अग्गंबाई सासूबाई ही एक भारतीय मराठी भाषेतील एक मालिका आहे जी झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाली होती. ज्याचे दिग्दर्शक अजय मयेकर, निर्माते सुनील भोसले आणि वितरक झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेझ आहेत.
सोहम कुलकर्णी (आशुतोष पत्की) शुभ्राला (तेजश्री प्रधान) एका बस-स्टॉप वर जाऊन भेटायला घाई करतो. दरम्यान, त्याची विधवा आई आसावरी कुलकर्णी (निवेदिता सराफ) तिच्या आवडत्या शेफ अभिजीत राजेचा (गिरीश ओक) कुकरीचा कार्यक्रम बघत असते. पुढे, शुभ्रा तिच्या घरी येते व तिला तिचा सोहमशी लग्न करायचा निर्णय सांगते ज्यामुळे त्याच्या आजोबांची (रवी पटवर्धन) चिडचिड होते. नंतर, शुभ्राला रस्त्यावर अभिजीत भेटतो. त्यानंतर, सोहम आणि शुभ्रा लग्न करतात आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक मुक्काम आयोजीत केला जातो. दरम्यान, आसावरी अभिजीतला फोनवर सांगते की तिला त्याचं क्रेम ब्रुले आवडलं. पुढे, एक चिडलेले आजोबा सोहम आणि शुभ्राला घरी परत यायला लावतात. नंतर, काळजीत असलेली आसावरी सोहमएवेजी चुकून अभिजीतला फोन करते. दुसऱ्या दिवशी, आजोबांनी विकलेला कॅमेरा विकत घ्यायला अभिजीत आसावरीच्या घरी येतो. पुढे, त्यांच्या येण्यानी गोंधळून गेल्यामुळे आसावरी चुकून त्याच्या कॉफीमध्ये तांदूळ घालते. नंतर, आजोबा घरी परत येतात व अभिजीतला तो कॅमेरा विकुन टाकतात. तथापि, आसावरीच्या भावनांमुळे अभिजीत तो कॅमेरा तिच्या घरीच सोडतो. त्यानंतर, आजोबा अभिजीतचा धनादेशबँकमध्ये टाकायला घाई करतात. पुढे, अभिजीतनी तो कॅमेरा विकत घेतलेला नाही आहे हे कळल्यावर सुद्धा ते तो धनादेश परत करायला नकार देतात. तथापि, शुभ्रा त्याला तो धनादेश अभिजीतला परत करण्यासाठी पटवते. नंतर, आसावरी अभिजीतला तो धनादेश परत करण्यासाठी त्याच्या उपाहारगृहामध्ये जाते व दुपारच्या जेवणासाठी त्याला साथ देते.
५ महिन्यांनंतर, अभिजीत उपाहारगृहात त्यांनी आयोजीत केलेल्या खास मेजवानीमुळे आसावरीला आनंद होतो. तथापि, सोहमच्या स्कूटरचा अपघात झालेला आहे हे कळल्यानंतर ती घाईत घरी परत जाते. पुढे, त्याच्या जखमी आसावरीला अतिशयोक्त केल्यामुळे शुभ्रा सोहमला ओरडते. नंतर, अभिजीत आसावरीला इमारतीच्या खाली बोलावतो व तिला तिथे लग्नाची मागणी घालतो. त्यानंतर, शुभ्रा त्रास झालेल्या आसावरीला सांत्वन देते जी अनिच्छेनी अभिजीतबरोबर सांगली नाती तोडते. आसावरी मग शुभ्राला अभिजीतशी बोलायला सांगते. पुढे, शुभ्रा एका धक्का बसलेल्या अभिजीतला सांत्वन देते ज्याला आसावरीचा निर्णय आवडत नाही. नंतर, त्यांना सोडुन दिल्यामुळे सोहम आणि आजोबा आसावरीला ओरडतात ज्यामुळे ती दुखावली जाते. दुसऱ्या दिवशी, सोहम अभिजीतला त्याचा व्यवसाय प्रस्ताव दाखवण्यासाठी त्याच्या उपाहारगृहात पोचतो. दरम्यान, आसावरी अभिजीतसाठी तिच्या भावना शुभ्रासमोर व्यक्त करते. पुढे, अभिजीतच्या पा किटात आसावरीचं छायाचीत्र सापडल्याने सोहमला धक्का बसतो. नंतर, चिडलेला सोहम आसावरीनी सुरक्षीतपणे घरी ठेवलेल्या अभिजीतच्या स्मरणिका नष्ट करतो. त्यानंतर, अभिजीतच्या आठवणींनी ग्रासल्यामुळे, आसावरी एका किराणा दुकानाच्या मालकाएवजी चुकून अभिजीतला फोन करते. पुढे, अभिजीत तिच्या घरी येतो पण ती त्याला इमारतीच्या जिन्यात न बघता किराणा दुकानासाठी निघते. तथापि, ते दोघं शेवटी इमारतीच्या खाली समोरासमोर येतात. नंतर, सोहम आणि शुभ्राला अभिजीत त्याच्या भावना आसावरीसमोर व्यक्त करताना व तिला एक वचन देताना बघतात.
काही दिवसांनंतर, सोहम आजोबांना असं काहीतरी सांगतो ज्यामुळे ते रागावतात. आजोबांनी तिला ओरडल्यामुळे आसावरी घाबरते. अभिजीतच्या प्रेमाच्या कबुलीनी ते आणखी चिडतात व आसावरीला मारहाण करतात. तथापि, मकर संक्रांतीच्या दिवशी, आजोबा त्यांच्या भावना अभिजीतसमोर व्यक्त करतात व त्यांच्या आणि आसावरीच्या नात्याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतात. लग्नाच्या दिवशी, सोहम लग्न थांबवण्यासाठी गैरसमज निर्माण करतो, आणि आसावरी लग्न अचानक रद्द करायचं ठरवते. नंतर, अभिजीत सगळे गैरसमज दूर करतो व आसावरीशी लग्न करतो.