बोल्डर काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोल्डर काउंटीचे न्यायालय

बोल्डर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. राज्याच्या रचनेच्या वेळी असलेल्या १७पैकी ही एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या वायव्सेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,९४,५६७ होती.[१] बोल्डर हे या काउंटीतील सगळ्यात मोठे शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे.[२]

इतिहास[संपादन]

या काउंटीची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी झाली. तेव्हापासून याच्या सीमा बव्हंश अबाधित आहेत. काउंटीच्या आग्नेय भागातील अंदाजे ७१.२ किमी विस्ताराचा ब्रूमफील्ड शहर व काउंटीमध्ये रूपांतर झाले.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on July 7, 2011. June 7, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.