Jump to content

कौंडिण्यपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कौंडण्यपूर या पानावरून पुनर्निर्देशित)

कौंडिण्यपूर (पूर्वीचे कुंडीनपूर) हे भारतातील सध्याच्या महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्यातील (तह.- तिवसा) खेडे होते. या ठिकाणी, श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर असल्याचे मानतात.

येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. तेथून एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. त्या दिंडीची परंपरा ४००हून अधिक वर्षे जुनी आहे.[]

कौंडिण्यपूरच्या मंदिरातील मूर्ती

हे ठिकाण विदर्भनंदन राज्याच्या राजधानीचे शहर होते. रामाची आजी/ अज राजाची पत्नी इंदुमती (राजा दशरथाची आई), अगस्तीची पत्नी लोपामुद्रा तसेच भगीरथमाता सुकेशिनी या सर्वांचे माहेर कौंडिण्यपूर हे होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ तरुण भारत,नागपूर ई-पेपर दि. १८/०७/२०१३ Archived 2016-03-05 at the वेबॅक मशीन. दि.१८/०७/२०१३ रोजी दुपारी १७.१३ वाजता जसे दिसले तसे.
  2. ^ लोकमत,नागपूर-ई-पेपर-दि.०२/१०/२०१३,पान क्र.१ व ९ Archived 2013-10-23 at the वेबॅक मशीन. दि.०२/१०/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता जसे दिसले तसे.