आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड
ब्रीदवाक्य तरक्की करें
प्रकार सार्वजनिक
स्थापना इ.स. १९९3
मुख्यालय मुंबई, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती श्री निमेश शहा [१] संचालक आणि मुख्य व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी एस नरेन [२]
राहुल गोस्वामी (मुख्य गुंतवणूक अधिकारी - उत्पन्न मुदत)
उत्पादने म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा, ॲडव्हायजरी सर्व्हिसेस आणि रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट्स
महसूली उत्पन्न १,७५,८८१ कोटी अमेरिकन डॉलर (मार्च ३१, २०१६)
कर्मचारी १०००-१५००
संकेतस्थळ www.icicipruamc.com/

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लि. (ए एम सी)ची एक गुंतवणुक योजना आहे. ही देशातील मोठ्या संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असून ती साध्या व सुयोग्य गुंतवणुकीच्या योजनांद्वारे, गुंतवणूकदाराला दीर्घकाळात संपत्ती निर्माण करून देण्यावर आणि बचत व गुंतवणूक यांच्यामधील तफावत कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते.[३][४]

इतिहास[संपादन]

मूळ[संपादन]

भारतातील आर्थिक सेवा कंपनी आयसीआयसीआय बँक आणि युनायटेड किंग्डममधील आर्थिक सेवा क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांपैकी एक असणारी प्रुडेन्शियल पब्लिक लिमिटेड कंपनी यांचा ए एम सी हा एक संयुक्त प्रकल्प आहे.

भारतातल्या मुंबई शहरातील वांद्रे-कुर्ला संकुल येथे व्यावसायिक कार्यालय असल्याने, एएमसीच्या आकारमानामध्ये, १९९८ मध्ये स्थापना झाल्याच्या वेळेस असणाऱ्या २ स्थाने व ६ कर्मचारी या स्थितीपासून १९ लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांशी संपर्क साधणारी सुमारे १२० स्थाने (कार्यालये) आणि १००० पेक्षा जास्त कर्मचारी-एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.[५]

संपूर्णतः गुंतवणूकदाराभिमुख दृष्टिकोनातून चालणारी ही संस्था आता गुंतवणूक कौशल्य रिसोर्स बॅंडविड्थ आणि प्रोसेस ओरिएन्टेशन यांचे एक संयुग बनली आहे.

संघटन[संपादन]

महत्त्वाच्या व्यक्ती[६][संपादन]

ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक मंडळ
  • श्रीमती चंदा कोचर, अध्यक्षा
  • सुरेश कुमार
  • विजय थॅकर
  • एन. एस. कन्नन
  • सी. आर. मुरलीधरन
  • निमेश शाह[७]
  • गाय स्ट्रॅप्प
  • श्रीमती लक्ष्मी वेंकटाचलम
  • एस. नरेन
व्यवस्थापन समिती
  • बी. रामकृष्ण - कार्यकारी उपाध्यक्ष
  • राघव अय्यंगार - कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख रिटेल ॲन्ड इन्स्टिट्यूशनल बिझनेस
  • हेमंत अगरवाल - हेड ऑफ ऑपरेशन्स
  • विवेक श्रीधरन - हेड ऑफ इन्स्टिट्यूशनल बिझनेस
  • अमर शाह - हेड ऑफ रिटेल बिझनेस
  • श्रीमती सुप्रिया सप्रे - हेड ऑफ कम्प्लायन्स ॲन्ड लीगल
  • अभिजित शाह - हेड ऑफ मार्केटिंग : डिजिटल ॲन्ड कस्टमर एक्स्पीरियन्स
  • अमित भोसले - हेड ऑफ रिस्क मॅनेजमेंट
  • निखिल भेंडे - हेड ऑफ ह्यूमन रिसोर्सेस
  • आदिल बक्षी - हेड ऑफ पब्लिक रिलेशन्स ॲन्ड कम्युनिकेशन
  • ललित पोपली - हेड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
  • राहुल राय - हेड रियल इस्टेट बिझिनेस
गुंतवणूक व्यवस्थापन
  • एस. नरेन - कार्यकारी संचालक आणि चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर [८]
  • राहुल गोस्वामी - चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर - फिक्स्ड इन्कम
  • राहुल राय - हेड ऑफ रियल इस्टेट बिझनेस

उत्पादने व सेवा[संपादन]

एएमसी ही ॲसेट(संपत्ती) गटातील म्युच्युअल फंड विभागातील महत्त्वाची ॲसेट्स अन्डर मॅनेजमेंट (एयूएम) यांचे व्यवस्थापन करते. एएमसी ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील अशिलांसाठी इन्टरनॅशनल ॲडव्हाजरी मॅन्डेट्स पुरविण्याबरोबरच संपूर्ण देशभरातील गुंतवणूकदारांसाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा देते आणि त्यांची रियल इस्टेट डिव्हिजन देखील आहे.[९][१०]

म्युच्युअल फंड[संपादन]

म्युच्युअल फंड प्रामुख्याने रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदारांना सेवा देतो.[११] त्याने किरकोळ गुंतवणूकदारांना आपल्या जीवनातील उद्दिष्टे गाठण्यासाठी मदत व्हावी या हेतूने त्यांना आर्थिक उपाययोजना पुरविण्याचे काम सातत्याने केलेले आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी यांनी म्युच्युअल फंड उत्पादनांच्या उत्तम प्रकारे विभाजित असणा-या पोर्टफोलिओची निर्मिती करून ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणारी उत्पादने सादर केलेली आहेत.

पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा[संपादन]

मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचा हेतू ठेवणाऱ्या बड्या गुंतवणूकदारांना जास्त कॉन्सेन्ट्रेटेड पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा मदत करतात. सन २००० मध्ये अशा प्रकारची सेवा पुरविणारी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी ही पहिलीच इन्स्टिट्यूशनल पार्टिसिपन्ट होती आणि त्यांच्या यशस्वी कामगिरीची गेल्या १० वर्षांची नोंद आहे.[१२]

रिअल इस्टेट व्यवसाय[संपादन]

आय सी आय सी आय प्रुडेन्शियल एएमसीने सन २००७ मध्ये रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट सिरीज पोर्टफोलिओची सुरुवात करून रिअल इस्टेट विभागाद्वारे बहु भांडवली गुंतवणूकदार व स्थानिक संस्थापक गुंतवणूकदार यांना सेवा पुरविली आहे.[१३]

इन्टरनॅशनल ॲडव्हायजरी[संपादन]

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीमध्ये एक असे समर्पित विदेशी सल्लागार (डेडिकेटेड ऑफशोअर ॲडव्हायजरी) सेवा पुरविणारे युनिट आहे की ज्यामुळे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या कौशल्य-क्षमता जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना पुरविता येतात. फर्मच्या आंतराष्ट्रीय व्यावसायिक उपक्रमाशी सबंधित काही महत्त्वाचे मुद्दे खाली दिले आहेत. -

  • आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सल्लागार सेवा पुरविणाऱ्या फारच थोड्या भारतीय एएमसीपैकी आयसीआयसीआय प्रुन्डेन्शियल ए एम सी ही एक आहे.
  • सन २००६ पासून यशस्वी विदेशी सल्लागार व्यवसाय
  • जपान, तैवान, युरोप व मध्यपूर्व अशा विविध क्षेत्रांमध्ये ग्राहक पसरलेले आहेत.
  • इन्डियन इक्विटीज आणि फिक्स्ड इन्कम यांचा समावेश असणारे वेगवेगळे अकाउंट्स व फंडाची रचना यांच्या रूपाने विविध प्रकारचे ग्राहकांचे विभाग.

मुख्य स्पर्धक[संपादन]

म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे काही महत्त्वाचे स्पर्धक आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंड, रिलायन्स म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड आणि यूटीआय म्युच्युअल फंड.[१४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Budget 2016 must look at innovative ways to create demand & jobs, improve trade". २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "This is a great year for mutual fund investors, a bad year for traders: S Naren, ICICI Prudential AMC". २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "Average AUM". २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "ICICI Prudential Long Term Equity: Top-class performer, consistently". १३ फेब्रू २०१६. २९ जून २०१६ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Mutual Fund". Archived from the original on 2016-07-11. २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "Management Team". Archived from the original on 2016-07-08. २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "Nimesh Shah: Make most of volatility". १९ Jun २०१५. Archived from the original on 2015-06-21. २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "Sankaran Naren of ICICI Prudential MF does things pre-mortem than post-mortem". 16 October 2012. Archived from the original on 2016-09-17. २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "About ICICI Prudential Mutual Funds". Archived from the original on 2016-07-08. २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "Nimesh Shah, MD and CEO, ICICI Prudential Asset Management Views on Current State of Market". २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "Q & A: Nimesh Shah, MD & CEO, ICICI Prudential AMC". 13 October 2010. २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "PMS (Portfolio Management services)". Archived from the original on 2016-05-11. २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "About Real Estate Investment". Archived from the original on 2016-07-19. २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ "Top Fund Houses". 18 Feb 2016. Archived from the original on 2016-06-21. २९ जून २०१६ रोजी पाहिले.

एक्स्टर्नल लिंक्स[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ