सान मिगेल काउंटी, कॉलोराडो
Appearance
सान मिगेल काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ काउंटीपैकी एक आहे. 2020च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८.०७२ होती. [१] या काउंटचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर टेल्युराइड आहे. [२] काउंटीला या प्रदेशातून वाहणाऱ्या सान मिगेल नदीचे नाव दिले गेले आहे.
इतिहास
[संपादन]सान मिगेल काउंटीची रचना २७ फेब्रुवारी, १८८३ रोजी यूरे काउंटीमधून करण्यात आली.
१८७५मध्ये येथील टेल्युराइड शहराजवळ सोने सापडले. या प्रदेशातील स्मगलर-युनियन, टॉमबॉय आणि लिबर्टी बेल या तीन खाणींतून १९२०पर्यंत १०० टन सोने काढण्यात आले आहे.
चतुःसीमा
[संपादन]- उत्तर - माँट्रोझ काउंटी
- पूर्व - यूरे काउंटी
- आग्नेय - सान हुआन काउंटी
- दक्षिण - डोलोरेस काउंटी
- पश्चिम - सान हुआन काउंटी, युटा
प्रमुख मार्ग
[संपादन]शहरे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.