इ.स. १९७१
Appearance
(ई.स. १९७१ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे |
वर्षे: | १९६८ - १९६९ - १९७० - १९७१ - १९७२ - १९७३ - १९७४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी
[संपादन]- जानेवारी २५ - हिमाचल प्रदेशला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता.
- जानेवारी २५ - युगांडात इदी अमीनने मिल्टन ओबोटेला पदच्युत केले व स्वतःला अध्यक्ष घोषित केले.
- जानेवारी ३१ - अपोलो १४ चंद्राकडे निघाले.
फेब्रुवारी
[संपादन]- फेब्रुवारी ७ - स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.
- फेब्रुवारी ८ - नॅस्डॅक शेरबाजार खुले.
- फेब्रुवारी ९ - कॅलिफोर्नियात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.४ तीव्रतेचा भूकंप.
- फेब्रुवारी १३ - अमेरिकेच्या सैन्याची मदत घेउन दक्षिण व्हियेतनामने लाओसवर चढाई केली.
मार्च
[संपादन]- मार्च १ - पाकिस्तानच्या अध्यक्ष याह्या खानने नॅशनल असेम्ब्ली(संसद)ची बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केली.
एप्रिल
[संपादन]- एप्रिल १९ - बांगलादेशच्या सरकारचे भारतास पलायन.
- एप्रिल १९ - सियेरा लिओन प्रजासत्ताक झाले. सियाका स्टीवन्स राष्ट्राध्यक्षपदी.
- एप्रिल १९ - रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत १चे प्रक्षेपण केले.
मे
[संपादन]- मे १९ - सोवियेत संघाने मार्स २ या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
- मे ३० - मरिनर ९चे प्रक्षेपण.
जून
[संपादन]- जून ६ - सोवियेत संघाने सोयुझ ११चे प्रक्षेपण केले.
- जून ६ - दुआर्ते, कॅलिफोर्निया गावाजवळ ह्यूज एरवेस्टचे डी.सी.९ व अमेरिकच्या सैन्याचे एफ.४ प्रकारच्या विमानांमध्ये हवेत टक्कर. ५० ठार.
- जून ३० - सोवियेत संघाच्या सोयुझ ११ अंतराळयानास अपघात. ३ अंतराळवीर मृत्युमुखी.
जुलै
[संपादन]- जुलै ११ - चिलीने तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण केले.
- जुलै २० - सिरिया व जॉर्डनच्या सैन्यांमध्ये चकमक.
- जुलै २६ - अमेरिकेच्या अपोलो १५ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- जुलै ३१ - अपोलो १५च्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.
ऑगस्ट
[संपादन]- ऑगस्ट ९ - भारत व सोवियेत संघामध्ये २० वर्षांचा मैत्री-सहकार-करार.
- ऑगस्ट १५ - अमेरिकेने आपल्या चलन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित केले.
- ऑगस्ट १५ - बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
सप्टेंबर
[संपादन]- सप्टेंबर २९ - ओडिशामध्ये चक्रीवादळ व त्सुनामी. १०,००० ठार.
डिसेंबर
[संपादन]- डिसेंबर २ - संयुक्त अरब अमिरातीची स्थापना. अबु धाबी, अजमान, फुजैरा, शारजा, दुबई व उम-अल-कुवैन सदस्य.
- डिसेंबर ३ - भारत-पाकिस्तानमध्ये तिसरे (बांगलादेश मुक्ति युद्ध)युद्ध सुरू. पाकिस्तानचा भारताच्या आठ हवाईतळांवर हल्ला. भारतीय नौदलाच्या भा.नौ.द.राजपूत या विनाशिकेने पाकिस्तानची पा.नौ.द.गाझी ही पाणबुडी बुडविली.
- डिसेंबर ४ - पाकिस्तानच्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून भारताची पूर्व पाकिस्तानवर चढाई.
- डिसेंबर ८ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी अमेरिकन ७वा नौदल ताफा (7th Fleet) बंगालच्या उपसागरात हलविण्याचा हुकुम दिला.
- डिसेंबर १४ - युद्धात पराभव उघड दिसत असल्याने पाकिस्तानी फौजेने शेकडो बांगलादेशी बुद्धीजीवींची कत्तल उडविली.
- डिसेंबर १६ - बांगलादेश विजय दिन. पाकिस्तानी फौजेने मित्रो बाहिनी समोर सपशेल शरणागति पत्करली.
- डिसेंबर १७ - बांगलादेश मुक्ति युद्ध समाप्त. पाकिस्तान पूर्णपणे पराभूत. ९०,००० पाकिस्तानी सैनिकांची जनरल नियाझीच्या नेतृत्वाखाली जनरल (तत्कालीन लेफ्टनंट जनरल) जगजितसिंह अरोरा यांच्याकडे शरणागती.
जन्म
[संपादन]- मार्च ११ - जिरी व्याकौकाइ, झेकोस्लोव्हाकियाचा हॉकीपटू, इ.स. १९९८ मधील ऑलिम्पिक्स क्रीडास्पर्धेत सहभाग.
- मार्च ११ - मार्टा लव्हेरा पारक्वेट, इ.स. १९९६ची मिस पाराग्वे पुरस्कार विजेती.
- जुलै २० - एड गिडिन्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै २६ - खालेद महमुद बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ७ - डॉमिनिक कॉर्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - गोरान इव्हानिसेविच, क्रोएशियाचा टेनिस खेळाडू.
- सप्टेंबर १८ - लान्स आर्मस्ट्रॉॅंग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता.
- सप्टेंबर २१ - जॉन क्रॉली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - ऍडम हकल, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २६ - पॅटरसन थॉम्पसन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २८ - मॅथ्यू इलियट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ४ - आमेर हनीफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २९ - मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २९ - ग्रेग ब्लुएट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २९ - वायनोना रायडर, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- मार्च ९ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
- एप्रिल २१ - फ्रांस्वा डुव्हालिये, हैतीचा हुकुमशहा.
- मे ३ - डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थतज्ञ आणि विचारवंत.
- डिसेंबर २८ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक
- डिसेंबर २९ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.