मित्रो बाहिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मित्रो बाहिनी (बंगाली: মিত্রবাহিনী ; अर्थ: मित्र पक्ष) ही भारतीय सैन्य आणि तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील बांगला राष्ट्रवादी संघटना 'बांगला मुक्तिवाहिनी' (बंगाली: মুক্তিবাহিনী ; अर्थ: मुक्तिसेना) यांची एकत्रित संघटना होती. या संघटनेने डिसेंबर १९७१ सालातील बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानी सैन्याविरूद्ध लढा दिला. मित्रो बाहिनीच्या या लढ्याने आधीच खिळखिळ्या झालेल्या पाकिस्तानी सैन्यावर अखेरचा आघात झाला आणि त्यामुळे युद्ध सुरू झाल्यापासून फक्त १३ दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली.

मित्रो बाहिनीचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल जगजीतसिंह अरोराने केले.

हे सुद्धा पहा[संपादन]