योग
शब्दश: अर्थ :जोडणे (संस्कृत युज्: जोडणे). प्राचीन भारतीय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीची चिकित्सापद्धत. जीवात्मा आणि विश्वात्मा यांच्यातील एकत्व अनुभवण्याची पद्धत.
यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास अष्टांगयोग असेही म्हटले जाते.
बरेचदा योगासने या अर्थी योग या शब्दाचा वापर होतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] योगाचे प्रकार
भारतीय योग शास्त्र मध्ये योगचे पांच प्रकार सांगितले आहेत -
- ज्ञान योग -- आत्मज्ञान,
- हठ योग -- आसन आणि कुण्डलिनी जागृति
- कर्म योग -- योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग)
- भक्ति योग -- भजनकुर्याम-भजन करा.
- राजयोग -- योगः चित्तवृत्ति निरोधः (चित्तातील वृत्तिंवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे)
पतंजलिंनी योग चा अर्थ चित्तातील वृत्तिंवर निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाचे आठ अंग आहेत, जे खालिल प्रमाणे आहेत:
- यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग
- नियम (स्वाध्याय, सन्तोष, तप, पवित्रता, आणि ईश्वर च्या प्रति चिन्तन) बाहेरचे अंग
- योगासन बाहेरचे अंग
- प्राणायाम बाहेरचे अंग
- प्रत्याहार बाहेरचे अंग
- धारणा आतले/मानसीक अंग
- ध्यान आतले/मानसीक अंग
- समाधी आतले/मानसीक अंग
योगश्चित्तवृत्ति निरोधः। या सूत्राचा अर्थ आहे - योग तो आहे जो देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मां पर्यंत आत्म-दर्शनापासून वंचित रहाण्यापासून वाचवतो• चित्तवृतिंच्या निरोध (दमनाने)नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होउ देणे होय•
योगाचा मूळ सिद्धांत ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय• याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमध्ये - महाभारत, उपनिषद, पतञ्जलिंचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका मध्ये मिळतात•
योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे• योग ची लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय• चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभांन्वित होउ शकतात• व्यक्तिंच्या निर्माण आणि उत्थान मध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहुंमुखी विकासामध्ये ही याचा उपयोग सिद्ध झाला आहे• योग मनुषयामध्ये सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे• जिला करोड़ो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनिंनि आविष्कृत केले होते• महर्षि पतंजलिनी अष्टांग योग च्या रूपात याला अनुशासनबद्ध, सम्पादित आणि निष्पादित केले•
[संपादन] अर्थ आणि परिभाषा
जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्मा बरोबर मिलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये याला योगच्या ऐवजी 'योगा' संबोधिले जाते. योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश्य असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मीळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे.
योग वैदिक/हिंदू तत्त्वशास्त्रात सहा विचारधारांमध्ये दर्शनएक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोग बरोबर आहे जो एक ब्रह्मन् मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानचा राजसी मार्ग आहे.
हिंदू धर्मात योगाचे कित्येक प्रकार पण आहेत उदा. निष्काम कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग विवेकपूर्ण ध्यान.
योग वर पतञ्जलि मुनिंनी योगसूत्र जवळजवळ १५० ई.पू. मध्ये लिहीले. पतंजलिंच्या अनुसार अष्टांग योग चे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते . याच अष्टांग पथ ने नंतर येणाऱ्या राज योग, तन्त्र आणि बौध वज्रयान योग चा पाया टाकला.
| अष्टांगयोग |
|---|
| यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधी |
[संपादन] योग गैलरी
-
Vajra Asana-Thunderbolt-Diamond Wiki.jpg
-
Vrischika asana-Scorpion pose Wiki.jpg