एरफर्टची शरणागती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१६ ऑक्टोबर, इ.स. १८०६ रोजी प्रशियाच्या सैन्याच्या प्रमुखाने फ्रान्सच्या मार्शल जोचिम मरात यापुढे एरफर्ट येथे शरणागती पत्करली. याआधी दोन दिवस चौथ्या संघाच्या युद्धादरम्यान जेना-आउअरश्टेटच्या लढाईत प्रशियाची हार झाल्याचे वृत्त ऐकल्यावर एरफर्टमधील सैनिकांनी लढण्यास नकार दिला व फ्रेंचांसमोर शरणागती पत्करली.