माती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मातीचे वेगवेगळे स्तर

मृदा :

मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक,प्रादेशिक हवामान ,जैविक घटक ,जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदानिर्मिती होते.मृदा म्हणजे माती नव्हे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा ,अर्धवट किवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्म जीव मृदेमध्ये असतात.मृदेत जैविक आमी अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात.वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात.मृदा हि एक परिपूर्ण परिसंस्था आहे. याउलट माती हा एक पदार्थ आहे .थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा.शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या परिसंस्थेचा वापर करतो.

माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात.नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत: ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती पाण्याचे धारण, पुरवठा व शुद्धी करते. पृथ्वीच्या वातावरणात ती बदल घडवून आणते. ती जीवांचे वसतीस्थान आहे, हे सर्व प्रकार सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात.मातीचे प्रकार रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत. मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात.यातील सच्छिद्रता वायू व पाणी धरून ठेवते. तसेच ही एक घन, वायू व पाणी(तरल पदार्थ) धरून ठेवण्याची एक त्रिस्तरीय प्रणाली समजल्या जाते. माती खूप उपयोगी असते . माती शिवाय कुठलाच झाड उगवू शकत नाही.

मृदानिर्मितीसाठी आवश्यक घटक :

  1. मूळ खडक : प्रदेशातील मूळ खडक हा मृदानिर्मितीचा महत्वाचा घटक असतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मृदा अवनती

मानवीय आणि नैर्सगिक घटकामुळे मृदा अवनती होते. जंगलतोड ,अतिचराई ,रासायनिक खते व किटकांचा अतिवापर ,भूस्खलन ,पूर इ.होय .

मृदा अवनती रोखण्यासाठी काही पद्धती

  • १.पाचरण
  • २.दगडी बांध
  • ३.टेरेस फार्मिंग
  • ५.आंतर पिके
  • ६.शेल्टर बेल्ट

मृदा वर्गीकरण :

१. गाळाची मुदा

२.काळी मृदा

३. तांबडी मृदा

४ .लॅटारेट मृदा

५.वन मृदा

६.शुष्क मृदा