सुभाष पाळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुभाष पाळेकर (जन्म : बेलोरा (अमरावती जिल्हा, इ.स. १९४९) हे पद्मश्री पुरस्कारविजेते शेतीतज्‍ज्ञ व शेतकरी आहेत. 'झीरो बजेट' या संकल्पनेवर आधारित नैसर्गिक शेतीचे ते पुरस्कर्ते आहेत. जमिनीच्या आरोग्याबरोबरच शेतकऱ्याचा जीवही धोक्यात, त्यामुळे सुभाष पाळेकरांचा रासायनिक शेतीला कडाडून विरोध होता.[१] म्हणूनच त्यांनी कमी खर्चाची 'झिरो बजेट' शेती करायला सुरुवात केली. शेण, वनस्पती इत्यादी उपलब्ध नैसर्गिक गोष्टींचा वापर करून कमी खर्चाची व रासायनिक खतांशिवायच्या शेतीला ते आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) शेती म्हणतात.

नैसर्गिक शेती यशस्वी करण्यासाठी त्यांनी नैसर्गिक साहित्य वापरून जीवामृत व बीजामृत या दोन द्रव्यांची निर्मिती केली. जीवामृत या मिश्रणात त्यांनी वापरलेले गाईचे शेण जमिनीमधील गांडुळांना सुप्त अवस्थेमधून जागे करण्यासाठी गंधनिर्मितीचे कार्य करते. पाळेकर निसर्गशेतीमध्ये आंतरपीकबहुपीक पद्धती वापरतात.

लेखन[संपादन]

शेतीसंशोधक असलेल्या पाळेकरांनी शेतक‍ऱ्यांसाठी 'द फिलाॅसाॅफी ऑफ स्पिरिच्युअल फार्मिंग' व 'झीरो बजेट नॅचरल फार्मिंग' ही पुस्तके इंग्रजी भाषेत लिहिली आहेत.

पुरस्कार[संपादन]

  • पद्मश्री पुरस्कार (इ.स. २०१६)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ गजानन उमाटे आणि प्राजक्ता धुळप (२२ डिसेंबर २०१७). "एकही पैसा खर्च न करता अशी करा 'झिरो बजेट' शेती". बी.बी.सी. मराठी. २३ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.