दत्तात्रेय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


दत्त (दत्तात्रेय) हा हिंदू धर्मातील एक देवयोगी आहे. हा अत्रि ऋषी व त्यांची पत्नी अनसूया यांचा पुत्र असून त्याला दुर्वाससोम नावाचे दोन भाऊ आहेत[१]. हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णु, ब्रह्माशिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले[२].

दत्ताचा उल्लेख त्याचे साधक परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे वेदातील पाचव्या मंडळातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, आणि महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे बंधू, ही दत्ताचे नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत.


संप्रदाय[संपादन]

एक महान योगी म्हणून दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, लीळाचरित्र,दत्त संप्रदाय, तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक उपास्यदैवत मानतात.

उपासनेची वैशिष्ट्ये[संपादन]

दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते.सगुण प्रतीके उपलब्ध असलीतरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते. अवधूत गीतेत दत्तात्रेय जातिव्यवस्थेस मानताना दिसत नाहीत पण उत्तरकाळातील दत्तभक्ती संप्रदयांनी जातिव्यवस्था बळकट होऊ देण्यास हातभार लावल्याचेही आढळून येते.

संप्रदायाचे ग्रंथ[संपादन]

श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला. परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्‍नास खंडांची रचना केली. सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.

अथर्ववेदात दतात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.

संबंधित ग्रंथ[संपादन]

  • श्रीगुरुचरित्र
  • दत्तप्रबोध
  • दत्तमाहात्म्य
  • गुरुलीलामृत
  • श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश (संपादक डॉ. प्र.न. जोशी)

संदर्भ[संपादन]

  1. डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव: 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश'- (खंड १), इ.स. १९६८, भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे. (मराठी मजकूर) 
  2. रा.चिं. ढेरे. 'दत्त संप्रदायाचा इतिहास', इ.स. १९९९, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. आय.एस.बी.एन. ८१-८६१७७-११९-११९. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.