Jump to content

के. आसिफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के. आसिफ

के. आसिफ (१४ जून, इ.स. १९२२; इटावा, ब्रिटिश भारत - ९ मार्च, इ.स. १९७१; मुंबई, महाराष्ट्र) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता, दिग्दर्शक व पटकथालेखक होता. हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व पटकथालेखन त्याने केले.

जीवन[संपादन]

के. आसिफ याचे नाव 'करीमुद्दीन' असे होते. तो अभिनेता नजर यांचा भाचा होता. आरंभी तो शिंप्याचा व्यवसाय करीत असे. त्यानंतर त्याने फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्याच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचा मालक सिराज अली हकीम याने त्याच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या साह्यावर त्याने फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले.

त्याच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले[ संदर्भ हवा ]. या नाटकावर चित्रपट काढण्याचे त्याने ठरविले. या चित्रपटास सिराज अली हकीम यानेच पैसा पुरविला. शापुरजी पालनजी नावाच्या सावकारानेही या चित्रपटासाठी वित्त पुरवले. चित्रपट बनण्यास सुमारे १२ वर्षे लागली. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्याने ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली[ संदर्भ हवा ].

बाह्य दुवे[संपादन]