ब्रह्मदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रह्मदेव
Brahma Halebid.jpg
हळेबिडू येथील मंदिरातील ब्रह्मदेवाचे शिल्प
संस्कृत ब्रह्मा

ब्रह्मदेव (किंवा ब्रह्मा) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा देव आहे. तीन प्रमुख देवांपैकी (त्रिमूर्ति) ब्रह्मदेव एक आहे (विष्णूशंकर हे इतर दोन देव). भगवान ब्रह्मदेवाला सूष्टीचा निर्माता मानले जाते.

हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेवाचा जन्म विश्वाच्या सुरुवातीला भगवान विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या एका कमळाच्या फुलातून झाला.