रूट काउंटी, कॉलोराडो
Appearance
रूट काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,८२९. [१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र स्टीमबोट स्प्रिंग्स येथे आहे. [२]
इतिहास
[संपादन]१८६४ च्या सुमारास या प्रदेशातील हान्स पीकजवळ ओढ्यांमध्ये सोने सापडले व येथे लोकांचा ओघ सुरू झाला. [३] त्यावेळी ग्रँड काउंटीच्या पश्चिमेकडील भागातून २९ जानेवारी, १८७७ रोजी रूट काउंटीची रचना करण्यात आली. याला कॉलोराडो प्रांताचे शेवटचे आणि कॉलोराडो राज्याचे पहिले गव्हर्नर असलेल्या जॉन लाँग रूटचे नाव देण्यात आले आहे. १९११मध्ये या काउंटीमधून मोफॅट काउंटीची निर्मिती झाली.
चतुःसीमा
[संपादन]- कार्बन काउंटी, वायोमिंग - उत्तर
- जॅक्सन काउंटी - पूर्व
- ग्रँड काउंटी - आग्नेय
- ईगल काउंटी - दक्षिण
- गारफिल्ड काउंटी - दक्षिण-नैऋत्य
- रिओ ब्लँको काउंटी - नैऋत्य
- मोफॅट काउंटी - पश्चिम
प्रमुख रस्ते
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. September 5, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ Voynick, S.M., 1992, Colorado Gold, Missoula: Mountain Press Publishing Company, आयएसबीएन 0878424555