Jump to content

सदस्य चर्चा:Sagark86

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार संदर्भात

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.




आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.

मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.


साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.



असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.


आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.


आपले विनीत,

साहाय्य चमू

ता.क.:


नवीन लेख बनवताना किमान दोन-तीन वाक्यांचा वाचनीय मजकूर हवा

[संपादन]

नमस्कार सागर !

गेल्या काही दिवसांत आपण नवीन लेख बनण्यावर भर देत आहात असे दिसते. तुम्ही बनवलेल्या लेखांमध्ये माहितीचौकट साचा व वर्गीकरणच दिसत असून वाचनीय मजकूर मात्र क्वचितच दिसला आहे. नजीकच्याच भूतकाळात या संदर्भाने विविध ठिकाणी चर्चा झाली होती. चर्चा:पल्सारसदस्य चर्चा:Sagarmarkal‎ येथे या अनुषंगाने काही मतमतांतरे नोंदवली गेली होती. ती या संदर्भात एकदा नजरेखालून घालावीत, अशी विनंती.

लेखांमध्ये नुसतेच साचे किंवा बाह्य दुवे आहेत, पण धड एखादा परिच्छेद वाचनीय मजकूरच नाही, अश्या अनुभवामुळे मराठी विकिपीडियावर कधीमधी येणारे वाचक/वापरकर्ते निरुत्साहाने येईनासे होऊ शकतात. शेवटी आपण इथे काही तास खर्चून जी काही माहिती मराठीत आणतो, ती लोकांना वाचून ज्ञान गवसल्याचे समाधान मिळणार असेल, तर या श्रमांचे चीज होईल; आपल्याच कर्माने त्यावर बोळा फिरणार असेल, तर त्याने आपलेच श्रम व्यर्थ ठरतील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५९, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)

सागर, तुम्ही स्वतः आंतरजालावर माहिती शोधून ती गोळा करून विकिपीडियावर आणत आहात, ही कौतुकास्पद बाब आहे. तसे करताना तुम्हांला एकदम अख्खा लेख लिहिणे शक्य नसले, तरीही कोणताही नवीन लेख बनवताना लेखाच्या विषयाच्या संदर्भाने किमान दोन-तीन वाक्ये लिहून विषयाची प्रस्तावना/परिचय लिहिला जाईल, असे बघावे. तो लेख कलाकाराबद्दल असू दे, किंवा चित्रपट/नाटक वगैरे कलाकृतींबद्दल असू दे, त्याबद्दल खालील पैलूंसंदर्भाने किमान माहिती लिहावी :
  • कलाकारांबद्दल लेख बनवताना : व्यक्तीचे पूर्ण नाव व टोपणनाव ठळक अक्षरांमध्ये लिहावे. त्यानंतर कंसामध्ये जन्मदिनांक व मृत्युदिनांक (हयात असल्यास मृत्युदिनांकाऐवजी "हयात" असे लिहावे) लिहावेत. त्यानंतर त्या व्यक्तीची ठळक ओळख किंवा पेशाविषयीची माहिती नोंदवावी. त्यानंतर त्या व्यक्तीच्या कर्तबगारीविषयी किंवा व्यावसायिक कारकिर्दीविषयी संक्षेपाने एक-दोन वाक्यांत माहिती लिहावी. उदा.: रंजना देशमुख येथील पहिला परिच्छेद बघावा. अशी माहिती वाचली, की मराठी विकिपीडियाला भेट देणार्‍या वाचकालादेखील इथे येऊन काहीतरी उल्लेखनीय माहिती वाचल्याचे समाधान लाभले पाहिजे. आणि आपण बनवत असलेला कोणताही नवीन लेख अश्या समाधानकारक दर्जाचा बनवणे हे आपले कर्तव्य आहे.
  • चित्रपटाबद्दल लेख बनवताना : चित्रपटाचे नाव ठळक अक्षरात लिहून मग चित्रपट कोणत्या वर्षी चित्रपटगृहांत झळकला ते लिहावे. त्याचे दिग्दर्शन कोणी केले व कोणी कोणी त्या चित्रपटात भूमिका साकारल्या, ते नोंदवावे. उदा. हरिश्‍चंद्राची फॅक्टरी हे पान बघावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:४८, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

ग्रांप्री

[संपादन]

सागर नमस्कार , (१९९२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री‎) ह्यावर लेख लिहिल्याचे पहिले आपण कुपया ग्रांप्री २००० पुढील लेखांवर काम करावे जसे कि २०००, २००१, २००२..... कारण त्याखालील लेख हे वगळण्यात येणार आहेत.भरपूर मोठ्या प्रमाणात ग्रांप्री वरील कोरे लेख असल्याने २००० पर्यंतचे लेख पूर्ण झाल्यानंतर त्या अगोदर च्या लेखांना हात घालू म्हणूनच मी काल २००० पर्यंतचे २५-३० ग्रांप्री वरील लेख अवरुद्ध केले आणि २००० मागील लेखांना पानकाढा साचा ठोकला. - मी राजाराम बोलतोय

तुम्ही साचा:माहितीचौकट फॉर्म्युला वन शर्यत हा साचा बनवल्याचे पाहिले. मात्र तत्पूर्वी फॉर्म्युला वन शर्यतींसाठी साचा:माहितीचौकट ग्रांप्री शर्यत माहिती हा माहितीचौकट साचा अगोदरपासून काही लेखांमध्ये वापरला गेला आहे. असे दोन-दोन साचे वापरण्यापेक्षा दोन्ही साच्यांमधील गोष्टी कोणत्यातरी एका साच्यात सामावून/मर्ज करून एकच साचा सर्वत्र वापरावा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२२, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
सागर, तुम्ही तुमच्या सदस्य नामविश्वांतर्गत एखादे उपपान बनवून त्यावर संबंधित साच्यांतील माहिती एकत्रपणे दाखवेल, असा मर्ज केलेला साचा घडवू शकता. त्याच्या चाचण्या करून, मग संबंधित सर्व लेखांमध्ये नवीन साचा वापरता येईल. या अखेरच्या टप्प्यासाठी सांगकाम्या वापरून काम करवून घेता येईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४०, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

[संपादन]

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१५, १ जानेवारी २०१२ (UTC)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

[संपादन]
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०७, ११ जून २०१२ (IST)[reply]

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार Sagark86,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले