शेण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतातील शेणाच्या गोवऱ्यांचा ढीग

भारतात सहसा, गायम्हैस वर्गातील जनावरांच्या विष्ठेस शेण म्हणतात. या शेणाचे अनेक उपयोग आहेत.

ओले म्हणजे ताजे शेण व वाळलेले शेण दोन्हीही वापरता येते. शेणाचा शेतासाठी खत म्हणून वापर करताना, त्याला किमान सहा महिने कुजवून शेणखत बनवले जाते. ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी गांडूळाचा वापर केल्यास त्याला गांडूळ खत म्हणतात. जर नुसतेच कुजवले तर शेणखत म्हणतात. हे शेण नैसर्गिक पद्धतीने नुसते कुजवण्याचे काम ज्या जागेत जेथे होते त्या ठिकाणाला शेणखाई असे म्हणण्याची पश्चिम महाराष्ट्रात पद्धत आहे.अशा प्रकारे तयार झालेले खत हे सेंद्रिय शेती साठी वापरण्यात येते.

शेणाचे अन्य उपयोग[संपादन]

  • ग्रामीण भागातले पारंपारिक घर सारवायला शेण वापरले जाते.
  • शेण थापून वाळवून 'गोवरी' करून चुलीत इंधन म्हणून जाळली जाते.ग्रामीण भाषेत यांना 'शेण्या' असेही म्हणतात.रानात गाईम्हशी चरतांना त्यांनी विष्ठात्याग केल्यावर, तेथेच नैसर्गिकरित्या वाळलेल्या गोवऱ्यांना 'रानगोवऱ्या' म्हणतात.
  • गायीच्या शेणाच्या बनवलेल्या गोवऱ्या धार्मिक कार्यात वापरल्या जातात.धार्मिक कार्यात वापरण्यात येणाऱ्या गोवऱ्यांना 'शोभण्या' म्हणण्याची पद्धत आहे.
  • हिंदू धर्मात मृताचे अंत्येष्टीचे वेळी गोवऱ्या वापरण्याची पद्धत आहे. दहनसंस्काराचे वेळी अग्नी हा गोवऱ्या वापरून प्रज्वलीत केल्या जातो.
  • शेणाचा उपयोग, बायोगॅस संयंत्र वापरून बायोगॅस निर्मितीसाठीही होतो.हा निर्माण झालेला बायोगॅस जळण व इंधन म्हणून वापरण्यात येतो.
  • शेण व गांडूळ यांचा वापर करून उत्तम असे गांडूळखत तयार करता येते.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. शेणखत स्लरी ड्रिप मधून