मोहेंजोदडो
Jump to navigation
Jump to search
'मोहेंजोदडो(मृतांचा डाेंगर)' हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील गाव आहे. येथे केल्या गेलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एकावरएक ७ गावांचे थर आढळले आहेत.
मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. या खोल्यांजवळ एक विहिरही होती. या स्नानगृहात वापरलेले सांडपाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. याच्या भिंती जलरोघक बनवलेल्या होत्या. याचे संशोधन एका ब्रिटिश पुरातत्त्वज्ञाने 1901 ते 1931 या काळात केले. त्या ब्रिटिश पुरातत्त्वज्ञचे नाव सर जॉन मार्शल असे होते. या संशोधनानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेक ग्रंथांची उत्पत्ती करण्यात आली.