कालीबंगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कालीबंगन भारताच्या राजस्थान राज्यातील हनुमानगढ जिल्ह्यात असलेले गाव आहे. घग्गर नदीच्या डाव्या काठावर वसलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने २००३ साली प्रकाशित केलेल्या अहवालानुसार कालीबंगन हडप्पा संस्कृतीमधील महत्त्वाचे शहर होते.