नाणकशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करून नाण्यांच्या सर्वसमावेशक अभ्यास करणाऱ्या शास्त्राला नाणकशास्त्र (Numismatics) म्हणतात. प्राप्त झालेल्या नाण्यांचा अभ्यास करीत असताना ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी केली जाते आणि मग निष्कर्ष काढले जातात. नाण्यांच्या प्रदर्शनातून संबंधित कालखंडाची वैशिष्ट्ये सांगता येतात व आजच्या कालखंडाशी त्या त्या काळातील नाण्यांच्या आधारे तुलनात्मक विवेचन करता येते.

वस्तू विनिमया द्वारे धनाची देवाणघेवाण करताना येणाऱ्या अडचणींमुळे नाणी हे चलन वापरात आले. पूर्वी कवड्या, शंख, मणी अश्या अनेक गोष्टी पैसा म्हणून वापरल्या जायच्या. धातूंच्या शोधानंतर धातूंच्या चकत्या बनवून त्यावर तत्कालीन राजाचे चिन्ह कोरणे किंवा छापणे त्याचा वापर व्यापारासाठी नाण्याच्या रूपात होऊ लागला.

नाण्यांतून तत्कालीन संस्कृतीची ओळख मिळू शकते. त्या त्या वेळी समाजात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी, प्रभावी व्यक्ती, महत्त्वपूर्ण घटना नाण्यांवर कोरल्या जातात. यामुळे नाणी ही इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मोलाची ठरतात.

छंद[संपादन]

अनेक लोक छंद म्हणून विविध प्रकारच्या जुन्या व नवीन नाण्यांचा संग्रह करतात.हा छंद भविष्यात खूप उपयोगी पडतो.

विविध देशांतील नाणी, एखाद्या विषयावरील चित्रे असणारी नाणी, एखाद्या विशिष्ट वर्षात टाकसाळीतून बाहॆर पडलेली नाणी, एका विशिष्ट टाकसाळीतून बनवली गेलेली नाणी, अशांचा संग्रह करणारे संग्राहक आहेत.. ब्रिटिशकालीन भारतातील नाणी, संस्थानांनी चलनात आणलेली नाणी, शिवाजीकालीन, मोगल कालीन नाण्याचा संग्रह करणारे संग्राहक आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक संग्रहाकांसाठी काही विशेष प्रकारची नाणी प्रसिद्ध करते -

  • प्रूफ नाणी - यांमध्ये साधारणतः ५० टक्के चांदी असते. तसेच या नाण्यांचा दर्जा अतिशय उच्च असतो.
  • अ- प्रचलित नाणी - (uncirculated coin) - ही नाणी टाकसाळीतून बाहेर पडतात पण चलनात आणली जात नाहीत. अशा विशेष नाण्यांमध्ये एक हजार रुपये, साठ रुपये, सवाशे रुपये अशा मूल्याचीही नाणी असतात.