ध्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते.ध्यान हे आनंदाप्रत पोचण्याचे द्वार आहे.प्रार्थना,अनुष्ठाने व उपासनेचे इतर सर्व प्रकार हे ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे होत.सावकाशपणे व पायरीपायरीने आपण आपल्याला वळण लावायचे असते.[१]

योग[संपादन]

स्वतःला काही प्रत्यक्ष अनुभूती आल्याखेरीज कुणीही धार्मिक या संज्ञेस पात्र होऊ शकणार नाही.या अनुभूती कशा प्राप्त करून घ्याव्यात हे शिकवणारे शास्र म्हणजे योग.आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याचा योग एक आश्चर्यकारक पद्धति आहे. पण तुम्हाला माहिती आहे की योग एक उत्तम शारीरिक व्यायाम देखील आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की हठयोग किंवा योगाच्या शारीरिक बाबींमध्ये विशिष्ट शरीर मुद्रा किंवा संरेखन व्यायामांचा समावेश आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक शारीरिक तंदुरुस्ती मिळविण्यात मदत होते.

स्वामी विवेकानंंद म्हणतात[संपादन]

आध्यात्मिक जीवनाला जर सर्वात जास्त सहाय्य कशाचे होत असेल तर ते ध्यानाचे होय.ध्यानामधे आपण आपल्या सर्व भौतिक उपाधी टाकून देतो आणि आपल्या दिव्य स्वरूपाचा अनुभव घेतो. 'मी देह नाही,मी आत्मा आहे' ;अखिल विश्व, त्यातील सर्व संबंध,त्यातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी ह्या म्हणजे जणूकाही पडद्यावरील चित्रमालिका होत अणि मी त्यांचा केवळ साक्षी आहे' ही भावना म्हणजे आध्यात्मिक जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली होय. (ग्रंथावली खं.८, पृ.३४—३५)[२]

ध्यान म्हणजे एकाग्रता[संपादन]

विद्यार्थी ध्यान करताना

ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते.ध्यान हे आनंदाप्रत पोचण्याचे द्वार आहे.प्रार्थना,अनुष्ठाने व उपासनेचे इतर सर्व प्रकार हे ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे होत.सावकाशपणे व पायरीपायरीने आपण आपल्याला वळण लावायचे असते.तज्ञांचे म्हणणे आहे की हठयोग किंवा योगाच्या शारीरिक बाबींमध्ये विशिष्ट शरीर मुद्रा किंवा संरेखन व्यायामांचा समावेश आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक शारीरिक तंदुरुस्ती मिळविण्यात मदत होते.पण तुम्हाला माहिती आहे की योग एक उत्तम शारीरिक व्यायाम देखील आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की हठयोग किंवा योगाच्या शारीरिक बाबींमध्ये विशिष्ट शरीर मुद्रा किंवा संरेखन व्यायामांचा समावेश आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक शारीरिक तंदुरुस्ती मिळविण्यात मदत होते.


विद्यार्थिपणात अभ्यासावर ध्यान करावे लागते. आपल्यापाशी असलेले ज्ञान दुसऱ्याला देताना एकाग्रता लागते. अर्जुनाला दिसणारा पोपटाचा डोळा हे अर्जुनाचे ध्यान आहे. एखाद्या विषयावर आपले लक्ष्य पूर्णपणे केंद्रित करणे हेही ध्यानच आहे. ध्यानातली एकाग्रता ही आपल्या जाणिवेचा दरवाजा उघडण्याची चावी आहे. यासाठी मनाची इतर दारे बंद करावी लागतात. एकाग्रता प्रथम अंतःकरणात प्रवेश करते आणि मग ती हव्या त्या शाखेत संचार करते. श्रीमाताजी म्हणतात, ‘प्रथम अस्तित्वाची एकता; मग हृदयाची शुद्धता यामुळे एकाग्रता साधते. याने ईश्वरी स्पर्श लाभतो. एकाग्रतेतील नीरवता मनाला स्थिर ठेवते. पृष्ठभागावरील हालचालींना पायबंद घालते. जाणीव नवी होते. ती अकारण विचारलहरींना थांबविते. मग आपण मनाच्या उच्च पातळीवर सहज पोहोचतो. दिव्य स्फूर्तीची ग्रहणक्षमता आपल्यात येते. शांती, नीरवता, आनंद यांचा जो लाभ करून देते ती साधना! आपले पार्थिव, प्राणिक, मानसिक अस्तित्व आपल्यातल्या प्रभुशरणतेच्या साधनेशी सतत लढते. म्हणून मनःशांतीला भारतीय दर्शनांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मनःशांतीने आपल्या नव्या कामात समतोल येतो. कामात पूर्ण रंगतो. मनास छान वाटते. कामातले ओझे संपते. अवघडपणा कोणताही मावळतो. अदृश्य शक्ती येते. ती आपल्याला पाहाते. आपला आधार होते. मनाला उंची देते. कामात देवत्व येते. सारे देव करतो. संतांचा भाव येतो. मनाला ताजेपण येते. कामाने परिस्थिती बदलते. वृत्ती पालटते. मनाचे आजार संपतात. ‘स्थिरसुखमासनम्’ ही व्याख्या आठवते. ही पतंजलींची व्याख्या आहे. ती साऱ्यांनी स्वीकारली आहे. आसनापेक्षा ध्यानात सहजता हवी. आपण ज्या विविध चालण्या-बोलण्याच्या आदि क्रिया करतो, त्याला कृतिशील ध्यान म्हणतात. केवळ ध्यानासाठी जे ध्यान होते त्याला निष्क्रिय ध्यान म्हणतात. श्री अरविंदांच्या मते; मनन व चिंतन या ध्यानाच्या चढत्या पायऱ्या आहेत.


अष्टांग योग
यमनियमआसनप्राणायामप्रत्याहारधारणासमाधी


प्रार्थनास्वतःला काही प्रत्यक्ष अनुभूती आल्याखेरीज कुणीही धार्मिक या संज्ञेस पात्र होऊ शकणार नाही.या अनुभूती कशा प्राप्त करून घ्याव्यात हे शिकवणारे शास्र म्हणजे योग.आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याचा योग एक आश्चर्यकारक पद्धति आहे. पण तुम्हाला माहिती आहे की योग एक उत्तम शारीरिक व्यायाम देखील आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की हठयोग किंवा योगाच्या शारीरिक बाबींमध्ये विशिष्ट शरीर मुद्रा किंवा संरेखन व्यायामांचा समावेश आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक शारीरिक तंदुरुस्ती मिळविण्यात मदत होते.

  1. ^ ध्यान आणि त्याच्या पद्धती, स्वामी विवेकानंंद, संंपा..स्वामी चेतनानंद,रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २॰१२
  2. ^ ध्यान आणि त्याच्या पद्धती, स्वामी विवेकानंद, संपा.स्वामी चेतनानंद,रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २॰१२