बांगलादेश विजय दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


बांगलादेश विजय दिन बांगलादेश या दिवशी पाकिस्तान पासून स्वतंत्र झाला. बांगला मुक्ती वाहिनी ला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता.भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ ला सुरू होवून १६ डिसेंबर १९७१ ला संपले. बांगलादेशातील नागरीकांना व बांगला मुक्ती वाहिनी ला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने पाकिस्तानी हवाई दलाला आदेश देऊन रॅ‍पीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येऊन भारतीय धावपट्यांवर बॉंब टाकून त्या निकामी केल्या. काही तासांच्या अवधीत ,भारतीय लष्कराने त्या धावपट्ट्या पूर्ववत करून हवाई हल्ल्याची तयारी केली.

भारताला गुंतवून ठेवण्यासाठी, त्याच वेळी पाकिस्तानने पंजाब सीमेवरही हल्ला केला. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानचा १४०००(?) किमी प्रदेश ताब्यात घेतला. हा प्रदेश १९७२ च्या शिमला करार तरतुदीत सद्भावनेचे प्रतिक म्हणून परत केला गेला. पुढे भारताने आपले डावपेच जास्त प्रखर करून समुद्र मार्गेही पाकिस्तानची नाकेबंदी केली. दोन पाकिस्तानी विनाशिका (destroyers) व एक पाणबुडी उद्ध्वस्त करून पाकिस्तानला नामोहरम केले.

पाकिस्तानच्या बांग्लादेशातल्या हवाई विभागावर हवाई हल्ले करून पाकिस्तानी हवाई दल उध्वस्त केले गेले. सर्व बाजूंनी कोंडी व पराभव झाल्यामुळे पाकिस्तान ने भारता समोर पराभव पत्करला. ९०००० पाकिस्तानी सैनीक भारताला शरण आले. अशा रितीने भारताने एक बलशाली सत्ता व अभेद्य हवाईदल हा नावलौकिक स्थापन केला व युद्ध थांबले.

या युद्धाआधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युरोप चा दौरा केला व ब्रिटनफ्रांस यांच्या सहित जागतिक मत भारताकडे वळवले. त्याच वेळी रशिया बरोबर करार करून दडपण आणून चीनलाही या युद्धापासून दूर ठेवण्यात यश मिळवले. पाकिस्तानी सैन्याने या युद्धात बांगलादेशीयांवर अन्वनित अत्याचार केले होते. याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत.

पुढे १६ डिसेंबर या नावाने १९७१ च्या युद्धाची पार्श्वभूमी घेऊन काढलेला चित्रपटही आहे.

हेही पाहा[संपादन]