भारतीय जनता पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय जनता पक्ष
पक्षाध्यक्ष अमित शहा
सचिव अरूण जेटली
संसदेमधील पक्षाध्यक्ष नरेंद्र मोदी
लोकसभेमधील पक्षनेता नरेंद्र मोदी
राज्यसभेमधील पक्षनेता अरूण जेटली
स्थापना १९८०
मुख्यालय ११, अशोका रोड,
नवी दिल्ली - ११०००१
युती राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभेमधील जागा ११६
राज्यसभेमधील जागा ४८
राजकीय तत्त्वे हिंदुत्व,सामाजिकता,समान नागरिकत्व/समानता
संकेतस्थळ बीजेपी.ऑर्ग

भारतीय जनता पक्ष (भाजप) हा मूळच्या भारतीय जनसंघ या पक्षाचेच नवीन रूप आहे.

कटिबद्धता[संपादन]

पक्षाच्या घटनेनुसार.[१] सदर पक्ष राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, गांधीजीनी सुचवलेला समाजवाद, सकारात्मक सेक्युलॅरिझम अर्थात 'सर्व धर्म समभाव' आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सदर पक्ष आर्थिक व राजकीय शक्तीच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने उभा असल्याचेही पक्षाच्या घटनेत म्हटले आहे.

पक्षांतर्गत संरचना[संपादन]

या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षांनंतर, अधिकची तीन वर्षे म्हणजे सलग ६ वर्षे अध्यक्षपदी राहता येऊ शकते. अध्यक्षाची निवडणूक करताना जर एकाहून अधिक उमेदवार असतील तर प्रत्येक राज्याच्या राजधानीत मतदान होते. नॅशनल काउन्सिलच्या सगळ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरी, कोशाध्यक्ष आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही.

मार्गदर्शक मंडळ मार्गदर्शक मंडळ नावाचे ज्येष्ठांचे परंतु एक्झिक्युटिव्ह अधिकार नसणार्‍या विशेष सल्लागार मंडळाची उभारणी केली आहे.[२] यातील सद्य सदस्यः

नॅशनल एक्झिक्युटिव्व्ह्ज भाजपामध्ये "नॅशनल एक्झिक्युटिव्ह्ज" अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पार्लमेंटरी बोर्ड आहे. त्याला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष या गटाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नाही. सध्या या गटाचे १२ सदस्य आहेत.: ज्यात अमित शहा हे चेअरमन, अनंत कुमार हे सेक्रेटरी आहेत. याव्यतिरिक्त यातील सद्य सदस्यः

नॅशनल काउन्सिल भाजपामध्ये 'नॅशनल काउन्सिल' नावाची कार्यकारिणी आहे. हा पक्षातील विविध ज्येष्ठ व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा मोठा गट आहे.. यात सद्य अध्यक्षांसोबत सर्व माजी पक्षाध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष, पक्षाचे सर्व खासदार (लोकसभा व राज्यसभेतील), पक्षाचे सर्व आमदार (विधानसभा व परिषदांतील), राष्ट्रीय कार्यकारीणीतील सर्व सदस्य व सर्व संलग्न मोर्चा/विभागांचे अध्यक्ष यांचा समावेश होतो.

सेंट्रल इलेक्शन कमिशन या व्यतिरिक्त 'सेंट्रल इलेक्शन कमिशन' नावाच्या गटाकडे विविध प्रांतातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. या गटातही किती व कोणते सदस्य असावेत यावर संख्येचे बंधन नाही. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य या गटाचेही सदस्य असतातच. त्यांच्या व्यतिरिक्त सध्या या गटामध्ये जुरल ओरम, शाहनवाज हुसेन, विनय कटियार, जे.पी.नड्डा, डॉ. हर्षवर्धन, सरोज पांडे यांचा समावेश आहे.

डिसिप्लनरी कमिटी पक्षांतर्गत तक्रारींच्या निवारणासाठी आणि पक्षाच्या सदस्यांवर तसेच ऑफिस बेअरर्सवर कारवाई करण्याचा अधिकार असणारी 'डिसिप्लनरी कमिटी' हा ५ सदस्यांचा अजून एक स्वायत्त गट पक्षात आहे. सध्या या गटाचे अध्यक्ष श्री राधा मोहन सिंग करत आहेत. तर श्री जगदीश मुखी हे सेक्रेटरी आहेत.

नॅशनल सेल्स याचबरोबर विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, अंत्योदय योजनेपासून, मजदूर महासंघ, प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष[संपादन]

अन्य महत्त्वाचे नेते[संपादन]

हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]