मलेशियामधील बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशियामधील एक पॅगोडा (बौद्ध मंदिर)

बौद्ध धर्म हा (इस्लाम नंतर) मलेशियातील दुसऱ्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. मलेशियाची १९.८% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे.[१][२] काही अंदाजानुसार मलेशियामध्ये बौद्धांची संख्या २१.६% आहे, ज्यात काही चिनी लोकधर्मांचे अनुयायी असलेल्यांच्या आकडेवारीचा समावेश आहे.[३] चिनी लोकधर्मांमध्ये बौद्ध धर्म सुद्धा अनुसरला जातो. मलेशियातील बौद्ध धर्म हा मुख्यतः जातीय मलेशियन चिनी लोकांद्वारे अनसुरला जातो, परंतु मलेशियातील मलेशियन सियामी, मलेशियन श्रीलंकन आणि बर्मी हे देखील आहेत, आणि मलेशियन भारतीयांची बरीच मोठी लोकसंख्या सुद्धा बौद्ध धर्माचे आचरण करते. मलेशियन बौद्ध धर्मीय हे प्रामुख्याने महायान संप्रदायाचे आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Taburan Penduduk dan Ciri-ciri Asas Demografi" (PDF). Jabatan Perangkaan Malaysia. p. 82. Archived from the original (PDF) on 13 नोव्हेंबर 2013. 25 मार्च 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Population Distribution and Basic Demographic Characteristic Report 2010 (Updated: 05/08/2011)". Department of Statistics, Malaysia. Archived from the original on 2016-11-13. 11 March 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "The World Factbook: Malaysia". CIA World Factbook. Archived from the original on 2019-01-06. 2007-11-22 रोजी पाहिले.