मैदानाला' सुनील गावस्करांचे नाव देण्यात आले आहे.

पुरस्कार[संपादन]

  • मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे क्रिकेट खेळाडू सुनील गावसकर यांना ११ डिसॆंबर २०१६ रोजी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे.
सुनील गावसकर, एक भावमुद्रा

संदर्भ[संपादन]

  1. ^ "The perfect opener".
  2. ^ "For the first time in 49 Tests, Kohli's Test average drops below 50".
  3. ^ "From the archives: Sunil Gavaskar, the constant in a hurrying world".

बाह्य दुवे[संपादन]

मागील
बिशनसिंग बेदी
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९७८-इ.स. १९७९
पुढील
एस. वेकटराघवन
मागील
एस. वेकटराघवन
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९७९-इ.स. १९८३
पुढील
कपिल देव
मागील
कपिल देव
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९८४-इ.स. १९८५
पुढील
कपिल देव