Jump to content

महा एनजीओ फेडरेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महा एनजीओ फेडरेशन - २५०० सामाजिक संस्थेची शिखर संस्था

महाराष्ट्रातील २००० हुन अधिक सामजिक संस्थांची शिखर संस्था म्हणजे महाएनजीओ फेडरेशन . विश्वप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु प.पू.श्रीश्री रविशंकर गुरुदेव यांच्या प्रेरणेने दि.१५ ऑगस्ट २०१८ रोजी हिची पुणे स्थापना झाली . सामजिक संस्था समाजात निर्हेतूकपणे समृद्ध व सशक्त समाज निर्मितीसाठी काम करत असतात . असे अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत मात्र त्या एक संघ नव्हत्या .त्या सर्वांना एका छत्राखाली आणण्याचे कार्य महाएनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून शेखर मुंदडा यांनी केले . उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र लोकनेते मा. देवेंद्रजी फडणवीस सरांचे विशेष मार्गदर्शन संस्थेस लाभते . अध्यात्म , सेवा व समर्पण या तत्वावर महाएनजीओची कार्यप्रणाली आहे . बहुतांश छोट्या सामजिक संस्था उत्तम कार्य करतात मात्र त्यांची नोंद समाजात हवी तशी घेतली जात नाही . काही संस्थांकडे उत्तम प्रकल्प व ते करण्याचे कौशल्य देखील आहे मात्र निधी अभावी ते पूर्ण होऊ शकत नाही. अशा संस्थांना महा एनजीओ च्या वतीने मदत उपलब्ध करून देऊन कार्य केले जाते. महा एनजीओ फेडरेशनने केलेल्या सेवा कार्याचे ४ .५ लक्ष हुन अधिक लाभार्थी आहेत. समाजातील प्रत्येक गरजवतांच्या समवेत संस्था खंबीर पणे आमच्या सक्षमतेनुसार उभे आहोत . समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचे संस्थेला महत्वपूर्ण योगदान लाभते .

नोंदणीकृत असणाऱ्या संस्था ह्या प्रामुख्याने शिक्षण , आरोग्य सेवा , पर्यावरण व्यवस्थापन , महिला सक्षमीकरण, ग्राम विकास , अपंग व विकलांग , कृषी , जल व्यवस्थापन , अनाथ आश्रम , आध्यात्मिक , कचरा व्यवस्थापन , एचआयव्ही / एड्स विषयी कार्य , कायदेशीर सल्ला, गो सेवा ,सामजिक जनजागृती ,कौशल्य विकास , वृद्धाश्रम, सांस्कृतिक ,वंचित मुलांचे पुनर्वसन , उद्योजकता व रोजगार निर्मिती , नदी स्वछता , व्यसनमुक्ती , योग विज्ञान , आदिवासी विकास , बालविकास या २५ विषयांसमवेत अन्य काही महत्वपूर्ण बाबींवर कार्य करतात . या संस्थाना नोंदणी व कार्य पद्धती विस्तार यासाठी महाएनजीओ फेडरेशन संस्थाना पुर्णतः निशुल्क मार्गदर्शन करते. बुधवार पेठ येथील ९० बाधित महिलाना महा एनजीओ प्रत्येक महिन्यास पोषण आहार पुरवते . महाविद्यालयीन मुलांसाठी युवा संवाद हा महत्वपूर्ण उपक्रम संस्था करते . प्रत्येक महिन्यास ग्रामीण भागातील प्रबोधनासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक ५ ठिकाणी कीर्तन सेवेद्वारे प्रबोधन करतात . संस्थेचे आधारस्तंभ व आर्ट ऑफ लिविंगचे ज्येष्ठ शिक्षक मा.चंद्रकांतजी राठी यांचे विशेष योगदान संस्थेच्या प्रत्येक सेवाभावी प्रकल्पात असते . क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या सीएसआर प्रकल्पा अंतर्गत पुणे येथील ५००० गरजू व गरीब कुटुंब सदस्याना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला .

मुख्य संस्था समिती सदस्य

[संपादन]

१ ) शेखर मुंदडा - अध्यक्ष संचालक

२ ) मुकुंद शिंदे - संचालक

३ ) अक्षय महाराज भोसले - कार्यकारी संचालक

४ ) गणेशदत्त बाकले - संचालक

५ ) अमोल उंबरजे - संचालक

६ ) प्रणिता जगताप - संचालक

७ ) राहुल पाटील - संचालक

८ ) शशांक ओंभासे - संचालक

९ ) महेश सोनी - संचालक

वर्षा अखेर सभासद सदस्य संख्या

[संपादन]

सन - २०१७ : ५०० सामाजिक स्वयंसेवी संस्था

सन - २०१८ : १००० सामाजिक स्वयंसेवी संस्था

सन - २०१९ : १५०० सामाजिक स्वयंसेवी संस्था

सन - २०२० : २००० सामाजिक स्वयंसेवी संस्था

सन - २०२१ : २५०० सामाजिक स्वयंसेवी संस्था


संस्थेचे उपक्रम

[संपादन]

प्रत्येक उपक्रमात १०० सामाजिक संस्था यांचा समावेश

  • युवक संवाद शिबिर (महा विद्यालयीन मुलांसाठी)
  • महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात प्रभावी वृक्षारोपण
  • बीज राखी
  • वारकरी सेवा रथ
  • आरोग्य शिबिरे
  • रक्तदान शिबिरे
  • नाते समाजाशी ग्रंथ
  • नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप
  • योग यज्ञ - जागतिक योग दिन
  • आत्मनिर्भर दिवाळी
  • शैक्षणिक सुविधा पुरवठा
  • गाव तिथे ग्रंथालय
  • ध्यान व चिंतन शिबिरे
  • राष्ट्र सेवा मंथन द्वारा देशहित चर्चा सत्र
  • पुस्तक प्रकाशने
  • आरोग्य रथ
  • सीएसआर द्वारे समाजास उपयुक्त गोष्टी उपलब्ध करून देणेबाबत
  • सामाजिक स्वयंसेवी संस्था यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यशाळा
  • गोसंवर्धन उपक्रमाद्वारे २५० पेक्षा अधिक गोमाता यांचे संवर्धन
  • अटल बिहारी वाजपेयी सेवा सप्ताह
  • पंडित दिन दयाळ शर्मा सेवा सप्ताह
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवा सप्ताह
  • पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्म सेवा सप्ताह
  • ग्राम सुरक्षा
  • श्रीश्री सेवा सप्ताह
  • स्वच्छता सामुग्री वाटप
  • वृद्धाश्रम व अनाथ आश्रम, मतिमंद मुले यांसाठी विशेष उपक्रम
  • संगणक वाटप
  • लालबत्ती परिसरातील महिलांना मदत

राज्यपाल पुरस्कार []

लालबत्ती परिसरातील महिलाना पोषण आहार वाटप []

महा एनजीओ फेडरेशनचे कार्य समाजास आदर्शवत : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी []

महा एनजीओ फेडरेशनतर्फे महाराष्ट्रातील 96 संस्थाना तब्बल ५ लाख रुपयांची आर्थिक मदत []

५००० भिक्षेकरी यांना दिवाळी फराळ वाटप []

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महा एनजीओ फेडरेशन सेवा कार्य अवहाल प्रकाशन []

महा एनजीओ फेडरेशनकडून भिक्षेकऱ्यांची दिवाळी गोड - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील []

जागतिक योग दिनानिमित्त योगयज्ञचे आयोजन []

संतसाहित्याच्या माध्यमातून दुष्काळ निवारणाचा प्रयत्न []

https://www.mahabatami.com/NGO-meeting [१०]

बीज राखी

[संपादन]

"बीज राखी सोबत रक्षाबंधन साजरे करूया, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया" हे ब्रीदवाक्य घेऊन महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून पर्यावरणपूरक तसेच निसर्गाच्या समृद्धतेची वाट दाखवणाऱ्या देशी वाणांच्या बीजांपासून राख्या तयार करण्यात आल्या होत्या. यां उपक्रामाला उद्योजक मा.चंद्रकांत राठीजी यांचे सहकार्य लाभले. पर्यावरणपूरक बीज राखी ही संकल्पना नावीन्यपूर्ण असून सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाच्या होणाऱ्या हाणीला रोखण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. आदिवासी महिलांच्या सहकार्याने बिजराख्या तयार करण्यात आल्या होत्या.[११] राखीमध्ये असलेले विविध प्रकारचे बीज हे ज्यावेळेस पृथ्वीत जाऊन वृक्ष धारण केले त्यावेळेस ते अप्रतिम वाटले. अशा प्रकारची संकल्पना ज्यामुळे राखीचा उपयोग हे वृक्षलागवडीकरिता व बीजारोपण करण्याकरिता झाला हे खूप प्रेरणादायी होते. गेल्या काही वर्षात पारंपरिक राखी बरोबर आधुनिक तसेच तंत्र कौशल्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार करण्यात आल्या. या राख्यांचा अधिक आत्मीयतेने वापर करण्यात आला. असंख्य सुबक आकर्षक तितक्याच मनोहरी राख्यांनी रक्षाबंधनाचा सोहळा दरवर्षी संपन्न होत आहे. त्यासोबतच कलात्मकता, कल्पकता व सौंदर्य अशा गुणवैशिष्टे यांनी सजलेल्या राख्या अनेक बहिणींनी भावांना बांधल्या. अनेक जण आपल्या बुद्धी कौशल्याला ताण देऊन विविध गुणवैशिष्ट्ये सजलेल्या राख्या तयार करतात. या उपक्रमास महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा व कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमातील विशेष म्हणजे हे सदर राखी ही पोलीस, डॉक्टर,[१२] कोविड योद्धे यांना आपुलकीने बांधून समाजातील त्यांच्या विषयीचे प्रेम व आदर दर्शवला गेला.[१३] काही ठिकाणी कारागृहातील बंदींना राखी बांधून पुन्हा एकदा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या राखीमध्ये सुती धागा, करंज, बकुळ, चिंच, लाल भोपळा, सीताफळ, टेंभुर्णी, रतनगुंज, काटेसावर, बहावा, भाकर अशा देशी बियांचा वापर करण्यात आला. राखी पर्यावरण पूरक होती.  ज्यामध्ये प्लास्टिकचा कोठेही वापर केलेला नव्हता. अनेक महिलांनी यातून प्रेरणा घेऊन घरी देखील काही राखी बनवल्या. बीज संकलन आणि बीजरोपण होऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे हा संस्थेचा उद्देश होता. शिवाय देशी वाण टिकवून ठेवावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

१)https://mandalnews.com/vidarbha/rakhi-celebrated-seed-in-nandgaon-police-station/

२)https://www.lokmat.com/bhandara/along-national-service-tree-cultivation-also-necessary-a707/

वारकरी सेवा रथ

[संपादन]

महा एनजीओ फेडरेशन आळंदी ते पंढपूर दरम्यान आषाढी वारी (पंढरपूर) मध्ये मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेत 'वारकरी सेवा रथ' कार्यरत आहे. श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूरपर्यंतच्या वारीमार्गात संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यात सहभागी होत दरवर्षी महा एनजीओ फेडरेशनचे तीसहून अधिक स्वयंसेवक वारकऱ्यांना विविध प्रकारची सेवा देतात.

वारकऱ्यांसाठी औषधे, बिस्कीट, शुद्ध पेयजलच्या बाटल्या, चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीपर्यंत पोहोचविणे, पायाचा मसाज करणे, कापडी बुटांचे वाटप असे कार्य या रथाच्या माध्यमातून करण्यात येतात. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, चंद्रकांत राठी, यांचे विशेष सहकार्य या सेवा रथास लाभले. महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक व वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले आणि त्यांच्या युवा वारकरी सहकाऱ्यांनी वारी दरम्यान अहोरात्र काम केले.

श्री क्षेत्र आळंदीपासून पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव ते थेट पंढरपूर पर्यंत अशा विविध मुक्कामाच्या ठिकाणी या रथाद्वारे सेवाकार्य करण्यात येते. सेवा रथाच्या माध्यमातून गो संवर्धन, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार, वृक्ष आणि जल संवर्धन या विषयांवर कीर्तन, प्रवचन आणि भारुड कार्यक्रमाद्वारे समाजप्रबोधन केले जाते. वारकरी संप्रदायातील सामाजिक संघटना तसेच वारीच्या वाटेवर असणाऱ्या गावातील सर्व सामाजिक स्वयंसेवी संस्था यांना सेवा कार्याकडे प्रेरित करण्याचे कार्य हा सेवा रथ करते. वारकऱ्यांच्या विश्वासाला पात्र असणारी आणि निष्ठेने सेवा करणारी संस्था म्हणून महा एनजीओ फेडरेशनने वारी दरम्यान आपले विशेष स्थान मिळवले आहे. वारीच्या प्रत्येक क्षणाची माहिती दृक-श्राव्य माध्यमातून महा एनजीओ फेडरेशनच्या समाजमाध्यमांद्वारे भाविकांपर्यंत पोहचविण्यात येते. [१४]

लालबत्ती परिसरातील महिलांना मदत

[संपादन]

महा एनजीओ फेडरेशन बुधवार पेठ, पुणे येथील वृद्ध महिलांसाठी दर महिन्याला कार्यक्रम आयोजित करत असतो. लालबत्ती परिसरातील ९० ज्येष्ठ वृद्ध व बाधित महिला यांचे समुपदेशन व आरोग्यासाठी प्रयत्नशील राहत प्रत्येक महिलेस वर्षभर आवश्यक तो पोषण आहार सुपूर्द करण्याचे अभिवचन शेखर मुंदडा यांनी दिले होते. या वाचनाची पूर्तता करत महा एनजीओ फेडरेशन दर महिन्यात पुणे शहरातील बुधवार पेठेत महिला समुपदेशन व पोषण आहार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करतो.[१५]

उपक्रमाचा कालावधी प्रत्येक महिन्यास आपण जवळपास एक लक्ष रुपयांचा पोषण आहार बुधवार पेठ येथील वृद्ध व बाधित महिलांना वैद्यकीय सल्यानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहे.[१६] या परिसरातील महिलांसाठी मागील अनेक दशकांपासून या महिलांसाठी कार्य करत आहे.[१७] या संस्थेस येणाऱ्या समस्या लक्षात घेत महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी संस्थेच्या माध्यमातून उपक्रमांस संरक्षण दिले. या उपक्रमात अक्षय महाराज भोसले उपस्थितांच्या सोबत महिलांचे समुपदेशन करतात.[१८]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://www.lokmat.com/pune/governor-awards-maha-ngo-federation-a684/
  2. ^ "संग्रहित प्रत". 2022-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-10 रोजी पाहिले.
  3. ^ https://www.navarashtra.com/amp/maharashtra/paschim-maharashtra/satara/the-work-of-maha-ngo-federation-is-ideal-for-the-society-says-governor-bhagat-singh-koshyari-nrka-204065/
  4. ^ https://policenama.com/maha-ngo-federation-provides-financial-assistance-of-rs-5-lakhs-to-96-organizations-in-maharashtra-participation-of-bjp-social-connect/
  5. ^ https://mymarathi.net/news/maha-ngo-federation-made-diwali-sweet-for-5-thousand-beggars-in-pune/
  6. ^ https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=17830
  7. ^ https://zeenews.india.com/marathi/maharashtra/maha-ngo-made-diwali-of-bhikshekari-sweet-by-sharing-diwali-faral-to-5000-families/662541
  8. ^ https://jalgaonlive.news/organizing-yoga-yajnas-on-the-occasion-of-world-yoga-day-12962/
  9. ^ esakal.com/paschim-maharashtra/try-solve-problem-drought-through-literature-akshay-bhosale-192152
  10. ^ https://www.mahabatami.com/NGO-meeting
  11. ^ maharashtralokmanch (2022-08-14). "महा एनजीओ फेडरेशनतर्फे ५ हजार बीजराख्यांचा अभिनव उपक्रम". Maharashtra Lokmanch (इंग्रजी भाषेत). 2022-11-29 रोजी पाहिले.
  12. ^ "दाभाडी येथे बीज राखी कार्यक्रम". लोकमत. 2021-08-27. 2022-11-29 रोजी पाहिले.
  13. ^ "महाएनजीओ फेडरेशन व स्मितसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हडपसर पुणे येथे बिज राखी उपक्रम | Lok Shasan". lokshasan.com. 2022-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-29 रोजी पाहिले.
  14. ^ https://www.google.com/search?q=%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C+%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87&oq=%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF&aqs=chrome.0.69i59l3j69i57j46i512j0i512j69i60j69i61.1461j0j4&sourceid=chrome&ie=UTF-8#fpstate=ive&vld=cid:6f5f1bf9,vid:e6EyHSUZ92Y. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ NEWS, Neha MPC (2022-11-17). "Budhwar Peth : बुधवार पेठेतील महिलांसाठी मंथन फाउंडेशन व महा एनजीओ फेडरेशनचा 'एक हात मदतीचा' स्तुत्य उपक्रम". MPCNEWS. 2022-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-25 रोजी पाहिले.
  16. ^ टीम, न्यूझ (2022-08-18). "लालबत्ती परिसरातील महिलांना मूलभूत सुविधा देण्यास मंथन फाउंडेशन व महा एनजीओ फेडरेशन कटीबद्ध". महाराष्ट्र जनभूमी (इंग्रजी भाषेत). 2022-12-05 रोजी पाहिले.
  17. ^ "Home". महाराष्ट्र जनभूमी (इंग्रजी भाषेत). 2022-12-05 रोजी पाहिले.
  18. ^ NEWS, Neha MPC (2022-11-17). "Budhwar Peth : बुधवार पेठेतील महिलांसाठी मंथन फाउंडेशन व महा एनजीओ फेडरेशनचा 'एक हात मदतीचा' स्तुत्य उपक्रम". MPCNEWS. 2022-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-05 रोजी पाहिले.