बी.एस.ई. सेन्सेक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बी.एस.ई. सेन्सेक्सचा लोगो

बी.एस.ई. सेन्सेक्स (इंग्लिश: BSE SENSEX; S&P Bombay Stock Exchange Sensitive Index) हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. आशियातील सर्वात प्राचीन अशा बी एस ची स्थापना १८७५ मध्ये बीएसई लिमिटेड या रूपात झाली होती `. भारतीय शेअर बाजाराच्या वाटचालीत या एक्सचेंजचे कार्य मोलाचे असे आहे आणि याचा निर्देशांक जगभर नावाजलेला आहे हा निर्देशांक मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित ३० भारतीय कंपन्यांवर आधारित आहे. ह्या ३० पैकी अनेक कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक उलाढाल केली जाते. १ एप्रिल १९७९ रोजी १०० अंकांसह सेन्सेक्सची सुरुवात झाली.आशियातील सर्वात जुना आणि देशातील पहिला असलेल्या या स्टॉक एक्सचेन्जला बी एस ई लिमिटेड सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट १९५६ अन्वये कायमस्वरूपी मान्यता मिळालेली आहे. या एक्सचेंजचा गौरवशाली इतिहास सव्वाशे वर्षांपेक्षा जुना आहे भारतामध्ये अशी एखादी कंपनी नसेल जिने भांडवल उभारण्यासाठी बी एस ई ची सेवा घेतलेली नाही , बी एस ई हे भारतीय कॅपिटल मार्केट चे प्रतीक मानले जाते. बी एस ई चा निर्देशांक हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि वित्तबाजारातील उलाढालीचे प्रतिबिंब दर्शविणारा बेंचमार्के इक्विटी' निर्देशांक आहे


ght.

घटक[संपादन]

खालील ३० प्रमुख भारतीय कंपन्या सेन्सेक्सचा घटक आहेत.

# कंपनी स्क्रिप
1 हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन 500010
2 सिप्ला 500087
3 भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड 500103
4 भारतीय स्टेट बॅंक 500112
5 एच.डी.एफ.सी. बॅंक 500180
6 हीरो मोटोकॉर्प 500182
7 इन्फोसिस 500209
8 ऑइल ॲंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन 500312
9 रिलायन्स इंडस्ट्रीज 500325
10 टाटा पॉवर 500400
11 हिंडाल्को इंडस्ट्रीज 500440
12 टाटा स्टील 500470
13 लार्सन ॲंड टूब्रो 500510
14 महिन्द्रा ॲंड महिन्द्रा 500520
15 टाटा मोटर्स 500570
16 हिंदुस्तान यूनिलिव्हर 500696
17 आय.टी.सी. 500875
18 स्टरलाइट इंडस्ट्रीज 500900
19 विप्रो 507685
20 सन फार्मास्युटिकल्स 524715
21 गेल 532155
22 आय.सी.आय.सी.आय. बॅंक 532174
23 जिंदाल स्टील ॲंड पॉवर 532286
24 भारती एअरटेल 532454
25 मारुती सुझुकी 532500
26 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 532540
27 एन.टी.पी.सी. 532555
28 डी.एल.एफ. 532868
29 बजाज ऑटो 532977
30 कोल इंडिया 533278

प्रदर्शन[संपादन]

सेन्सेक्सची वाटचाल
 • 1000 - २५ जुलै १९९०
 • 2000 - १५ जानेवारी १९९२
 • 3000 - २९ जानेवारी १९९२
 • 4000 - ३० मार्च १९९२
 • 5000 - ११ ऑक्टोबर १९९९
 • 6000 - ११ फेब्रुवारी २०००
 • 7000 - २१ जून २००५
 • 8000 - ८ सप्टेंबर २००५
 • 9000 - ९ डिसेंबर २००५
 • 10,000 - ७ फेब्रुवारी २००६
 • 11,000 - २७ मार्च २००६
 • 12,000 - २० एप्रिल २००६
 • 13,000 - ३० ऑक्टोबर २००६
 • 14,000 - ५ डिसेंबर २००६
 • 15,000 - ६ जुलै २००७
 • 16,000 - १९ सप्टेंबर २००७
 • 17,000 - २६ सप्टेंबर २००७
 • 18,000 - ९ ऑक्टोबर २००७
 • 19,000 - १५ ऑक्टोबर २००७
 • 20,000 - ११ डिसेंबर २००७
 • 21,000 - ५ नोव्हेंबर २०१०
 • 22,000 - २४ मार्च २०१४
 • 23,000 - ९ मे २०१४
 • 24,000 - १३ मे २०१४
 • 25,000 - १६ मे २०१४
 • 26,000 - ७ जुलै २०१४
 • 27,000 - २ सप्टेंबर २०१४

बाह्य दुवे[संपादन]

साचा:बी.एस.ई. सेन्सेक्स