सदस्य चर्चा:Sankalpdravid/जुनी चर्चा ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) Complimentory-copy.png[संपादन]

चांदणे शिंपित जा ...!
Star5.png
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

Gaurav-samiti.png

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
 • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
 • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळावा, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

 • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
 • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
 • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
 • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

Nuvola apps kalarm.png २०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

 • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
 • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
 • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
 • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
 • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
 • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
 • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
 • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

Wikisource-logo.png

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


 • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

Face-espiegle.svg वाचकांच्या प्रतिक्रिया

 • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
 • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
 • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
 • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
 • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
Evolution-tasks-old.png
Wikibar-news.png मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) Complimentory-copy.png[संपादन]

२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
Fireworks.gif
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
 • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
  CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

 • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
 • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

Nuvola apps kalarm.png २०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

 • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
 • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
 • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
 • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
 • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

 • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
 • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
 • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
 • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
 • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
Evolution-tasks-old.png
Wikibar-news.png मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


प्रिय मित्र मी तामिल क्यूब वापरून सध्या अनुभववाद हे पण लिहित आहे तो पाहून सूचना कराव्यात ही विनंती. तसेच बुद्धिवाद हे पान ही मी लिहिन्. धन्यवाद

तपासून पहा[संपादन]

 • नमस्कार संकल्प,
थोडा वेळ मिळाला तर मी "साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका" बनवला आहे. आपणासही वेळ मिळाला तर तपासून पहा आणि अभिप्राय कळवा.
धन्यवाद
राहुल देशमुख ०७:१७, १९ जून २०११ (UTC)


 • संकल्प नमस्कार,
साचा साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका मी अनेक क्रमपरिवर्तन आणि संयोजन द्वारे तपासून पहिला. साचा अपेक्षे प्रमाणे व्यवस्थित काम करतो आहे. हमलोग (दूरचित्रवाहिनी मालिका) पानावर आपणास पहाता येईल.
यापूर्वी मी बनवलेला साचा:माहितीचौकट मासिक साच्याचे वापराविषयीचे दस्तऐवजीकरण तयार केलेले नाही (आपणा कडून हिरव्या कंदिलाच्या प्रतीक्षेत). हा साचा मीच ६० - ७० लेखांमध्ये वापरल्याने तो सुद्धा व्यवस्थित काम करतो आहे असे दिसते.
मदतीबद्दल धन्यवाद
राहुल देशमुख ०४:११, २० जून २०११ (UTC)

मोडकी पुनर्निर्देशने[संपादन]

संकल्प,

काल रात्री विभिजैन या सदस्याने सगळ्या मोडक्या पुनर्निर्देशनांवर पानकाढा साचा लावलेला दिसत आहे.

यातील सगळीच पुनर्निर्देशने काढण्याच्या लायकीची नाहीत. काही पाने चुकीच्या पण वापरले जाण्याची शक्यता असलेल्या अशुद्धलेखनाकडून अचूक शीर्षकाकडे असलेली पुनर्निर्देशने दिसत आहेत. अशी पाने राहू द्यावीत असे मला वाटते.

अभय नातू १५:०९, २४ जून २०११ (UTC)

Sortable tables[संपादन]

संकल्प,
Sortable tables मधे मराठी आकडे चालत नाहीत का? मराठी आकडे वापरले की sorting यशस्वी होत नाही. उदा, अमेरिकेची राज्ये हा अपूर्ण लेख पहा. क्षेत्रफळाचे क्रम इंग्लिश आकड्यांमध्ये आहेत जे sort होतात पण इतर columns sort होत नाहीयेत.

सांगकाम्या संकल्प - इ.स. दुवे[संपादन]

संकल्प,

तुझ्या सांगकाम्याने [[इ.स. १९०४|१९०४]] --> [[इ.स. १९०४]] असे दुवे बदलण्याचा झपाटा लावलेला दिसत आहे. वस्तुतः पहिल्या प्रकारचा दुवाही ठीक वाटतो, त्यात दुवा इ.स. पानाकडे असून १९०४ इतकेच लेखात दिसते. तरी बदलण्यामागे इतर दूरगामी कारण आहे का?

अभय नातू १६:०६, १ जुलै २०११ (UTC)

इ.स. २०११ असे दृश्य स्वरूप तारीख, वर्ष पानांवर असण्यापेक्षा २०११ असेच अधिक चांगले दिसते असे माझे मत आहे. तरी हे बदल उलटवावे ही विनंती.
अभय नातू ०३:१०, ६ जुलै २०११ (UTC)
मला वाटते, मूळ लेखांच्या शीर्षकांकडे दुवे नोंदवणे विकिसंकेतांना धरून आहे. त्यामुळे केवळ दिसायला चांगले दिसते, हे समर्थन पटत नाही.
१. इ.स. २०१०|२०१० असा दुवा मूळ लेखाच्या शीर्षकाकडेच जातो.
२. पानावर असंख्य ठिकाणी इ.स. ही अक्षरे वारंवार दिसतात, जे optimized नाही नुसते दिसणे नव्हे तर वाचकाचा रसभंग होऊ नये हा ही त्यातील उद्देश आहे. हा सुद्धा महत्वाचा विकिसंकेतच आहे.
अभय नातू १३:५४, ६ जुलै २०११ (UTC)
कोणत्या चुका? इतर ठिकाणी होणार्‍या चुकांच्या मानाने यांचे प्रमाण नगण्यच आहे. शिवाय आता बरीचशी पाने भरुन झालेली असल्यामुळे अधिक चुका होण्याचा संभवही कमीच आहे. सांगकाम्या वापरून अशा चुका सुधारणे सहज शक्य आहे.
खाण्याचे/दाखवण्याचे दात ही तर विकिवरील मोठी सोय आहे. ती वापरण्यास बंधन नसावे.
हे दुवे घाउक प्रमाणात बदलण्यामागची तुझी कारणे मला पटलेली नाहीत.
अभय नातू ०२:५३, ७ जुलै २०११ (UTC)


 • नमस्कार अभय आणि संकल्प

मी आपण लोकांमधील इ.स. च्या दृश्य स्वरूपा वरूनची चर्चा वाचत होतो. चर्चा आता बहुतेक निर्णयाप्रत आलेली दिसते पण निर्णय सर्वानुमते झालेला दिसत नाही म्हणून मी काही निरीक्षणे आणि माझे मत (नमागता) देत आहोत क्षमा असावी.

संकल्पांच्या संकल्पनेत तथ्याउंश आहे असे वाटते कारण

 1. सदस्याला संपादन करताना इ.स.१९५७ असे करणे सोपे असल्याने (फक्त[[) विकीकरणाचे प्रमाण वाढेल, अंतर्गत दुव्यांचे प्रमाण वाढेल आणि वर्गीकरण अधिक होईल. (मुख्यतः सदस्य/संपादन हा केंद्रबिंदू मानून निर्णय ध्यावे )
 2. ह्या पद्धतीत कमी बाईटस लागतील
 3. रस भंग: -

उदा. - १८५७ च्या उठवत १८७५ स्वातंत्र सैनिकांनी भाग घेतला.

. इ.स. १८५७ च्या उठवत १८७५ स्वातंत्र सैनिकांनी भाग घेतला.

वरील वाक्यांमध्ये इ. स. सहित तारीख लिहणे अधिक सोयीस्कर दिसते. (एका संखेला दुवा आणि दुसरीस नाही ???)' थोडक्यत इतर संख्यान पासून तारखांना वेगळे दाखवावे आणि त्या साठी इ.स. चा उपसर्ग म्हणून वापर करण्यास हरकत नसावी.' ह्या मुळे रसभंग नहोता वाचन अधिक सुलभ होईल. इतर ऐतिहासिक साहित्यात पण इ.स. लिहिण्याची पद्धत आहेच.

मला असे वाटते कि विपी वर आपण दिनांक लिहण्याचे स्थायी स्वरूप ठरून घ्यावे आणि ते जाहीर करावे मग इतर सदस्यांना पण ते लवकरच अंगवळणी पडेल आणि भविष्यातील इ. स. बद्दलचा गुंता सुटेल. राहुल देशमुख ०६:४६, ७ जुलै २०११ (UTC)

लोकाश्रय[संपादन]

नमस्कार संकल्प,

थोडे प्रास्ताविक :- चावडी (ध्येय आणि धोरणे) साठी झालेल्या चर्चेची प्रारूप आराखड्याच्या निमित्याने संकीर्ण माहिती लिहिणे बाबत मी चावडीवर लिहिले होते. मी अजूनही विपी वर नवखा आहे म्हणून मी अनुभवी जेष्ठ सदस्यान मार्फत ते करावे असे मला वाटत होते. तसेच ह्या विषयाचा आग्रह धरणे, आणि इतर चर्चे दरम्यान मी थोडा जास्त सक्रीय सहभाग (कधी आक्रमकता) दाखवला आहे. तेव्हा ह्या विषयावर पुन्हा संकीर्ण माहिती लिहिणे हा एकपात्री प्रयोग वाटेल का ? (मनात शंका होती). पण त्यावर अभय नातूंनी मीच तसे करावे असे सुचविले म्हणून मी चावडी (ध्येय आणि धोरणे) साठीची संकीर्ण माहितीचा मसुदा तयार केला आहे.

चावडीवर आणण्य पूर्वी मी आपल्या पुरवावलोकना साठी येथे देत आहोत. आपला अभिप्राय द्यावा. तसेच काही बदल सुचवायचे असतील तर तेही सांगावे.


 • १. हे पान का पाहिजे. आत्ता असलेली पाने (चावडी, चावडी/प्रगती, विविध कौलपाने, इ) का पुरेशी नाहीत.

विपी वर बरीच चर्चा पाने आहेत. बहुतेक पाने हि विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेली आहेत. आज पावेतो ध्येय आणि धोरणे ह्या बाबत आपण इतर पानांवर चर्चा करत आलो आहेत परंतु असे निदर्शनास आले आहे कि इतर विषयांच्या भाऊ गर्दीत ह्या महत्वाच्या विषयांस सातत्य, सामजस्य आणि गांभीर्याने हाताळण्यात आम्ही कोठे तरी कमी पडतो आहोत. तेव्हा यासाठी एक वेगळे पान करता येईल का? तेथे प्रत्येक सूचना/मुद्द्यावर विस्तारित चर्चा केल्यास त्याला योग्य तर्हेने संरचित करता येईल आणि त्वरित निर्णय घेणे सोपे जाईल.

 • २. या पानावर कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल.
 1. ह्या ठिकाणी मराठी विपिच्या भविष्यातील ध्येय आणि धोरणे बाबत सर्व विषयांवर व्यापक स्तरावर धोरणात्मक ( High level Statergy ) चर्चा केली जाईल.
 2. ठरवलेल्या ध्येय आणि धोरण बाबत काही काळाने समीक्षाकारणाने पण चर्चा करता येईल.
 3. गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकना साठी पण येथे चर्चा करता येईल
 4. वेग वेगळ्या चर्चा पानावर आलेल्या सूचनांचे सामाईक समालोचन येथे करता येईल
 • ३. या पानावर कोणत्या विषयांवर चर्चा करू नये.
 1. व्यक्तिगत समस्या
 2. मदतीसाठी
 3. दुरुस्तीसाठी सूचना
 4. सूक्ष्म सूचना
 5. गप्पा-टप्पा
 • ४. यात कोण भाग घेऊ शकेल.

ह्या मध्ये मराठी विपी वरील कोणताही सदस्य भाग घेऊ शकेल. सर्वाचे ह्या चावडीत स्वागतच असेल.

 • ५. या पानाच उद्दिष्ट काय.

ह्या पानाचे मुख्य उद्दिष्ट असे आहेत

 1. भविष्यातील मराठी विपी बाबत गंभीरतेने विचार करून योग्य ध्येय आणि धोरणे ठरविणे.
 2. ध्येयाची आखणी करणे
 3. ध्येय गाठण्यासाठी लागणारी धोरणे ठरवणे
 4. ठरवलेल्या धोरणांची योग्य अंमलबजावणी
 5. ध्येय आणि धोरणांचा नेमाने आढावा घेणे समीक्षा करणे
 6. गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकन करून त्यांमध्ये परिवर्तन करणे
 • ६. इतर

सदर चावडी हि गंभीर विषयास धरून असल्याने सदस्यांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि चावडीवरील अनुभव अधिक सहज आणि सुखकर करण्यासाठी काही योजना सदर चावाडीस वेगळे स्मरण चिन्ह वापरावे. ह्या चावडीस बोध वाक्य असावे तसेच चावडी वरील सहज अनुभवासाठी आकर्षक सूचना/संकेत साचे असावेत. ह्या गोष्टी जरी थोड्या व्यावसाईक स्वरूपाचा वाटत असल्या तरी गंभीर विषयाकडे सदस्यांना आकर्षित करण्यासाठी आणि चावडीची लोकप्रियता वाढवण्यासाठी असे करण्यास हरकत नसावी. सदर चावडीचे संबंधित टिपणे मुख्य चावडीत प्रदर्शित करावे.

 • ७. पुरोगामी मराठी विपी

मराठी विपी हा पुरोगामी असावा म्हणजे प्रयोगशील असावा. सुरक्षीत जोखीम घेऊन काही प्रयोग जरूर केले पाहिजे. प्रयोग म्हणजे १००% यश अशी हमी कधीच देता येणार नाही. पण जोपर्यंत नवीन प्रयोग करणार नाही तोपर्यंत नवीन क्षितिजे सर करता येणार नाही, "प्रयोगांती परमेश्वर". कोंबडा कोणाचाही आरवो आम्हाला तर सकाळ होण्यात आस्था आहे राहुल देशमुख ०९:०३, २ जुलै २०११ (UTC)

बॉट निशाण[संपादन]

संकल्प मराठी विक्शनरीवर मी केवळ प्रचालक आहे , या करिता प्रशासक पातळीच्या अधिकाराची आवश्यकता असेल ,बहूधा मेटावरून हे करून घ्यावे लागेल बॉटला ग्लोबल बॉट म्हणून मान्यता मिळवता आल्यास ते मराठी बुक्स आणि विकिक्वोट्सनाही भविष्यात उपयोगाचे ठरेल असे वाटते. प्रचालक म्हणून झालेल्या संपादनांना "निवडलेली संपादने सांगकाम्यांची म्हणून जतन करा (markbotedits)" असा अधिकार अधिकार यादीत दिसतो पण प्रत्यक्षात तसा तो मराठी विकिपीडियावरही वापरता यावयास हवा तो मला कधी आढळला नाही त्याबद्दल अधिक माहिती घ्यावी लागेल असे दिसते तुम्हालाही तशी माहिती आढळल्यास कळवावे माहितगार १४:२७, ९ जुलै २०११ (UTC)

वर्ग:Speedy deletion requests[संपादन]

Hello,

I think you should have a look at वर्ग:Speedy deletion requests, that contains many pages that should be deleted.

Regards

--Hercule २३:३३, ९ जुलै २०११ (UTC)

चेहरा मोहरा[संपादन]

अभय आणि संकल्प नमस्कार ,

अपेक्षे प्रमाणे एकीकडे चावडीवर नाकोत्या बाबी जरुरतीपेक्षा जास्त चर्चिल्या जात आहेत, आपण त्या रेट्याला सांभाळत असतानाच दुसरीकडे मी आणि माहितीगाराने चावडी बांधणीचे काम जोमाने सुरु केले आहे. माहितीगाराने इंग्रजी विपी वरून सुचालानाचा नवीन साचा नकलवला आणि त्यावर काम सुरु आहे.

चावडी (ध्येय आणि धोरणे)

पुढे जाण्या अगोदर काही गोष्टींवर निर्णय घेणे जरुरी आहे तेव्हा मार्गदर्शन करावे

 1. चावडीच्या मुखपृष्ठ हे पान चर्चेसाठी नसून संबधित विभागांचा वापर चर्चेसाठी करावा का ?
 2. मुखपृष्ठ केवळ इतर विभागांच्या सुचालानाचे icons दाखवेल (इंग्रजी विपी प्रमाणे)
 3. माहितीगाराने ७-८ दुवे ह्या पानावर देण्या साठी सांगितले आहे
 4. असलेल्या गरजेला उत्तम प्रकारे प्रदर्शित करण्या साठी Matrix Layout वापरावा असे वाटते.
 5. इंग्रजी विपिच्या साच्यात बदल करून मी Matrix layout बनवला आहे
 6. सोबत दिलेल्या आकृती प्रमाणे आपण Matrix भविष्यातही गरजे प्रमाणे लहान मोठे करू शकू
 7. विकिपीडिया:धूळपाटी/चावडी/ध्येय आणि धोरणे येथे परीक्षणासाठी उभारण्यात आलेली संकल्पना पहावी
 8. ३ X ३ चे Matrix वापरून उजव्या बाजूला जागा वाचवण्यात आलीआहे ज्याचा उपयोग आपण विदागार, सूचना, विपी बद्दल बातम्या, कार्यक्रम आदीसाठी वापरू शकू (काही चित्रे बनवावी लागतील तसेच दुवेपण पूर्ण पणे दिलेले नाहीत ) जर हा ढाचा मान्य असेल तर बाकी तुरळक कामे करता येतील.
 9. सर्वच चर्चा पाने एकाच ठिकाणावरून विभागवार उपलब्ध केल्याने इतरही चर्चा पानांची लोकप्रियता/उपयोगिता वाढेल, मध्यवर्ती चावडीवरचा दबाव कमी होईल.
 10. तसेच सोबतच सर्व विभागा वरील चर्चा एकत्रित पाहण्याची सुविधा पण साच्यात आहे.

चावडीचा चेहरा मोहरा बदलेल. जास्त चांगला User Friendly GUI कदाचित आपण मराठी विपी समुदायाला उपलब्ध करून देऊ शकू असे वाटते. ( लोक त्यावरही चर्चा करतीलच पण आता आधी लगीन कोंढाण्याचे, गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न असेल.)

राहुल देशमुख २३:१०, १० जुलै २०११ (UTC)

हे असे का दिसते आहे ?[संपादन]

संकल्प, अचानक डावीकडील मुख्य सुचालनपट्टीत मिडियाविकी:Sidebarनुसार दिसावयास हव्या असलेल्या घटकांपैकी (चावडी इत्यादी) काही घटक गेल्या काही मिनीटा पासून अचानक दिसेनासे झाले आहेत मिडियाविकी नामविश्वातच्या अलिकडील बदलात तरी काहीही बदल दिसत नाही आहेत .असे मलाच होते आहे का तुम्हालाही तसेच दिसते आहे ?

कोहिमा, बडोदा, इंदूर[संपादन]

संकल्प,

उत्साहवर्धनाबद्दल धन्यवाद. कोहिमा/कोहिम्याबद्दलचा तुझा युक्तिवाद पटण्याजोगा आहे पण का कोणास ठाउक, मला नेहमी कोहिमा हे स्त्रीलिंगी असल्याचेच वाटायचे. बडोदा, वर्धा, इ. पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी वाटतात आणि बडोद्याचे (खरे म्हणजे वडोदर्‍याचे), वर्ध्याचे म्हणायला बरोबर वाटते पण कोहिम्याचे/ची खटकते. तसेच इंदूर...इंदूरचे कि इंदूराचे कि इंदूरीचे कि इंदूर्‍याचे?

अभय नातू १७:२६, १४ जुलै २०११ (UTC)

प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा[संपादन]

नमस्कार,

चावडी ध्येय आणि धोरणे वर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरु आहे. जेष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे भाषा निर्देश आपल्या लेख द्वारे सदर चावडीवर मांडले आहेत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चाविडी ध्येय आणि धोरणे वर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कमी अमुल्य योगदान करावे हि विनंती. राहुल देशमुख ०२:२९, १८ जुलै २०११ (UTC)

आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

बोरगाव( तालुका कर्जत)[संपादन]

नमस्कार,

आपण "बोरगाव" या लेखातील तालुक्यात केलेला बदल चुकीचा आहे. लेखात कळंब-बोरगाव ह्या रस्त्याचा उल्लेख झाला आहे, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालूक्यात कळंब या नावाचे कोणतेही गाव नाही. कृपया | महाभूलेख येथे पडताळून पहावे.

माहिती चौकटी आणि लिंक[संपादन]

नमस्कार संकल्प,

गुगल वर्गा साठी मी काही लेख लिहितो आहे. परंतु माहिती चौकटीत जर इंग्रजी विपी वरची लिंक दिली तर चित्र दिसत नाही आणि तेच चित्र जर पुन्हा मराठी विपिव्रर चढवले तर दिसते. नेमके माझे काय चुकते आहे कुपया पाहून सांगाल काय? ह्यामुळे ८-१० माहिती चौकटी फक्त लिंक दाखवता आहेत, एकदा मागे पडले तर राहून जाईल.

धन्यवाद

राहुल देशमुख १४:२६, १९ जुलै २०११ (UTC)

 • म्हणजे थोडक्यात मी सदर चित्रे तेथून डाउनलोड करून मराठी विपीवर उपलोड करावी आणि त्यावर 'उचित वापर' समर्थन-टॅग लावून तात्पुरती वापरवी का ? या पूर्वी चित्र चर्चा:Google Docs logo.png साठी पण हाच प्रयोग मी केला होता पण त्यावर आपण त्यावेळेस वेळेस असे का महणून विचारले होते. राहुल देशमुख १५:५५, १९ जुलै २०११ (UTC)
 • पण आता तर मी कॉमन्सवर चित्रे चढवली पण आहेत. आता काय करायचे? मी मिस्लेनियास विभागात लायसन्स मध्ये स्वतःच फेयर तू युस लिहून तसे केले. राहुल देशमुख ०३:४८, २० जुलै २०११ (UTC)
 • मंदार आणि संकल्प नमस्कार,

जसे कि मी म्हटले होते कॉमन्सवर चित्रे चढवणे कटकटीचे आहे. आता त्यांच्या बॉटनि प्रश्नांचा सपाटा लावलाय आणि ७ दिवसांनी चित्रे काढण्याची नोटीस दिली आहे. हि चीत्रे इतरही अनेक विपी वापरतात जसे जीमेल चा लोगो २७३ विपी प्रकल्पावर वापरला आहे आणि तत्सम भूतौशी सर्वच गुगलचे लोगो शेकडो वेगवेगळ्या भाषांन मधील विपी वर वापरात आहे पण कॉमन्सवर नाहीत. आता पुढे काय करायचे ....? मराठी विपी वर चढवून काम भागवायचे किंवा कसे? राहुल देशमुख ०२:२२, २१ जुलै २०११ (UTC)

बोरगाव ( संपादन इतिहास)[संपादन]

नमस्कार,

http://mr.wikipedia.org/w/index.php?title=बोरगाव&action=history Namskar १५:४१, १९ जुलै २०११ (UTC)


८ लाख संपादने !!![संपादन]

संकल्प नमस्कार,

मराठी विपी ने ८ लाख संपादनांचा टप्पा गाठल्या बद्दल अभिनंदन.

 • गंमत म्हणून काही माहिती -
२४ जूलैला मी पण विपी वर एक प्रयोग करून पहिला. एकाच दिवसात जास्तीत जास्त संपादने करण्याच्या दृष्टीने. रविवार २४ जुलै २०११ ला, मी २० तासात १०११ पेक्षा जास्त वास्तविक गरजेवर आधारित संपादने पूर्ण केलीत. मराठी/हिंदी चित्रपट अभिनेते/अभिनेत्री माहिती चौकट/वर्ग/चित्रे आदी. गोष्ठी बनवण्याचे/व्यवस्थित करण्याचे बहुतेक काम पूर्ण झाले. या आधी एकाच दिवसात एकच सदस्याने केलेल्या सर्वाअधिक संपादनाची आकडेवारी माहित असल्यास सांगावी. राहुल देशमुख १२:५९, २५ जुलै २०११ (UTC)
राहुल,
तुम्ही करत असलेल्या कष्टाबद्दल तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. मराठी विकिपीडियाला आपणा सारख्यांची (झपाट्याने काम करणारे) खूप गरज आहे ज्यामुळेच आपण सध्या या टप्यावर आलो आहोत. मला येथे एक सुचवावेसे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे आपण केलेल्या संपादनांपैकी काही संपादने ही "सांगकाम्याच्या" मदतीने करता येऊ शकतात का ते पाहावे. संकल्प कडे ती जादू आहे ज्याद्वारे तो चुटकी सरशी काही कामे करू शकतो.
संकल्प, तुझे काय मत आहे यावर?..... मंदार कुलकर्णी १६:५६, ३० जुलै २०११ (UTC)
मंदार, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मी केलेल्या संपादनातील ३०% कामे हि संकाम्या करवी करता येउशाकली असती, पण खूप गार्बेज होता आणि असामान्य परिस्थिती होती तो साफ करायला बराच त्रास गेला. राहुल देशमुख १८:१४, ३० जुलै २०११ (UTC)

प्रशासक आणि प्रचालक[संपादन]

संकल्प, आपण विकिपीडिया:प्रशासक ही जबाबदारी घ्यावी अशी आग्रहाची विनंती आहे सोबतच सदस्य:Koolkrazy, सदस्य:J,सदस्य:Czeror यांना प्रचालक पदी घ्यावे असे वाटते जेंना बर्‍यपैकी सर्व पैलूंची माहिती होत आल्याचे दिसते पण त्यांचे आणि मिडियाविकी नामविश्वाचे नाते कितपत जुळेल आणि सिझर बद्दल प्रताधिकार संवेदनशीलते बाबत थोडी काळजी वाटते हे खरे. माहितगार १५:२५, २६ जुलै २०११ (UTC)

वरोडा[संपादन]

आपण हा लेख वगळला आहे.आपणांस थोडा त्रास देत आहे. त्याचे पुनर्निर्देशन वरोरा कडे करावे ही विनंती.वरोरा हे वरोडाचे इंग्रजीकरण आहे.या गावाचे मुळ नाव वरोडा असेच आहे.(बाबा आमटे यांचे वरोडा.)

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:३९, २९ जुलै २०११ (UTC)

डेटा गृपिंग[संपादन]

संकल्प नमस्कार,

मी दिनविशेष चा डेटा जवळ जवळ ३०० दिवस , १२ महिने एकाच यंत्रणे द्वारे महिन्या वारी अथवा दिवस वारी अथवा महिना आणि दिवसवरी दिसेल अशा आशयाचे उपाय बनवावे असा विचार करतो आहे.

डेटा गृपिंग आणि सॉर्टिग करण्या साठी काही पद्धत विकिपिडीयावर माहित आहे का (मिडियाविकी चे जसे DPL जे विकिपीडिया सपोर्ट करत नाही सारखे.) छोट्या डेटाला तर पार्सर ने नियंत्रित करता येतो पण मोठा कसा हाताळायचा? काही कल्पना असल्यास सांगावे. राहुल देशमुख ०९:५०, ३१ जुलै २०११ (UTC)

 • संकल्प, मला स्वयंचलित नाही पण डायाण्यामिक म्हणजे एका डेट्यावर क़्युरि सारखे अनेक रिपोर्ट सारखी माहिती मिळावी असे अपेक्षित आहे. मी व्हर्चुअल अप्रोच्ने ते करून पहिले तर जमते आहे. मी चावडी तात्रिकप्रश्न वर प्रस्ताव आणि डिझाईन दिले आहे. कुपया पाहून सूचना/ अभिप्राय कळवावा. राहुल देशमुख १४:४५, ३१ जुलै २०११ (UTC)

help[संपादन]

dear sankalp i want to share wikipedia pl call me at 9226563052

शेवटले संपादन[संपादन]

मराठी विकिवर सदस्य कसे वावरतात याचे तुम्ही केलेले विश्लेषण चावडीवर वाचले. ते बर्‍यापैकी पटले. मी स्वतः विकीवर वाटेल तसा स्वैर संचार करतो आणि एखादा भाग दिसला की संपादित करत सुटतो. मग काही काळाने त्याच कंटाळा येतो. अनेक विभाग अर्धवट सुटून भलतीकडेच संपादन होत राहते. असो!

मी लॉग इन झाल्यावर माझे योगदान हा टॅब दिसतो. त्या खाली चौकटीत शेवटचे संपादन असा दुवा देता येईल का? जसे माझे शेवटचे संपादन: होरा (ज्योतिष) असे दिसू शकेल का? हे पान प्रत्येकाला सक्तीचे असले, तर मागचे संपादन कोणते हे लक्षात आणून देणे सोपे राहील असे वाटते. (खरे तर त्यात शेवटचे किती लेख १, ५, १० दिसावेत हे सदस्यालाच ठरवण्याची अशी सोय असली तर बरे.) या शिवाय तुमचा आजवरचा सर्वात मोठा लेख हा दुवाही सदस्याच्या पानावर दिसला तर उत्तम! समोर दिसले तर काम होते असे वाटते. अन्यथा दृष्टी आडची सृष्टी! निनाद ०१:३३, १ ऑगस्ट २०११ (UTC)

हिंदूधर्मविषयक विकिप्रकल्प[संपादन]

हिंदूधर्मविषयक विकिप्रकल्प कसा चालवावा याची कल्पना मला नाही. काही माहिती असल्यास कळवा, प्रकल्प पान वगैरे बनवून द्या. काम सुरू राहील. काही आराखडा मिळाल्यास काम करणे सोपे जाईल. मी प्रकल्प समन्वयक किंवा जे काय असेल त्या पदानुसार कार्य करू शकेन असे वाटते. कळावे निनाद ०१:३६, १ ऑगस्ट २०११ (UTC)

अमावस्या[संपादन]

अमावस्या हेच नाव बरोबर आहे.सर्व पंचांगात व दिनदर्शिकेत पण तसेच लिहिले आहे.आपण त्यास अमावास्या करण्याचे कारण काय ते कळले नाही.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:०६, १ ऑगस्ट २०११ (UTC)

भूगोल प्रकल्प[संपादन]

संकल्प,

आपण सुचवल्याप्रमाणे भूगोल प्रकल्प सुरु करण्यास व पुढाकार घेण्यास माझी काहीच हरकत नाही. मला ह्या विषयात रुची आहे. प्रश्न असा आहे की इतर असे किती सदस्य आहेत जे ह्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देउ शकतील. ४-५ जरी interested मेंबर्स असतील तरी चालेल परंतु केवळ आपण, मी व इतर नेहमीचेच लोक काम करणार असतील तर त्यासाठी प्रकल्प कशाला हवा असे वाटते. नाहीतरी सध्या लेख विस्तारणे (मंदगतीने का होईना) सुरूच आहे.
अभिजीत साठे १६:२६, १ ऑगस्ट २०११ (UTC)

भूगोल प्रकल्प मध्ये काय करायचे आहे हे कळले तर मी मदत करू शकेन,,,,,मंदार कुलकर्णी ०६:५९, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

व्हारच्युअलायझेषण[संपादन]

नमस्कार संकल्प,

दिनविशेष हे प्रकल्प हिंदू धर्माला जोडून काम उरकावी का ?

मी निनाद , मंदारशी ह्या बाबत चर्चा करू का ? नार्सिकर ह्या वर पहिलेच काम करीत आहेत. तुम्ही कार्यालीन कामात भरपूर व्यस्त आहात हे मी जाणतो ,तरी व्हारच्युअलायझेषण वर आपली प्रतिक्रिया लवकर कळवा (कारण मग मी पण व्यस्त होईल तर राहून जाईल ) हा प्रयोग जर यशस्वी झाला तर मी लेखांच्या बहुआयामी वापराचे नवीत सूत्र मांडू शकेल आणि त्यामुळे भविष्यात अनेक कामे सोपी होऊ शकतील असे वाटते.

मी दिनविशेष साठी तांत्रिक प्रस्ताव देलेलाच आहे. हे काम मोठे आहे ते असे दिसते.

 • अपेक्षित पाने
 1. याद्या पाने
  1. महिने पाने १२
  2. तिथी पाने - ३००
   1. तिथी जयंती - ३००
   2. तिथी पुण्यतिथी ३००
   3. तिथी सण ३००
   4. तिथी इतर ३००
 • एकून अंदाजे १५०० पाने
 1. लेख
  1. १५०० याद्या पानावर प्रत्येकी सरासरी ३ नोंदी पकडल्या तरी त्याचे (१५०० * ३)= ४५०० म्हणजेच @ ५०००

थोडक्यात पाच हजार लेखांचे कमीत कमी धेय्य येथे गाठता येईल

राहुल देशमुख १६:३८, १ ऑगस्ट २०११ (UTC)

अमावास्या[संपादन]

व्वा रे शेर ! मान गये.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:०२, २ ऑगस्ट २०११ (UTC)

"तेजस" संधर्भात[संपादन]

नमस्कार, मी काल "तेजस" ह्या नावावर काही माहिती मराठीविकी वर लिहिली होती, ती आपल्या कडून काढून टाकलेली दिसत आहे. काही चुकला होतं का मी लिहिलं होतं त्यात?

धसास[संपादन]

संकल्प अभिप्राया बद्दल धन्यवाद.

 • >>>लोकांनी मते/ विचार कळवले नाहीत, तर डोक्यता राख घालून न घेण्याइतपत >>>

संकल्प मी येथे किती दिवस आणि किती वेळ देऊशाकेन हे मलाच माहित नाही. तेव्हा आज काही वेळ आहे तर स्द्कारणी लावावा हा उद्देश. जेव्हा विपीवर ४-५ पेक्षा जास्त सदस्य तांत्रिक बाबतीत किंवा इतरही धोरणात्म बाबतीत सक्रीय असल्याचे मझ्या पाहण्यात नाही, त्यातही अशा तर्हेचे प्रश्नच पुढे येण्याचे प्रमाणही नगण्य. मग आशा परिस्थितीत दैनंदिन इतरही कामांचे वर अशा विषयाला प्राथमिकता मिळावी असे माझे 'व्यक्तिगत मत' आहे. परतू मराठी विपी च्या प्राथमिकता वेगळ्या असू शकतात.

प्राथमिकता मिळवण्या साठी किंवा विषयास धसास लावण्या साठी जर मी आरडा ओरड केली असेल तर त्याचा उद्देश काम उरकण्या साठी होता, त्यात कोणताही इगो नव्हता. डोक्यता राख घालण्याचा तर प्रश्नच नाही. तेव्हा गैर समाज नसावा. ( जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यत तर त्याची आई त्यास दुध सुद्धा देत नाही, त्यामुळे जर काही त्रास आपण लोकास झाला असेल तर तो बालहट्ट समजून घ्यावा...!)

पण आपण आपल्या विपिच्या ह्या सरकारीछाप पद्धतीस थोडे बदलवायला पाहिजे. माझे सोडून द्या पण साधारण कार्यकर्ता तर फ्रस्टेट होऊन निघून जाउ शकतो. मी अशी बरीच उदाहरणे देईन कि जिथे निर्णयच येत नाही आणि बस भिजत घोंगडे . आसो लोभ असावे. राहुल देशमुख ०७:२४, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

राहुल आपण जे विचार मांडले त्याला मी सहमत आहे. विपिच्या ह्या सरकारीछाप पद्धतीस थोडे बदलवायला पाहिजे. सचिन १६:२१, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

चैत्र[संपादन]

चैत्र शु.प्रतिपदा/द्वितिया- हे नुकतेच टाकलेले लेख बघावेत. काही दुरुस्त्या /त्रुटी असतील तर सुचवाव्यात ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४९, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

माफ करा! आपल्या चर्चा पानावर मला नाईलाजाने दखल देउन ते लहान करावे लागले. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:०२, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

वर्ग[संपादन]

संकल्प,

वर्ग ह्या प्रकारात मी अजून फार काम केले नाही. पण मला काही शंका आहेत. त्याचे निराकरण करशील का?

१. उदा. वर्ग:इ.स. २००६ मधील मराठी चित्रपट असा एक वर्ग आहे आणि माझ्याकडे ५० चित्रपटांची यादी आहे तर ते त्या वर्गात कसे चढवायचे? त्या साठी प्रत्येक वेळी नवीन लेख बनवून त्यातच नाव टाकावे लागते का? आधी वर्गात विद्यार्थी भरून मग त्यांच्यावर संस्कार करता येतील का? २. एखाद्या व्यक्तीच्या लेखात अनेक वर्ग येऊ शकतात. त्याला कोणकोणते वर्ग योग्य होतील ते कसे शोधायचे? एकूण वर्गांची संख्या इतकी जास्त आहे की त्यातून योग्य वर्ग शोधून काढणे अवघड वाटते. ३. एकूण वर्गांपैकी जवळ जवळ ८०० वर्ग इंग्लिश नावाने आहेत. ते मराठी विकिपीडिया मधून काढायला हवेत ना? ४. # "वर्गवॄक्षात जोडावयाचे राहिलेले लेख" आणि # "न वापरलेले वर्ग" या विभागावर मला काम करायचे असेल तर काय काय करायला लागेल?.....मंदार कुलकर्णी ०६:५०, ७ ऑगस्ट २०११ (UTC)


साचामुळे जोडलेल्या पानात तांत्रीक गोची, सहाय्य हवे[संपादन]

विशेष:येथे_काय_जोडले_आहे/साचा:कौल_सुचालन या सुचालन साचात काहीतरी गोची असावी असे वाटते. त्यास जोडलेल्या सर्वपानातील मजकूर (असूनही) पानांवर दिसतच नाही. मलावाटते मुखपृष्ठ सदर आणि इतर कौल प्रोसेसवर अवलंबून क्रीया खोळंबतील असे दिसते .माहितगार ०९:३७, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. मला तांत्रीक बॅकग्राऊंड नसल्या मुळे त्याचा उहापोह करण्यास तुम्हीच सक्षम आहात त्या करता आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे. माहितगार १५:३१, ११ ऑगस्ट २०११ (UTC)


प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे माहितगार १०:१९, २० ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011[संपादन]

WCI banner.png

Hi Sankalpdravid,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

Invite to WikiConference India 2011[संपादन]

WCI banner.png

Hi Sankalpdravid,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

मराठी विकिपिडीयावर १,७००० पेक्षा जास्त संपादने.......[संपादन]

मराठी विकिपिडीयावर १,००००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा दहा हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे

मराठी विकिपिडीयावर १,७९००पेक्षा जास्त संपादने पार पाडल्याबद्दल हा दहा हजारी बार्नस्टार सर्व विकिपिडीयन्सतर्फे..... खरेतर फारच उशीरा परंतु देर से, लेकीन दुरुस्त सही! (वाक्यरचनेत चुकी असल्यास माफी असावी)

सचिन १६:३१, १२ ऑगस्ट २०११ (UTC)


विकिपीडिया आणि विश्वकोशीय मजकूर[संपादन]

नमस्कार सर्व प्रथम दहा हजारी बार्नस्टार साठी हार्दिक अभिनंदन !! १. मी माझी मत्ते, टिप्पणी करताना संदर्भ देखील दिले आहेत, आणि काही पुस्तकान मधून मिळालेल्या महितावरून मी माझे मत प्रकट केले होते २. काटछाट करणे म्हणजे थोडाफार बदल होईल म्हणजे काही विधाने गायब/ गाळली जातील असे अपेक्षित होते, पण संपूर्ण मजकूर काढून टाकले म्हणून जरा खटकले. कारण माहिती मी जरा इतिहास शिकलो होतो आणि जरासे वाचन झाले होते म्हणून दिली होती. ३.संभाजी महाराज-एक उपेक्षित लढवय्या-लिहिण्या मागचे कारण खूप ठिकाणी असेच द्रुष्टीस पडले म्हणून धाडस केले होते.

सागर:मराठी सेवक १७:३४, १२ ऑगस्ट २०११ (UTC)


नवीन सदस्यांनी केलेले लिखाण एकदम काढून न टाकता त्याला चर्चा पानावर पुनर्निदेषित करून बदल सुचवावे असे माझे व्यक्तिगत मत आहे.सागर:मराठी सेवक ०९:११, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

मराठी - आव्हान आणि उत्क्रांती कृपया हा लेख विपी वरून काढून टाकण्यात यावा. मी पुन्हा नव्याने लिहिण्याचा पर्यंत करीन

विकिपीडिया:आंतरविकि_दूतावास#Disimbig_templates[संपादन]

संकल्प, विकिपीडिया:आंतरविकि_दूतावास#Disimbig_templates इथे एक विअनंती आली आहे अर्जंट आहे म्हणतात. मला वाटत हा विषय आपल्याला अधीक व्य्वस्थीत लक्षात येईल.काय करावयास लागेल ते कळवलेत तर मदतीस हजर आहे माहितगार २३:१३, २३ ऑगस्ट २०११ (UTC)

संकल्प,
तू सुरू केलेले काम बरेचसे संपवित आणलेले आहे. आता /docचे भाषांतर आणि इतर किरकोळ बदल करायचे राहिले आहे. तसेच पायविक्या सांगकाम्यांना हवे असलेले पानही बदलायचे आहे. एकदा साचा तपासून घेऊन ते पान बदलशील? इतर काही बदल पाहिजे असे दिसल्यास कळवशीलच.
अभय नातू २२:२९, २४ ऑगस्ट २०११ (UTC)
ता.क. - साच्याचे दोन-तीन उपयोग अशोक (निःसंदिग्धीकरण), कोयना आणि माँटेरे या लेखांद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
अभय नातू २२:४३, २४ ऑगस्ट २०११ (UTC)

अभय आणि संकल्प हे काम तातडीने केल्याबद्दल धन्यवादमाहितगार ०९:२२, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिपीडिया:प्रमाणपत्र[संपादन]

अभय आणि संकल्प, बार्नस्टारच्याच धर्तीवर पण इतर काही उद्दीष्ट्ये साधण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:प्रमाणपत्र नावाचे पान मागेच मी सुरू केले होते शिवाय स्ट्रॅटेजी विकिवर सविस्तर प्रस्तावही मांडला होता.स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडीयाकरता प्रस्ताव अमलात यावा म्हणून व्यवस्थित दिसणार्‍या सर्टीफिकेट टेम्प्लेटची आवश्यकता होती ते काम राहूल देशमुखांनी चांगलेच पार पाडले आहे.त्यांनी बनवलेल टेम्प्लेट आणि संबधीत चर्चा विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र नमूद केली आहे विकिपीडिया:प्रमाणपत्र स्ट्रॅटेजी विकिवर मांडलेला प्रस्ताव तसेच विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र चर्चा सविस्तर पाहून घेऊन विकिपीडिया चर्चा:प्रमाणपत्र#प्रमाणपत्र झलक येथे आपली सविस्तर प्रतिसाद नोंदवावा तसेच काही शुद्धलेखन किंवा इतर सुधारणा नोंदवायच्या असल्यास त्या देखिल नोंदवाव्यात. या प्रकल्पात सध्याच्या सक्रीय सदस्यातून राहूल शिवाय निनाद,मनोज हे ऑन लाईन तर मंदार आणि अभिजीत सुर्यवंशीना फिल्ड मध्ये म्हणजे पुण्यातील विकिभेटी आणि एजूकेशन प्रोग्रमच्या माध्यमातून आणि कार्यशाळातून पोहोचवण्याच्या दृष्टीने सामिल करून घ्यावे असा मानस आहे. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असेन माहितगार ०९:२२, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

फारनहाइट व क्वथनबिंदू[संपादन]

(संदर्भ : साचा:माहितीचौकट मूलद्रव्य मधे केलेल्या बदलाविषयीची तुमची प्रतिक्रिया) साच्यात बदल करण्यापूर्वी "चर्चा" पानावर डिस्कस करणे गरजेचे आहे याबाबत पूर्णतः सहमत. कालच मी तुम्ही सांगितलेले साईड इफेक्ट्स बघितले होते, आणि लगोलग "साचा:माहितीचौकट मूलद्रव्या"च्या चर्चा पानावर तशी नोंद केली होती. परंतु सांगकाम्याचा (obvious) पर्याय डोक्यातून उतरला होता बुवा :).

खेमकरण[संपादन]

खेमकरण या लेखातील संदर्भ नीट करण्यास कृपया मदत करा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:३२, ३१ ऑगस्ट २०११ (UTC)

साचा:माहितीचौकट मूलद्रव्य -> बदल करण्यास मदत पाहिजे[संपादन]

चिन्हापेक्षा "संज्ञा" हा शब्द अधिक योग्य आहे. साच्यात आणि संबंधित लेखांमधे त्यादृष्टीने (बॉट द्वारे) बदल करण्यास मदतीचे आवाहन !!! बाकी तुमच्या सांगण्याप्रमाणे आधी केलेले बदल उलटवले आहेत. Kaajawa १५:११, ८ सप्टेंबर २०११ (UTC)


तक्ते[संपादन]

मराठी विकिपिडीयावर इतक्यात मोठ्या प्रमाणात तक्ते/याद्या स्वारूपाचे लेख/माहिती पुढे येत असल्याचे दिसते. योगदान करण्यास याद्या सोप्या असल्याने त्यास सहभागही चांगला मिळणे स्वाभाविकच आहे. पण विपी वर याद्या द्याव्या का ? विश्वकोशिय लेखनाच्या परिघात त्या येतात का ? जर याद्यांना मान्यता दिली तर मग कुठे थांबायचे तेपण ठरवावे लागेल का ? कारण मग समजा कोणी "दैनंदिन लागणाऱ्या किराण्याची यादी" बनवली तर ती पण योग्यच ठरेल.

तक्ते हा प्रकार इतर विकी कसे हाताळतात ? ते हाताळत नसतील तरीही आपण नवीन सुरुवात करावी का ? त्या दृष्टीने काही नियम, मर्यादा आहेत/असावे का? आणि हाताळायचे ठरल्यास काही सुविधा बनवाव्या का जसे नामविश्व, वर्ग, साचे आदी. कुपया आपले विचार कळवावे. राहुल देशमुख ०४:१५, १५ सप्टेंबर २०११ (UTC)


दिराईव्हड लेख[संपादन]

संकल्प,

याद्या आणि डेरीव्हेटीव म्हणजेच मुख्य लिखातून दिराईव्हड स्वरूपाचे वेगळे लेख हि नजीकच्या काळात मोठी डोकेदुखी बनणार असे दिसते. आजच दुसऱ्या महायुद्धाची करणे आणि आता नाशिक येथील चित्रपट गृहे वैगरे त्याचे उदाहरण आहे. ह्या लेखनास अटकाव करून मुख्य लेखातच येगादन देण्यास सदस्यांना निर्देशित करण्यासाठी काही धोरण ठरवावे का ? जेणे करून रोज रोज चर्चा पानावर डोके फोडी करण्या पेक्षा आपण अशे लेख सरळ मातृ लेखात विसर्जित करून टाकू शकू. कळवावे राहुल देशमुख १३:५३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

माहितीचौकट हिंदुस्तानी गायक[संपादन]

परत एकदा आठवण.... As per your guidance, I have made "सदस्य:Mvkulkarni23/माहितीचौकट हिंदुस्तानी गायक" साचा बनवला आहे. कृपया तपासून होकार द्यावा. Also let me know, how it can be replaced with all existing साचा in the wikipedia....मंदार कुलकर्णी १४:४९, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

याद्या[संपादन]

राहुल, तुमचे चर्चा पानावरील मत वाचले.याद्या हव्यात का किंवा कशा हव्यात याविषयी चर्चा व्हायलाच हवी. पण या याद्या मुख्य लेखात ठेवण्यापेक्षा वेगळा उपलेख बनवून ठेवल्या तर मुख्य लेखाची लांबी आणि उपयुक्तता अबाधित राहील. त्या हिशोबाने हे उपलेख बनवले आहेत. याद्या या विश्वकोशात असायला हव्यात असे मला वाटते कारण अनेक जणांना थोडक्यात पुरेशी माहिती मिळते. इंग्लिश विपी मध्ये अशा याद्या अनेक आहेत आणि मी त्यात मला शक्य असेल तेंव्हा भर घालत असतो. नुसत्या याद्या देवून भागणार नाही हे मला मान्य. पण त्यातून कुठेतरी लेखाच्या शीर्षकाची सुरुवात तरी होते. तद नंतर जाणते मंडळी त्याचे नवीन लेख लिहून विपी मध्ये भर घालू शकतात. याचा अर्थ "याद्या नकोतच" असे नसावे असे वाटते....मंदार कुलकर्णी १४:१०, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

टोकाची पाने[संपादन]

विशेष:टोकाची पाने येथील विदा ताजा करता येऊ शकेल काय? कृपया मदत करावी ही विनंती..

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:०७, १८ सप्टेंबर २०११ (UTC).


रोमन लेख[संपादन]

संकल्प,

टायटल ब्ल्याकलिस्ट पुरवणी मधे काल केलेल्या बदला मुळे काही गडबड झाली कि काय, कारण आज मला Kadam रोमन नावाचा लेख आज लिहिल्या असल्याचा आढळला तो मुख्य नामविश्वात तयार करता यायला नको होताना. कुपया फिल्टर तपासून पाहावे. राहुल देशमुख १२:४८, १८ सप्टेंबर २०११ (UTC)

आज Blackletter हा लेख आढळला. या लेखात विस्तार साच्याशिवाय इतर काहीही माहिती नाही आहे. मागे एका चर्चेमध्ये नवीन लेख तयार करण्यासाठी किमान शब्दांचे बंधन टाकण्याबाबत वाचले होते. ते अमलात आले आहे का? - प्रबोध (चर्चा) १२:३१, २३ सप्टेंबर २०११ (UTC)
प्रबोधच्या मुद्याशी सहमत आहे.संतोष दहिवळ १२:३५, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

व्यक्ती संबधित लेख[संपादन]

एखाद्या व्यक्ती संबधित विकिपीडिया वरील लेखात त्या व्यक्तीस एकेरी संबोधन करावे का आदरार्थी अनेकवचनी? (उदा: लता मंगेशकरकौशल इनामदार) या साठी काय निकष लावावा? - प्रबोध (चर्चा) ०७:१३, २० सप्टेंबर २०११ (UTC)


I suggest - "आदरार्थी अनेकवचनी". कारण आपली संस्कृती असेच सांगते....मंदार कुलकर्णी ०८:४७, २० सप्टेंबर २०११ (UTC)
तुम्हचे मत पटते. तुम्हाला बहुदा माझ्यासारख्या अनेकांचे शंका निरसन करावे लागणार आहे :) - प्रबोध (चर्चा) १२:३७, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

धन्यवाद ![संपादन]

सागर:मराठी सेवक १५:४९, २२ सप्टेंबर २०११ (UTC)

अनावश्यक संपादने[संपादन]

विकिपिडीयाच्या अनेक पानात अनावश्यक संपादने केलेली आढळून येतात. याला पायबंद घालता येणार नाही का? उदाहरण द्यायचे झाले तर अनुभवी सदस्य :--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) आणि :--मंदार कुलकर्णी (चर्चा | योगदान) यांच्या चर्चा पानाला कुणीतरी वर्ग:२००६ मधील मराठी चित्रपट हा वर्ग टाकलेला आहे. हे जर कुणी जाणकाराने केले असेल तर या वर्गात हि चर्चा पाने टाकण्याचे कारण काय? सांगायचा मुद्दा एवढाच की हे जर चुकीचे असेल तर अशा अनावश्यक संपादनाचेच संपादन करावे लागेल. :संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संतोष दहिवळ १७:२५, २२ सप्टेंबर २०११ (UTC)

नमस्कार[संपादन]

काहीही विशेष नाही. बर्‍याच दिवसात बोलणे झाले नाही म्हणुन फक्त येवढेच.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:३१, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष माहितीचौकट साचा[संपादन]

फक्त नाव,चित्र आणि स्वाक्षरी असणारा साचा बनवून देण्यात यावा.

संतोष दहिवळ ०९:०६, २५ सप्टेंबर २०११ (UTC)

साचा - माहितीचौकट गायक[संपादन]

संकल्प, मला सध्या माहितीचौकट गायक या नावाचे दोन साचे लेखांमध्ये दिसत आहेत. उदा. आशा खाडिलकर यांच्या लेखात १२ ओळी आहेत, तर नवीन साचा घातलेल्या लेखात (उदा. शौनक अभिषेकी) मध्ये ३९ ओळी आहेत. या काही दुरुस्त्या करायच्या राहिल्या आहेत का? सर्व गायकांच्या लेखात ३९ ओळी का दिसत नाहीत? पाहिलास तर बरे होईल.... मंदार कुलकर्णी १८:०२, २५ सप्टेंबर २०११ (UTC)

माहितीचौकट विमान अपघात[संपादन]

या साच्यात काही इंग्रजी शब्द मराठी करावयाचे राहीलेत.कृपया मदत करा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:४०, २६ सप्टेंबर २०११ (UTC)

साचा[संपादन]

यावर अभय व संतोष दहिवळ यांनी काम करुन तो योग्य बनविला आहे.त्यांचे व आपले आभार.मी यात प्रयत्न केला होता पण यश मिळाले नाही.मग यशस्वी माघार ! काम चांगले व्हावे यासाठी पूर्ण प्रयत्न करतोच.


वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:३५, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

पल्सार[संपादन]

कृपया चर्चा: पल्सार बघावी ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:३६, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

रोमन आकडे[संपादन]

संकल्प, आपल्या लक्षात आले असेलच की मी टेनिस संदर्भातील लेख इंग्लिश विकिपीडियावरून कॉपी करतो. रोमन आकडे बदलायचे राहुन जातात. एखादा सांगकाम्या हे काम करू शकेल काय? Abhijitsathe १२:०५, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

बदल केला तरी चालेल. मी अजून काही लेख तयार करेन. ते नंतर बदलले तरी चालतील. Username चा घोळ बरेच दिवस चालू आहे.
Abhijitsathe १५:११, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)
खरे आहे. ऑलिंपिक स्पर्धा लेखांत रोमन आकडे आहेत. आकडे बदलायला बराच वेळ लागतो. हा वेळ content generation साठी वापरला तर जास्त बरे असे वाटते. सगळे लेख तयार झाल्यावर काहीतरी उपाय काढू. - Abhijitsathe १४:५२, ७ डिसेंबर २०११ (UTC)

सागर मार्कळ[संपादन]

संकल्प,

सागर मार्कळ हे मराठी सेवक गेले काही दिवस रिकामे लेख तयार करीत आहेत. त्यांना दोनदा संदेश देउन त्यांना दखल घेण्याची तसदी घ्यावेसेही वाटलेले नाही.

काय करावे?

अभय नातू १३:५४, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

जरा जपून[संपादन]

>>>> मराठी विकिपीडियाचा चुथडा करायचा असल्यास, ढिगान-ढीग कोरे लेख बनवून ठेवणे हा अगदी सोपा आणि हमखास यशस्वी मार्ग आहे, याची नोंद घ्यावी.............. आपल्या मधुर वाणीचा परिचय आम्हास (सर्व मराठी विकी सदस्यांना) चावडी वर दिला आहात; म्हणून नमस्कार पण बोलण्याची तसदी आम्ही घेत नाही आहोत. शब्द जरा चौकटीत बसतील असेच वापरा ! चुथडा असले वाह्यात शब्द आमच्या मराठी विकी वर परत येणार नाहीत याची काळजी घ्याल अशी अपेक्षा ! बाकी आपण सुज्ञ आहात ! आभारी आहोत !!

सागर:मराठी सेवक १४:३४, २९ सप्टेंबर २०११ (UTC)


या चहाला ![संपादन]

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .चहाचे सादर निमंत्रण.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:५३, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

चुकून दोनदा निमंत्रण टाकण्यात आले.एक काढीत आहे. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:५९, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

व्यक्ती आणि वल्ली[संपादन]

व्यक्ती आणि वल्ली मधील 'व्यक्ति रेखा' विभागातील आंतरिक दुवे पहावेत. ह्या लेखात काहीच मजकूर नासाल्याने, मी १-२ ओळींचा मजकूर टाकण्याच्या विचारात होतो. परंतु, नारायण (स्थानांतरीत१) हा लेख नजरेस पडला. प्रताधिकार उल्लंघना मुळे हा लेख वगळण्यात आला आहे. ह्या सर्व व्याक्तीरेखांबाबतही असेच होण्याची शक्यता आहे. हे लेख ठेवावे का? - प्रबोध (चर्चा) १५:०७, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

साचा फॉर्म्युला वन ग्रांप्री[संपादन]

मी नुकतेच येथे केलेले बदल बघावेत. ते योग्य आहेत काय? कृपया तपासुन कळवावे ही विनंती. बरोबर नसल्यास उलटवता येतील.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:४७, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

विकि टूलबार[संपादन]

लेखाची 'संपादन' कळ टिचकवल्यानंतर जेंव्हा संपादनास लेख उघडतो, त्यात विकि टूलबार काम करीत नाही. कोणी यात मदत करेल काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:२७, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)

नमस्कार, तूम्ही म्हणता ती संपादने विकी एडिटने एकगठ्ठा केली आहेत. तरी अशा संपादनासाठी विकी एडिट वापरावा की नाही? खुलासा व्हावा. :संतोष दहिवळ १४:४२, ६ ऑक्टोबर २०११ (UTC)

झपाटा[संपादन]

अप्रतिमच. इतका कामाचा झपाटा सर्वांनी ठेवला तर विकिचा कायापालटच होईल.दमणार नाही तर काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०४:११, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

माहितीचौकट ग्रांप्री शर्यत माहिती‎;[संपादन]

साचा:माहितीचौकट ग्रांप्री शर्यत माहिती‎ या साच्यात काहीतरी चुक आहे. मी प्रयत्न केला पण जमले नाही.२००६ चायनीज ग्रांप्री हा लेखही कृपया बघावा.तेथे हा साचा असल्यामुळे अनेक भाग दिसत नाहीत.कृपया मदत करा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:३५, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

नवीन लेख बनवताना किमान दोन-तीन वाक्यांचा वाचनीय मजकूर हवा[संपादन]

नमस्कार संकल्प

विकीपीडीया मधले माझे योगदान हे मुख्यत्वे करून कला क्षेत्राशी संबंधित आहे. ब-याच वेळेला एखाद्या कलाकाराची विकी बनवताना त्याचे कामाची सुद्धा विकी बनवावी लागते. त्यामुळे एक प्रकारे साखळी तयार होऊन माझ्याकडून रिकाम्या विकी बनल्या आहेत. माझ्या तर्फे मी पूर्ण प्रयत्न करतो कि जास्तीत जास्त माहिती एखाद्या विकी मध्ये द्यावी. माझे संपादन हे पूर्णपणे आंतरजालावर आधारित आहे. तसेच मी संपादन करताना गूगल च्या मराठी टंकलेखनाच्या सुविधेचा उपयोग करतो. त्यामुळे त्या त्या वेळेला माझ्या पाशी जी माहिती उपलब्ध होते त्या प्रमाणे मी विकी संपादित करायचा प्रयत्न करतो (पूर्ण लेख लिहून मग तो विकीपीडीयावर चढवणे मला शक्य नाही).

तरी सध्या ज्या विकी मी बनवल्या आहेत त्यांचा विस्तार करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि यापुढे किमान २-३ ओळी प्रत्येक नवीन विकी मध्ये टाकण्याचा प्रयत्न राहील.

धन्यवाद सागर

sagark86 १३:१८ , ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

ग्रांप्री[संपादन]

अहो! माझा हेतू तसा नव्हता. माहितीचौकट साचा नीट दिसत नाही म्हणुन मी परेशान आहे मघापासून. त्यात मी अनेक बदल करून बघितलेत पण ते नीट दिसत नाहीत.त्यानूसार मी आपणास संदेशही टाकला आहे. मलेशियन ग्रांप्रीचे भाषांतर केलेच आहे.पुढे काम सुरू आहे.

 • हे सर्व लेख विशेष :छोटी पाने मध्ये आहेत. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.यात कृपया क्रमांक ९४ नंतर बघा.मागील काही दिवस झालेत, मी तेथील लेख वाढवायचेच काम करीत आहे.मी काल-परवा संपादिलेले धबधब्यांचे व इतर लेख बघा.

तरी माझ्या सद् हेतूबद्दल कोणतीही शंका ठेवू नये ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:३५, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

 • आता २००६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री हा लेख बघावा.तो नीट झाला काय तसे कृपया कळवावे ही विनंती, म्हणजे इतर पुढील लेख तसेच करता येतील.आपणास थोडा त्रास देत आहे.काही त्रुटी असतील तर विनासंकोच सांगाव्या म्हणजे दुरुस्त करता येतील.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०७:५०, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

संकल्प ! भरपूर काम आलेले दिसते.लेख वगळायचे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:११, ११ ऑक्टोबर २०११ (UTC)

इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे Template:Infobox_F1_Race या साठी मी साचा:माहितीचौकट_फॉर्म्युला_वन_शर्यत बनवला होता. तर साचा:माहितीचौकट_ग्रांप्री_शर्यत_माहिती हा Template:Infobox_Grand_Prix_race_report वर आधारित होता. तरी आता दोन्ही साच्यांना एकत्रित करायचेच झाले तर थोडा वेळ लागेल. तसेच मला साचा:F1 race हा अजून एक साचा मिळाला मराठी विकिपीडिया वर. माझ्या मते रोमन लिपीतला हा साचा काढून टाकावा. सदस्य:Sagark86 १७:४६, ११ ऑक्टोबर २०११ (UTC)

तत्त्वज्ञान / तत्वज्ञान[संपादन]

तत्वज्ञान हे लेख नाव बरोबर आहे. मी लेखांमध्ये बदल केला आहे. आपण कृपया वर्ग:तत्वज्ञान तयार करून वर्ग:तत्त्वज्ञान वगळावा हि विनंती. - प्रबोध (चर्चा) ०६:३५, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

चहा[संपादन]

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


वेलकम, अजूनही व्यस्त आहे. अधून मधून चक्कर होते एवढेच माहितगार ०६:११, १५ ऑक्टोबर २०११ (UTC)

रिकाम्या[संपादन]

संकल्प,

महाराष्ट्रातील तालुक्यांच्या लेखावर तात्याने महाराष्ट्रतील तालुके असा वर्ग घातला होता. तो चुकीचा असल्याने मी तो बदलून महाराष्ट्रातील तालुके असा बदल केला.

बाकी वर्गीकरण नेमकेच असावे याबद्दल सहमत.

अभय नातू १५:००, १७ ऑक्टोबर २०११ (UTC)

रेसिपीबुक मजकूर[संपादन]

मराठी विकिपीडियावरील रेसिपीबुक मजकूर लेखांवर तो विकिबुक्सवर हलवायचा आहे अशी सांगकाम्या करवी नोटीस लावून किमान एखादे वर्षतरी काढावे. माहितगार ०६:४१, २२ ऑक्टोबर २०११ (UTC)

एक विनंती[संपादन]

विकिपीडिया:चावडी#हातभार लावा येथे सुचवलेल्या संचिका चढवताना करावयाच्या प्रक्रीयेतील सुचना पानांवर नरसिकरजींनी काम चालू केले आहे, कॉपीराईट विषय, बॉट आणि टेम्प्लेट या तिन्हींची माहिती असलेला निष्णात हात लागण्याची आवश्यकता दिसते आपण काही सवड काढावी हि आग्रहाची विनंती माहितगार ०८:४३, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे[संपादन]

विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे व तत्संबंधी खालील पाने कृपया तपासावीत.

या पानांतील लाल दुवे काढण्यास व यावर निष्णात हात (फिनिशिंग टच) फिरविण्यास शक्य असेल तर मदत करावी ही विनंती. याचे वर्गीकरणही कृपया करावे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:०५, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

रक्तगट या भाषांतरामध्ये काहीं गंभीर चुका झालेल्या आहेत. उदाहरणार्थ रक्तगट आनुवंशिक नाहीत असा मजकूर आलेला आहे .वास्तविक प्रतिजन आणी प्रतिद्रव्य दोन्हीचे नियंत्रण जनुकामुळेहोते. कृपया भाग वगळावा. मी हा भाग संपादित करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला धन्यवाद

डोळ्यांत तेल[संपादन]

>>पण येत्या काळात अश्या प्रकारांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार असे दिसते.

होय, मलाही तीच काळजी वाटते, आंतरजालावरून इतरत्रची झालेली कॉपी पेस्टींग भाषाशैलीवरून बरेच सहजतेने लक्षात येते.शासकीय विश्वकोशातील कुणी संदर्भ न देता कॉपी पेस्टींग केल्यास भाषेत अलंकृतता नसल्यामुळे आपल्या नजरेतून सुटेल पण त्याच वेळी तज्ञांनी स्वतःची भाषाशैली टिकवत लेखन केले आहे त्यामुळे कॉपीराईट भंग सिद्ध करणे तसे झाल्यास कायदेतज्ञांच्या मात्र हातचा मळ असेल आणि याचे गांभीर्य नवागत सदस्यांना कसे समजवावे हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे चएचेतून भविष्याकारता काही मार्ग सुचावा याच उद्देशाने मी हा विषय चावडीवर मांडला आहे माहितगार १८:१२, १ नोव्हेंबर २०११ (UTC)
Can we have a bot in Marathi Wipi like English which immd. founds the copied content from net... I think this is now badly required as it is very difficult to search such content manually.... Also we need to guide and teach the editors how to right the article by taking help of "Vishwakosh" without getting caught in Copyright issue. I guess some discussion is required in this topic. Just to tell you, the information in http://manase.org/ was earlier free (no copyright) and that was mentioned specifically on the website. On that basis, some articles in Marathi Wipi are been created/copied from that site and given the reference on page by some editors. Now during last 2 months http://manase.org/ has put back dated line "Copyright @ 2009 Maharashtra Navnirman Sena. All rights reserved." What to do now? मंदार कुलकर्णी ०७:२२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

माहितीचौकट बदल[संपादन]

माहितीचौकट भारतीय जिल्हा मध्ये छोटासा बदल व्हावा असे वाटते. सविस्तर सांगायचे झाल्यास ही माहितीचौकट वापरल्यास चित्राखाली उदा. राजस्तान राज्याच्या भिलवाडा जिल्हाचे स्थान असा मजकूर उमटतो. (भिलवाडा जिल्हा) मला वाटते साच्यात बदल करून जिल्हाचे ऐवजी जिल्ह्याचे, तालुकाचे ऐवजी तालुक्याचे असे यावयास हवे म्हणजे जिल्ह्याच्या/तालुक्याच्या विकीपानांवर आपोआप बदल होतील. शुद्धलेखनाच्या व वाचनाच्या दृष्टीनेही ते योग्य राहील. संतोष दहिवळ १६:१३, २ नोव्हेंबर २०११ (UTC)

देऊळ[संपादन]

 • देऊळ बद्दल आपण नीट बघितले असता आपणास दिसून येईल कि मी त्यात 'कामचालू' साचा लावला आहे.वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीचे आधारावर तो लेख बनविणे सुरू केले.आंतरजालावरून माहिती गोळा करीत आहे.सध्या तो लेख अपूर्णावस्थेत आहे. ईतर माहिती गोळा करून भरण्याचे काम सुरू आहे.वेळ व मूड असेल तसे यावर काम करीत आहे.मला वाटते,येथे कोणता लेख किती वेळात पूर्ण करावा, याचे बंधन येथे नाही.तरीही, तो लेख कोणासही वगळावयाची ईच्छा असल्यास माझी ना नाही.मी आजवर माझा कोणताही लेख वगळल्याबद्दल वा त्यात बदल/सुधारणा केल्याबद्दल तक्रारीचा चकार शब्दही लिहिला नाही.'God has not stopped working on me.There is always a chance of correction in me' ही माझी धारणा आहे.असो.अधून मधून काहीतरी संदेश देत जाउन असाच लोभ कायम ठेवा ही नम्र विनंती. मनास समाधान वाटते.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:५१, ३ नोव्हेंबर २०११ (UTC)

साचा:ऐतिहासिक लोकसंख्या[संपादन]

Done. Please check सॅन अँटोनियो. ह्या साच्यासाठी Document page करायला पाहिजे. Abhijitsathe १२:१५, ४ नोव्हेंबर २०११ (UTC)

फरक[संपादन]

जय भिम,

दलितत्व आणि दलित ह्यात फरक आहे. म्हाणुन आपला सन्देश/बोर्ड काढुन टाकला. कांबळे ०६:०३, ६ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रचालक[संपादन]

आपल्या प्रस्तावासमवेतच,अभिजीत साठेंच्या नावाचाही, त्यांचे अनुमोदन असेल तर, विचार करावयास हवा असे माझे मत आहे.त्यांनी विकिवर आजवर बरेच काम केले आहे.ते विकिशी चांगले परिचित आहेत.ते आपले काम शांतपणे व निष्ठापूर्वक करीत असतात असा माझा अनुभव आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:०५, ११ नोव्हेंबर २०११ (UTC)

नरसीकर म्हणतात त्या मताशी सहमत आहे. अभिजीत साठे (योगदान पहा) यांच्या नावाचा प्रचालकासाठी विचार व्हावा ही विनंती. संतोष दहिवळ १६:५६, ११ नोव्हेंबर २०११ (UTC)
माझी काही हरकत नाही. पाठिंब्याबद्दल धन्यवाद!!!
Abhijitsathe १७:४४, ११ नोव्हेंबर २०११ (UTC)

हॉट कॅट[संपादन]

हॉट कॅट संदर्भात एक bug report बगझिलावर submit केला आहे. त्यामध्ये काही बदल सुचवायचा असल्यास खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्यावी ही विनंती.

संतोष दहिवळ १४:३४, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

सुरक्षापातळी[संपादन]

आपण येथे असल्याचे दिसले म्हणून एक विनंती करतो की सदस्य:संतोष दहिवळ/vector.js या पानाची सुरक्षा पातळी बदलून दिली तर फार बरे होईल. संतोष दहिवळ १५:२२, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

धन्यवाद. संतोष दहिवळ १६:४०, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

उ:नोटवर्दी विकिमीडियन रेकग्निशन २०११ गौरवानिमित्त अभिनंदन ![संपादन]

धन्यवाद संकल्प.

अभय नातू ०४:४२, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रांतीय भाषा व केंद्र सरकारचे आदेश[संपादन]

संकल्प द्रविड जी

प्रथम तुमचे विकिपी़डिया वरील भरीव कामगिरीबद्धल हार्दिक अभिनंदन...

मराठी भाषेचा वापर जनतेकरीता करण्याचे आदेश केंद्र सरकारने त्यांच्या सर्व विभागाला आदेश दिले आहेत. कृपया लेखाखाली दिलेला आदेश वाचणे.

आभार[संपादन]

नमस्कार,

मध्यंतरी विकी संमेलन आणि मग तेथे दिलेल्या जाहीरनाम्यातील घोषणांना कार्यान्वित करण्याचा हालचालीत जसे मोबाई अ‍ॅप, विपी सी डी, मराठी फॉन्ट सुलभीकरण, मिडिया विकिसाठी मराठमोळी सर्वेक्षण पुरवणी तसेच मराठी विकीस्त्रोत सुरु करण्यासाठी भाषांतर, स्रोत साठी मुखपृष्ठ आणि सुचालन, आधारभूत साचे आदी कामात व्यस्त असल्याने इकडे फिराकण्याचे टाळले.

माझ्या माघारीच मला प्रचालक पदाची जबाबदारी आपण देऊ केलीत. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे. दिलेल्या जबाबदारीस मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. भविष्यातही आपल्या अशाच सहकार्याची अपेक्षा.

धन्यवाद

राहुल देशमुख ०५:५९, ४ डिसेंबर २०११ (UTC)

साचा:माहितीचौकट ऑलिंपिक[संपादन]

संकल्प,

ह्या साच्यात काय गोंधळ होतोय बघाल काय? I am scratching my head and cannot figure out why the last part of the infobox isn't showing links. - Abhijitsathe १५:२९, ५ डिसेंबर २०११ (UTC)

I figured it out... Thanks - Abhijitsathe १६:५५, ५ डिसेंबर २०११ (UTC)

/* प्रकाशित साहित्य */[संपादन]

एकमः लेखक मिलींद बोकील, कादंबरी, मौज प्रकाशन, १जून २००८

How to add photo[संपादन]

Can u tell me how to add photo.

How to add photo[संपादन]

Can u tell me how to add photo.

चित्ता या लेखासाठी http://www.padmakolhapur.com/7.htm हा फोटो वापरता येऊ शकेल काय? copyright देऊन

कृपया तपशील बदलू नये[संपादन]

संकल्पजी नमस्कार , आपण म्हणता ते बरोबर आहे.मी व्यक्तिपूजा टाळून लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.वाक्य रचनेचे संपादन आपण करावे पण कृपया तपशील बदलू नये .उदाहरणार्थ स्वामींनी सन्यास घेतला नव्हता ते ब्रह्मचारी होते ,तसेच त्यांनी परंडा येथे देह ठेवला पण अंत्यसंस्कार डोमगावला झाले इत्यादी.अजूनही काही सूचना असतील तर सांगाव्यात.

क्षमा वगैरेचे म्हणायचे कारण नाही[संपादन]

क्षमा वगैरेचे म्हणायचे कारण नाही.तुम्हाला अनुभव आहे.आपण मी टाकलेला मजकूर तपासात जावा .

ऑलिंपिक[संपादन]

होय.. सध्य थोडा जास्त फ्री वेळ मिळतोय. उन्हाळी लेख बर्‍यापैकी अपडेट झालेत आता हिवाळी! - Abhijitsathe १६:२७, १५ डिसेंबर २०११ (UTC)

Message on English Wikipedia[संपादन]

I left you a message on your English Wikipedia talk page Cloveapple ०३:५८, १७ डिसेंबर २०११ (UTC)

Wait.GIF

. Hurry.gif

Wikibar-news.png विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! Dance.gif
नमस्कार, Sankalpdravid/जुनी चर्चा ५

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


Regarding Saagara Pran Talamalala[संपादन]

Hey Sankalp dravid,

I was searching for "Saagara Pran talamalala" song on the Wiki and see following comment.

This page has been deleted. The deletion and move log for the page are provided below for reference. 14:55, 11 May 2011 Sankalpdravid (Talk | contribs) deleted "सागरा प्राण तळमळला" ‎ (प्रताधिकार उल्लंघन: मजकूर होता: '{{उल्लेखनीयता}} ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥)

Will you please make this page available again for all of us.

Thank you.

Regards, -- S a r v e s h

धन्यवाद![संपादन]

नमस्कार संकल्प, पुनरागमनाची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद. चरित्र प्रकल्पात नियमितपणे भर घालण्याचा प्रयत्न करेन.

Chnaged title from Reference to Extra Reading[संपादन]

Hi Sankalp,

I have taken my first step towards contributing to Marathi Wikipedia. I am getting familiar with the process.

Yesterday, I have added one reference to fort Khanderi which was promptly changed to Extra readings. Curious to know the reason behind the same.

Regards, Satyajit

Sankalp,

Thanks for your response. I checked on other pages on fort for example but could not find. Will you please share example link for this?

विकिपत्रिकेविषयी[संपादन]

संकल्प तुम्हाला पण नवीन ग्रेगोरियन वर्ष सुखासमाधानाचे जावो, अशी शुभेच्छा.

विकीपात्रिका जानेवारी २०१२

विकीपात्रीकेच्या केलेल्या कौतुका बद्दल धन्यवाद. विकीपात्रिकेत अनेक सुधारणांना वाव आहे. मी हि संकल्पना मांडणे, त्यासाठीच्या आधारभूत सुविधांचे निर्माण (दालन, पाने, साचे, चित्रे, आराखडा, स्तंभ, जाहिरात... वैगरे) मधेच बराच व्यस्त झाल्याने २५ डिसेंबर पर्यत पत्रिका तयार करण्याची सीमा पळू शकलो नाही (कामकाज पण आहेच) त्यामुळे शेवटल्या क्षणी सांख्यिकीचा स्नॅपशॉट टाकला. त्यात Time Stamp टाकावा हि उत्तम कल्पना आहे, मी त्यात आता ढोबळ पणे दिनांक जोडून देतो.

खरेतर विकीपात्रिका हि संकल्पना अस्तित्वात आणून त्यास यशस्वीरित्या अमलात आणली कि त्यासाठी लागणाऱ्या जबाबदार्या वाटून द्याव्या आसे मला अभिप्रेत होते/आहे. त्यात आपणासाठी सांख्यिकी हा विभाग मी ठरवून ठेवलेला होता (कारण मराठी विकिपीडियावर वेळोवेळी उत्तम/रंजक/विश्लेषण/आकडे मोडी आपण देत असतात) आणि आपण त्यास हात घालून माझ्या मनातलेच बोललात. लवकरच त्याबाबत चावडीवर लिहेन.

धन्यवाद

राहुल देशमुख ०७:११, २ जानेवारी २०१२ (UTC)

स्तंभ[संपादन]

नमस्कार,

विकीपत्रीकेचा अंक आपण वाचलाच असेल.

एकंदरीत पत्रिकेतील लेख/माहितीची दिशा याबाबत काही सूचना/कल्पना असल्यास सुचवाव्यात. तसेच काही नियमित स्तंभ सुरु करावेत असे वाटते, जसे सांख्यिकी, प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम, पुढील महिन्यातील आयोजित कार्यक्रम आणि इतरही (सुचवावे ) ... त्यासाठी रंजक/आकर्षित स्तंभ नावे सुचवावीत हि विनंती. राहुल देशमुख ०४:३८, ४ जानेवारी २०१२ (UTC)

पानकाढा[संपादन]

पानकाढा साच्यात मी थोडी अ‍ॅडिशन केली आहे जेणेकरून तो साचा लावलेली पाने महिन्यानुसार वर्गीकृत होत आहेत. एकदा पहावे. वर्ग:तारखेनुसार वगळावयाचे लेख - अभिजीत साठे २३:१३, ५ जानेवारी २०१२ (UTC)

तारा[संपादन]

नमस्कार,

सर्वप्रथम विकिसमुदायाच्या वतीने आपण मला उपसंपादकाचा बार्नस्टार दिल्याबद्दल धन्यवाद.

आता दुसरे क्षमस्व.

अशासाठी की सध्या थोडी इतर धावपळ वाढल्याने मनासारखे योगदान आणखीही तीन-चार दिवस देता येणार नाही. आणि खरे म्हणजे तुम्ही दिलेला बार्नस्टार मी पाहिलाच नव्हता. आपल्याला माहिती आहे की मी माझ्या चर्चा पानावर शक्यतो जात नाही. मागे कधीतरी सगळ्या चर्चा मी वगळूनही टाकल्या होत्या. असो. तरीही मी चर्चा पानावर जात नाही याचा अर्थ माझ्यापर्यंत आलेले संदेश मी वाचतच नाही असा नाही तर मी popup navigation script एनेबल केली असल्याने अलीकडील बदल मध्ये फरक या शब्दावर पॉईंटर नेल्याबरोबर तिथेच नवीन बदल वाचायला मिळतो म्हणून आपण दिलेल्या बार्नस्टारकडे कदाचित लक्ष गेले नसेल.

पुनश्च धन्यवाद. संतोष दहिवळ १६:३२, १० जानेवारी २०१२ (UTC)


आपल्या सूचने बद्दल[संपादन]

माननीय महोदाय , धन्यवाद आपण माझ्या कार्याची दखल घेतल्या बद्दल,मी लिहिलेल्या लेखाला आपण ही सूचना लावलेली आहे "खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे". चित्रपट आणि त्या चित्रपटाचे कथानक ह्या दोन बाजू आहे. कथानक माहिती असून सुधा तो चित्रपट पहाणे याला आपण आवड असे म्हणतो, तर कधी चित्रपटाचे कथानक माहिती असून सुद्धा दिग्ददर्शकाने त्याचे काम कसे पार पडले हे पाहण्या साठी आपण जातो. (उदा. बालगंधर्व,हरिश्‍चंद्रची फॅक्टरी,नटरंग) मला पूर्ण कथानक माहिती होते तरीही मी चित्रपटपाहावयास गेलो, कदाचित आपणही बघितला असेल. गंध हा चित्रपट कुठला रहसमय चित्रपट नाही की मी त्याचे कथानक उघड करतोय असे मला वाटते. तरीही आपल्या सूचनाचे स्वागत आहे तसा मजकूर लिहीत असताना मी त्याची काळजी घेईल . धन्यवाद  !!

संतोष शिनगारे ०७:२१, १६ जानेवारी २०१२ (UTC)

एखाद्या चॅनेल चा संदर्भ कसा द्यायचा? उदाहरणार्थ Natgeo

केतकर साचा[संपादन]

आपण copy paste साचा लावल्याचे पाहिले. म्हणून त्यात बदल करून संपादित मजकूर सोबत जोडला आहे. योग्य वाटल्यास अंतर्भूत करावा ही विनंती.

केतकरांनी महाराष्ट्रात कोशयुग सुरू केले असे म्हणतात. एका अर्थाने ते खरेही आहे. केतकरांच्या ज्ञानकोशानंतर महाराष्ट्रात अनेक प्रकारचे कोश निघाले. ज्ञानकोशानंतरच्या कोशवाङ्मयात चित्रावशास्त्रींचे चरित्रकोश त्यातल्या त्यात नाव घेण्यासारखे म्हणून सांगता येतील. ‘एन्सायक्लोपीडिया’ या इंग्रजी शब्दाला डॉ. केतकरांनी मराटी प्रतिशब्द ‘ज्ञानकोश’ असा तयार केला. ज्ञानकोश शब्दात ‘एन्सायक्लोपीडिया’ची कल्पना अगदी यथार्थतेने प्रकट होते. ‘ज्ञानकोश’ शब्दाचा अर्थ यच्चयावत ज्ञानाचा संग्रह करणे व शक्यतो ते ज्ञान अकारविल्हे उपलब्ध करून देणे असा आहे. फ्रान्समधील ज्ञानकोशाने फ्रेंच राज्यक्रांतीची बीजे पेरली, अशाच प्रकारची ज्ञानमूल क्रांती महाराष्ट्रात व्हावी, अशी केतकरांची महत्त्वाकांक्षा होती.

केतकरांनी ज्ञानकोश रचनेला जेव्हा सुरवात केली तेव्हा त्यांना येथे काय दृष्टीस पडत होते ? पाश्चात्य विद्वानांनी एखाद्या गोष्टीवर एकदा का एखादे मत मांडले की तेच मत खरे असे मानण्याची प्रवृत्ती येथील विद्वानांमध्ये दिसत होती. अशा स्थितीत आपले ज्ञान, आपले तत्वज्ञान, आपला इतिहास या सर्व गोष्टींकडे आधुनिक पण राष्ट्रीय दृष्टीने पाहण्याची गरज होती. ती दृष्टी डॉ. केतकर यांच्याकडे होती. केतकरांच्या या भूमिकेलाच, केतकर संप्रदायी आणि समीक्षक प्रा. श्री.के.क्षीरसागर यांनी ज्ञानाच्या क्षेत्रातली राष्ट्रवादी भूमिका असे नाव दिले. राष्ट्राच्या आजच्या गरजा नजरेसमोर ठेऊन आपल्या पूर्वपरंपरांची, इतिहासाची आणि जागतिक ज्ञानाची संगती लावणे आणि ते सर्व ज्ञान सोप्या मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांकरिता उपलब्ध करून देणे, हे ज्ञानकोशाच्या राष्ट्रवादी स्वरूपात अभिप्रेत आहे.

यादृष्टीने केतकरांच्या ज्ञानकोशाचे स्वरूप फार अभ्यसनीय आहे. केतकरांच्या ज्ञानकोशाचे वैशिष्टय़ म्हणजे विद्वत्ताप्रचूर आणि स्फूर्तिदायक असे चार प्रस्तावनाखंड.

ज्ञानकोशातील सर्वच निबंध आणि प्रबंध केतकरांनी स्वत: लिहिले आहेत असे नाही. हे सर्वच पूर्णपणे स्वतंत्र आहेत असेही नाही. पण मूळ लेखकासंबंधी केलेल्या एखाद्या विधानात, एखाद्या दुरुस्तीत व एकंदरच निवडीत त्यांची जी स्वतंत्र दृष्टी असे, तिचे महत्त्व फार मोठे आहे.

एकूणच केतकरांचा ज्ञानकोश म्हणजे केवळ १९२० च्या सुमारास उपलब्ध असलेले ज्ञान मराठीत उपलब्ध करून देणारा ग्रंथ नव्हे, तर एक विशिष्ट भारतीय आणि महाराष्ट्रीय दृष्टी देणारा ग्रंथ होय. असे प्रा. क्षीरसागर यांना वाटते. त्यांच्या मते, ‘हिंदुस्थान आणि जग’ ‘इतिकर्तव्यता’ , ‘महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्ये’ ही प्रकरणे केतकरांच्या राष्ट्रीय दृष्टीची जाणीव करून देणारी आहेत.

Convert[संपादन]

साचा:Convert मध्ये major चुका आहेत. मी तो दुरुस्त करायचा प्रयत्न करतोय. काही मदत लागली तर कळवेन. - अभिजीत साठे १५:२४, १९ जानेवारी २०१२ (UTC)

कोणतेच conversions चालत नाहीयेत. उदा. बैकाल सरोवर. - अभिजीत साठे १६:०४, १९ जानेवारी २०१२ (UTC)

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लेखाबद्दल[संपादन]

सुप्रभात! यातील विकिकरण बद्दल धन्यवाद. परंतु यातील श्री विवेक सावंत यांचा उल्लेख का वगळण्यात आला? त्यासाठी आवश्यक असा संदर्भ ही मी दिला होता. संदर्भ: http://www.punevyaspeeth.org/2008/vivek-sawant-profile.पद्फ धन्यवाद --आभिजीत ०४:१४, २२ जानेवारी २०१२ (UTC)

वर्गीकरण[संपादन]

संकल्प, जरा थांबावे. मी वर्ग:पेशानुसार व्यक्ती हा वर्ग पाहिला तर त्यात वर्ग: संगीतकार, वर्ग: गायक‎ असे अनेक वर्ग आधी पासून आहेत. मग मराठी संगीतकार आणि पार्श्वगायक हे त्यात येऊ शकतात असे मला वाटते. म्हणून त्यात घातले आहेत. पार्श्वगायन हा पेशा आहे. पार्श्वगायक आणि मराठी पार्श्वगायक हा आपल्या सोयीचा पण त्या सारखाच वर्ग आहे. हे सारे वर्गाचे सुसूत्रीकरण करण्यासाठी आवश्यक आहे. जेणे करून वर्ग:पेशानुसार व्यक्ती या मोठ्या वर्गात अनेक गोष्टी सापडतील. तरी काढण्यापूर्वी फेरविचार करावा.मंदार कुलकर्णी १३:४५, २२ जानेवारी २०१२ (UTC)

शंकर शिवदारे[संपादन]

मी आजकाल ऑनलाईन कमीतकमी असू शकतो.अगदी विकिअ‍ॅकेडमी किंवा प्रशिक्षणाच्या सुचना विकिपीडियावर लावणे सुद्धा होत नाही आहे. विकिअ‍ॅकेडमी दरम्यान वापरण्याकरिता माहितगार ट्रेनर नावाने वेगळे खाते बनवण्याचा विचार करत आहे. विकिअ‍ॅकेडमीत चर्चेचे ओघ वेगळे असतात त्यामुळे लेखात पुरेसे लेखन होईलच याची शाश्वती नसते. उलट ऑनलाइन मंडळींनी त्यात काही भर घातली तर विकिअ‍ॅकॅडमीतील स्टूडंट्सना लगोलग सहयोगी संपादनाचा प्रत्यय मिळून हुरूप येऊ शकेल. BTW काल मराठी विकिपीडियाची व्हिडिओ कॉन्फरंसींगने झालेली पहिली विकि अ‍ॅकेडमी सोलापुरातील एजी पाटील पॉल्टेक्नीक कॉलेजकरिता पुण्यातील त्यांच्याच व्हिडिओ कॉन्फरंसींग केंद्रातून घेतली गेली त्या दरम्यान उपरोक्त लेखाची निर्मिती झाली. माहितगार ०२:४८, २४ जानेवारी २०१२ (UTC)

वसईची लढाई[संपादन]

संकल्प,

आज वसईची लढाई हा लेख लिहून काढला. जरा त्यावरुन हात फिरव आणि शुद्धलेखन, व्याकरण, इ. तपासून बघ.

अभय नातू ०४:१८, २४ जानेवारी २०१२ (UTC)

तपासून पहा - पहिले महायुद्ध[संपादन]

पहिले महायुद्ध या लेखात मी घटनानुक्रम लिहिला आहे. क्रुपया तपासून पहा.

Karan Kamath

punyatil pakshi yachi farshi ullekhaniyata nahiye, pan shahar mhanun pakshyanchi yadi karne thik vatate. english wikipedia var pan pakshyanchya yadya ahet pan tya deshanchya ahet, shaharanchya kvachitach ahet.


तपासून पहा - पहिले महायुद्ध[संपादन]

पहिले महायुद्ध हा लेख तपासून पहा.

Karan Kamath

साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश[संपादन]

माहितीचौकट भूतपूर्व देश मध्ये मागील व पुढील देश लिहितांना ५ ही लिमिट आहे; ती वाढवावी. तसेच त्यात "राष्ट्रगीत" हा कॉलम वाढवावा.