श्रीगुरुचरित्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info non-talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


श्रीगुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाणारे श्रीनृसिंहसरस्वती यांच्या बद्दलचा चरित्र ग्रंथ आहे गुरूचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्ध यांची असावी असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे मुळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही सध्या उपलब्ध श्रीगुरूचरित्राची मराठी भाषेतील रचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी आणि रचना करण्यास मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार उपलब्ध असण्याची शक्यता असु शकते असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे

सरस्वती गंगाधर हे श्रीनृसिंहसरस्वतींचे एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.

ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.

मूळ गुरुचरित्र ५१ अध्यायांचे होते. आणि अवतरणिका हा अध्याय नंतर जोडला गेला असे काही अभ्यासकांचे मत आहे. गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. सरस्वती गंगाधर यांची मातृभाषा कानडी होती. त्यामुळे कानडी भाषेतील काही लकबी त्यात आढळतात. गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदांत आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही.

हे सुद्धा पहा [संपादन]