नाट्यशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्री सिध्देश्वर महाविद्यालय माजलगाव ला ऐच्छिक विषय म्हणून नाट्यशास्त्र हा विषय घेता येतो

इतिहास[संपादन]

भारतातील नाट्य[संपादन]

भासाचे नाट्यशास्त्र[संपादन]

भरतमुनींचे नाट्यशास्त्र[संपादन]

भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली असा समज आहे. नाट्य शास्त्राई निर्मिती इ.स.पू. ४०० ते इ.स.च्या २ ऱ्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे मानतात . भारतीय नाट्य आणि नृत्य शास्त्राची मूळ कल्पना या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे. हे नाट्यशास्त्र दहा विभागात विभागले गेले आहे. त्यांच्याच नावामुळे भरताचे भारत हे या भूमीचे नामकरण झाले असावे असे म्हणतात.भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती केली, या ग्रंथाचा अभ्यास केला तर असे लक्षात येयील कि इसवी सनाच्या पूर्वार्धापासून भारतामद्धे नाट्यकला हि प्रगतीशील अवस्थेत पोहोचली होती, त्यामद्धे केलेले रंगमंचाचे व नाट्यगृहाचे वर्णन किवा आराखडा आपण आजही वापरतो, ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून ज्ञान व अथर्ववेदातून रस घेऊन ब्रम्हदेवाने हा पाचवा वेद निर्माण केला आहे असे भरतमुनींनी लिहिले आहे, भरत मुनींनी लिहिलेल्या नाट्य शास्त्रात अंगिक, वाचिक, भाविक व आहार्य या अभिनय प्रकारांची माहिती तर दिलेली आढळतेच पण सोबतच नृत्य शास्त्रावर देखील सावस्तर माहिती देण्यात आलेली आहे. रस, नाटकातील पात्रे, रंगमंदिराचे वर्णन, रंगमंचाचा आकार, प्रेक्षागृह, रंगभूषा व वेशभूषेसाठी जागा तसेच प्रवेश करण्यापूर्वी पात्रांना लागणारा आडोसा याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आढळतो, नाटकामद्धे काय काय वर्ज्य असावे याबाबतही भरत मुनींनी लिहून ठेवलेले आहे.

कालिदासाचे नाट्यशास्त्र[संपादन]

आधुनिक अभ्याक्रम[संपादन]

  • नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा - नाट्यविषयक सखोल आणि अद्ययावत शिक्षण देणारी ही एक जागतिक दर्जाची नामांकित शिक्षण संस्था आहे.
  • मुंबई विद्यापीठ - मुंबई विद्यापीठात ‘थिएटर ऑफ आर्टस्’ हा अभ्यासक्रम शिकवला जातो.
  • पुणे विद्यापीठ - ललित कला केंद्र अभ्यासक्रम
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद - या विद्यापीठात नाट्य विषयाचा एक वर्षीय तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
  • महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा - नाट्यकलेत एम. ए. करण्याची सुविधा
  • गोवा कला अकादमी
  • भारतेंदू अकादमी ऑफ ड्रामाटिक आर्टस्, लखनौ
  • सरस्वती भुवन महाविद्यालय , औरंगाबाद येथे बी.ए. ला ऐच्छिक विषय म्हणून नाट्यशास्त्र हा विषय घेता येतो हे महाविद्यालय बी.ए. ला नाट्यशास्त्र विषय सुरु करणारे पहिले महाविद्यालय
 आहे.नाट्यविषयक अतिशय सखोल तसेच उपक्रम शील नाट्य विभाग म्हणून मराठवाड्यात परिचित .

हेही पहा[संपादन]

सरस्वती भुवन महाविद्यालय , औरंगाबाद येथे बी.ए. ला ऐच्छिक विषय म्हणून नाट्यशास्त्र हा विषय घेता येतो.

बाह्य दुवे[संपादन]