Jump to content

प्रवचन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अर्थ

[संपादन]

लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मतानुसार प्रवचन हा शब्द प्रथम तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीत आला आहे.[] मराठी शब्दबांधातील व्याख्येनुसार प्रवचन म्हणजे "धार्मिक ग्रंथातील सिद्धान्तांची फोड करून त्याचा अर्थ श्रोत्यांस समजावून सांगण्याची क्रिया" [], तर मराठी विश्वकोशात लक्ष्मणशास्त्री जोशी प्रवचनाची व्याख्या "देवतेची पूजा वा भजन करीत असता पुरोहित, आचार्य वा गुरू, हे पूजेतील किंवा भजनातील मंत्र वा स्तोत्र यांचा अर्थ पूजासमारंभात किंवा भजनसमारंभात भागीदार असलेले जे जन असतात, त्यांना सांगतात, त्यास प्रवचन म्हणतात " अशी सांगतात.[]

परंपरा

[संपादन]

लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मतानुसार सर्व धर्मसंस्थांचा प्रचार आणि दृढीकरण प्रवचनाच्या योगाने होते.[].प्रवचन हे धर्मप्रचाराचे एक प्रमुख साधन आहे. यज्ञकर्मामध्ये आचार्याने प्रवचन करत असत. प्रवचन करण्याची परंपरा पुरातन काळापासून, मुख्यत्वे धार्मिक व्यक्तीच्या घरी असलेल्या देव्हाऱ्यापुढे, देवळामध्ये, समाधिस्थानात, साधूंच्या मठात धर्मशास्त्रज्ञाकडून किंवा तत्त्ववेत्त्यांकडून चालत आली आहे. ही परंपरा जैन मंदिरात, चैत्य मंदिरात किंवा बौद्ध मठातही धर्म संस्कृतीतसुद्धा परंपरेने चालू आहे. []

प्रवचनकार

[संपादन]

प्रवचन करणाऱ्या व्यक्तीला प्रवचनकार असे म्हणतात.

उल्लेखनीय हिंदू प्रवचनकार

पं. काशिनाथशास्त्री जोशी (जन्म : १३ ऑगस्ट १९२३), शंकर वामन दांडेकर (१८९६ -१९६८ ), रामभद्राचार्य, किसन महाराज चौधरी, वामनराव पै, प्रल्हाद वामनराव पै, हरिहर महाराज दिवेगावकर, समाधान महाराज शर्मा, अक्षय महाराज भोसले

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ मराठी विश्वकोश संकेतस्थळ दिनांक २९ एप्रिल २०१३ रोजी भाप्रवे सकाळी १०.५५ वाजता जसे दिसले
  2. ^ शाब्दबंध संकेतस्थळ दिनांक २९ एप्रिल २०१३ रोजी भाप्रवे सकाळी १०.५५ वाजता जसे दिसले
  3. ^ मराठी विश्वकोश संकेतस्थळ दिनांक २९ एप्रिल २०१३ रोजी भाप्रवे सकाळी १०.५५ वाजता जसे दिसले
  4. ^ मराठी विश्वकोश संकेतस्थळ दिनांक २९ एप्रिल २०१३ रोजी भाप्रवे सकाळी १०.५५ वाजता जसे दिसले
  5. ^ मराठी विश्वकोश संकेतस्थळ दिनांक २९ एप्रिल २०१३ रोजी भाप्रवे सकाळी १०.५५ वाजता जसे दिसले